मुंबईतल्या काही कॉलेज फेस्टिव्हल्सचा हा थोडक्यात घेतलेला आढावा. यंदा परीक्षांमुळे फेस्टिव्हलचं रहाटगाडगं जरा धिम्या गतीने चाललेलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या उत्साहात तसूभरही कमी नाही.
परीक्षेच्या काळात ओस पडलेले कट्टे नोव्हेंबरमध्ये आता ‘फेस्टमय’ व्हायला लागतात. कॅम्पसमध्ये ‘है जुनून सा जीने में’ असं काहीसं वातावरण तयार होतं. विद्यार्थ्यांमधला सळसळता उत्साह पाहून ‘पुलं’चा ‘नारायण’ आठवतो. असे अनेक नारायण सध्या कॅम्पसमध्ये राबताना दिसताहेत. एकूणच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या फेस्टिवल्सच्या निमित्ताने वाव मिळतो. बॅकस्टेजला सगळं ऑर्गनाइज करणारी यंग ब्रिगेडची तनात शिक्षकांच्या आणि सीनियर्सच्या मार्गदर्शनाने घरचं कार्य असल्याप्रमाणे अख्खा फेस्टिव्हल डोक्यावर घेते आणि फेस्टची जबाबदारी नेटाने पार पाडते.
यंदाच्या वर्षी फेस्टिव्हलचा नूर थोडा बदलल्यासारखा वाटतोय. मुंबई विद्यापीठाने आयत्या वेळी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केल्यामुळे टीवायकऱ्यांचे काही पेपर्स डिसेंबपर्यंत लांबलेत. अशात, फेस्टिव्हलच्या सतत बदलणाऱ्या समीकरणांमुळे फेस्टिव्हल होणार की नाही, या संभ्रमातच बरेच दिवस विद्यार्थी घुटमळत राहिले. अखेरीस, काही महाविद्यालयांमध्ये अंतर्गत, तर काही महाविद्यालयांमध्ये ‘आंतरमहाविद्यालयीन’ असे दोन्ही फेस्टिव्हल होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.
vv31माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात या वर्षी ‘आरोहण’ हा ‘आंतरमहाविद्यालयीन’ फेस्ट होणार नाही; पण दर वर्षीप्रमाणे ‘उत्सव’ हा ‘महाविद्यालयीन’ फेस्ट होणार आहे. हा फेस्ट २४ आणि २५ डिसेंबरला असेल. या वर्षीही रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे फाइन आर्टस, लिटररी आर्टस आणि परफॉìमग आर्टसचे इव्हेंट्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स होणार आहेत. फाइन आर्टसच्या इव्हेंट्समध्ये मुख्यत्वे टी-शर्ट, कॅनव्हास आणि शूज पेंटिंग असणार आहे. परफॉìमग आर्ट्सचे क्लासिक आणि वेस्टर्न डान्स, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, सिंिगग हे इव्हेंट्स असतील. लिटररी आर्ट्सच्या इव्हेंट्समध्ये ट्रेजर हंट, क्विझ, डिबेट, क्रिएटिव्ह रायटिंग, बॉलीवूड क्विझ, िथक इट.. इंक इट हे इव्हेंट्स असतील. यातले क्विझ, डिबेट, क्रिएटिव्ह रायटिंग हे इव्हेंट्स मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये असतील. हे इव्हेंट्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स २४ डिसेंबरला होणार आहेत. २५ डिसेंबरलाही काही स्पोर्ट्स इव्हेंट्स होतील. विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या स्वयंसेवकांसाठी काही वेगळे इव्हेंट्स असतील.
माटुंग्याच्या पोदार महाविद्यालयात ‘आंतरमहाविद्यालयीन’ आणि ‘महाविद्यालयीन’ असे दोन्ही फेस्टिव्हल्स होणार आहेत. आंतरमहाविद्यालयीन फेस्टचं नाव ‘मोनेटा’ असं आहे. ‘मोनेटा’चा हेतू आíथक साक्षरतेचं महत्त्व समजावून देणे आणि आíथक वातावरणाचं सखोल ज्ञान करून देणे असा आहे. ‘मोनेटा’ हा फेस्ट ५ ते ८ डिसेंबरदरम्यान होणार आहे. यात आíथक बाबींशी संबंधित लेक्चर्स, सेमिनार्स आणि वर्कशॉप्स होणार आहेत. या फेस्टदरम्यान पोदार महाविद्यालयात ‘स्टॉक मार्केट’ उभं केलं जातं तसं ते या वर्षीही केलं जाणार आहे. यात सहभागी झालेले विद्यार्थी वेगवेगळ्या देशांचं प्रतिनिधित्व करतील. ‘स्टॉक मार्केट’चे चढ-उतार, गुंतवणुकी या सगळ्याचा त्यांना प्रत्यक्षदर्शी अनुभव घेता येईल.
याशिवाय ‘रॅपो’ हा महाविद्यालयीन सांस्कृतिक फेस्ट पोदार महाविद्यालयात या वर्षीही होणार आहे. त्याचे इव्हेंट्स १९ पासून होणार आहेत. यात नृत्य, नाटक, संगीत असे इव्हेंट्स होणार असून फाइन आर्टसच्या इव्हेंट्समध्ये कुकरी शो, नेल आर्ट, ब्रायडल मेकअप हे इव्हेंट्स असणार आहेत. कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील ‘प्रवाह’ आणि ‘बिर्लोत्सव’ या फेस्टिव्हल्सची तयारी जोरदार सुरू आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी ‘प्रवाह’ या फेस्टचं आयोजन करतात. विज्ञान आणि त्यातील मजा सर्वांपर्यंत पोहोचवणे हा या फेस्टचा हेतू आहे. यंदा ‘प्लास्टिकमुक्त कॅम्पस’ची घोषणा करत पूर्ण ‘प्रवाह’ टीम जोमाने तयारीस जुंपली आहे. १२ आणि १३ डिसेंबरला होणाऱ्या ‘प्रवाह’ या फेस्टमध्ये बुद्धिमत्ता चाचणी करणारे विविध छोटे छोटे खेळ आणि स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
बिर्ला महाविद्यालयाची शान असलेल्या ‘बिर्लोत्सव’ या फेस्टचं म्युझिकल बँड आणि पारंपरिक वेशात दवंडी पिटवत प्रमोशन सुरू आहे. सामाजिक तसेच तळागाळातील अनपेक्षित घटनांचं भान ठेवत त्यासंबंधी प्रत्येकात जाणीव निर्माण करण्याची जिद्द विद्यार्थी बाळगून आहेत. याशिवाय माटुंग्याच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूटचा ‘टेक्नोवांझा’ हा फेस्ट २८ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे. या वर्षी त्यांनी नावीन्यपूर्ण असा ‘रोबो’ हा इव्हेंट आयोजित केला आहे.
मुंबईतल्या काही कॉलेज फेस्टिव्हल्सचा हा थोडक्यात घेतलेला आढावा. यंदा परीक्षांमुळे फेस्टिव्हलचं रहाटगाडगं जरा धिम्या गतीने चाललेलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या उत्साहात तसूभरही कमी नाही. त्यांच्या या उत्साहाला तसाच जोशपूर्ण प्रतिसाद मिळो, ही सदिच्छा!