|| वैशाली शडांगुळे

आज जगभरातील एकूणच फॅशनची शैली कित्येकांना आवडते आणि कित्येकांना नावडते तर कधी अगदी खटकते. सोप्या भाषेत अतिरिक्त फॅशन, विक्षिप्त फॅ शन, विनोदी फॅ शन जी ग्लोबली ‘रॅम्प’वर येते, सामान्यांसाठी ती फॅ शन

कृ त्रिम ठरते. ते त्याला विकृतीकरणाचा नमुना मानतात. ज्याला आपण ‘वियर्ड’ किंवा ‘फनी’ असं संबोधतो. दुसरी गोष्ट अशी यातून सामान्यांना फॅ शन म्हणजे क्रिएटिव्हीटी नसून कपडय़ांची एक बाळबोध विसंगती वाटते, त्या विचित्र फॅ शनवर नेटकरी रिअ‍ॅक्ट होतात आणि हेच ‘स्मार्ट’ नेटकरी सोशल मीडियावर हा विचित्रपणा डिजिटल माध्यमांतून शेअर करतात. आपल्या कल्पनाशक्तीची जोड देत मीम्स, ट्रोल्समधून विचित्र आणि खटकणाऱ्या फॅ शनची फजिती करतात. आजकाल ही गोष्ट अगदी कॉमन आहे. रॅम्पवर अनेक नानाविध स्वरूपाची विक्षिप्त फॅशनअवतरली आहे. ट्रोलर्सनी त्यावर खिल्लीही उडवली आहे. कॉमन पब्लिक विचित्र असलेली फॅशन कधीच आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरू शकत नाही. रॅम्पवरील मॉडेल्स मात्र तेवढं धैर्य दाखवतात, जे कौतुकास्पद असते. मुळात फॅशनही कुठल्याही कल्पनेतून सुचते. त्यामुळे ठरावीक चौकटीपलीकडे जात तिचा आविष्कार होतो.

फॅ शन ग्लोबल असते तेव्हा एक फॅ शन डिझायनर म्हणून त्या व्यक्तीला जे जाणवतं ते तो फॅशनमधून आपल्यासमोर आणतो. असं काय वेगळं आहे या जगात जे आपण फॅ शन म्हणून अंगावर घालू शकतो?, हा विचार त्यामागे घोळत असतो. त्यात फक्त कापडच नाही तर एखादी प्लॅस्टिकची वस्तू, गादी, उशी, अभ्रे यांच्यापासून ते साध्या स्टेशनरी वस्तूंपर्यंत सगळ्याच गोष्टी कुठल्या न कुठल्या पद्धतीने परिधान करता आल्या तर ती फॅ शन कशी दिसेल?, अशा नानाविध कल्पनांमधून ती आकाराला येते. त्यामुळे वरवर पाहता त्याचा काही अर्थ, संदर्भ लागत नाही. अशी फॅ शनकरण्यामागचं कारण काय?, या फॅ शनला नक्की काय म्हणायचं?, या अमूक एका फॅ शनचा अर्थ काय?, असे प्रश्न सहज पडतात. सोशल मीडियावर या प्रश्नांची उत्तरं ट्रोल करून दिली जातात. आज सोशल मीडियावर या ‘फॅ शन आणि ट्रोलिंग’ची तुफान लाट आली आहे. आजचं चित्र असं आहे की तुम्ही काहीतरी वेगळं परिधान करा, तुम्ही ट्रोल होताच. कारण सामान्य माणसांच्या नजरेत त्या फॅ शनमध्ये काहीच कला नसते आणि म्हणून त्यांना त्याची फजिती करावीशी वाटू शकते. सोशल मीडिया हे मोफत आणि मुक्त प्रवेशद्वार असल्याने साहजिकच त्याचा बाऊ  होतो.

हे माध्यम प्रमोशन आणि मार्केटिंगचे आहे त्यामुळे सध्या ट्रोलिंगला या दोन गोष्टींच्या अनुषंगाने बरंच महत्त्व आहे. मग त्यातून फॅशनकशी सुटणार? हे या माध्यमाचं मूळ वैशिष्टय़ं, त्यामुळे एखाद्या मॉडेलचा फोटो एखाद्या विचित्र दिसणाऱ्या आऊ टफिटवरून ट्रोल झाला तर त्यावर असंख्य लाइक्स, नकारात्मक कमेंट्स येतात. या सगळ्यामुळे व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरही फॅ शन ही एखाद्या विशिष्ट चौकटीतीलच हवी, हा आग्रह जोर धरू लागला आहे.  ज्या सुंदर रेखीव साडय़ा परिधान केल्यावर एखाद्याला वैयक्तिक पातळीवर समाधान मिळतं, तेच बटबटीत, विचित्र फॅ शनमधून मिळत नाही. मग सामाजिक स्तरावरसुदा ही फॅ शनचुकीची ठरायला लागते. एकतर आज जगात प्रत्येक देशात वेगळी फॅ शनआहे. फॅ शनबद्दल प्रत्येकाचा दृष्टिकोन हा अत्यंत वेगाने बदलतोय. फॅ शन जेव्हा विचित्र आणि चौकटीबाहेरची दिसते तेव्हा हा बदल आहे हे फार कमी लोकांना जाणवतं. वैयक्तिक करण्यावर आज ग्लोबली भर आहे. त्यामुळे कोणी कशी फॅशन करावी यावर आता काही बंधन नाही.

आज सेलिब्रिटींना जास्त ट्रोल केलं जातं. मला काय आवडतं? मी काय घालू शकतो?, यावर आता प्रत्येकाची इच्छा, पद्धतच बदलते आहे. स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे फॅ शन जो करतो त्यालाही काही अडवणूक नसते तर दुसरीकडे ट्रोल करण्यांनाही अडवणूनक नसते. इथे मुद्दा येतो तो निवडीचा. त्या व्यक्तीने जे काही परिधान केलं होतं त्यातून त्याच्यापरीने त्याला समाधान मिळालं, पण ट्रोल झाल्यानंतर त्याला आणि पुढे कोणालाही ते समाधान मिळत नाही. ट्रोलिंग हे त्या कपडय़ांच्या रूपावरूनच होतं. जेव्हा एखादी व्यक्ती अशी फॅ शन करते तेव्हा ती फॅ शन फॉलो व्हावी, असा त्याचा त्यामागचा विचार नसतो. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट लोकांसमोर येते, तशीच फॅ शनही येते. लोकं त्यावर आपली टीकाटिप्पणी करतातच. फॅ शन ही संकल्पना लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी मदत करते. त्यातून एका प्रसंगातूनच, अनुभवातूनच मिळालेला एक विचारांचा कोपराही असतो जो फॅशनमधून मांडायचा असतो. देखणं रूप हे अशा विचित्र फॅशनमधून कधीच येत नाही तर युटिलिटी म्हणजेच उपयुक्तता या दृष्टिकोनातून फॅशनकडे पाहिलं जातं. आणि दुसरीकडे (ओव्हर कन्झम्पशन) अतिरिक्त वापर या दृष्टीनेही फॅशनपाहिली जाते. त्यामुळे तसे पडसाद फॅ शनमध्ये पहायला मिळतात. बाहेरच्या देशात ही विचित्र फॅ शनचीसंकल्पना विकसित आहे. तिथे त्याकडे कला म्हणून पाहिलं जातं. असे कपडे रॅम्पवर शोकेस करण्यामागचे त्यांचे हिशोब वेगळे असतात. तर आपल्याकडे उपयुक्तता जास्त पाहली जाते. त्यामुळे आपल्याकडे गोष्टींचा अतिरिक्त वापर टाळून काही वाया जाता कामा नये याकडे लक्ष असते. अशा वेळी गरज आणि आवडनिवड या दोन्ही बाबतीत फॅ शनची तुलना होऊ  शकत नाही.

रॅम्पवर आलेल्या अशा विचित्र फॅ शनचं पुढे काय होतं हाही तितकाच कुतूहलाचा प्रश्न. रॅम्पवर आलेली फॅ शनही फक्त आभास, कलाकृती, कल्पना आणि कला यापुरतीच मर्यादित राहते. ती फॅ शनही एका कलाकाराची, एका डिझायनरची असते. त्यामुळे ते मुळातच एक आर्टवर्क असतं जे कपडय़ांवर उतरतं, पण ते वेअरेबल नसतात. याव्यतिरिक्त त्या डिझायनरचं याच आर्टवर्कच्या थीमचं स्वत:चं वेगळं कमर्शिअल कलेक्शन असतं. ही धडपड ते करतात, कारण त्यांच्याजवळ खरोखरच तितकं सुयोग्य तंत्रज्ञान, क्रिएटिव्ही आणि टॅलेंटची भरभराट असते. असे डिझायनर्स खरोखरच तेवढी मेहनत घेतात. कमर्शिअल आणि वेअरबेल कलेक्शन हे वेगळं असून त्यांचे क्रिएटिव्ह आणि आर्टवर्क कलेक्शनही वेगळे असतात. पण याबद्दल सोशल नेटवर्किंग साईट्सवर पुरेसं ज्ञान नसल्याने एखाद्या फॅ शनला ट्रोल केलं जातं. आणि फॅ शन वर्ल्डला फजितीला सामोरं जावंच लागतं..!

शब्दांकन : गायत्री हसबनीस

viva@expressindia.com