News Flash

तंत्रात्मक फॅशनची झलक

फॅशन ही फक्त कपडे डिझायनिंगमधूनच उतरते असे नाही.

|| तेजश्री गायकवाड

‘पोर्टफोलिओ २०१९’ या पर्ल अकॅडमी फॅशन संस्थेच्या मंचावर आपलं नेमकं काम सादर करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि फॅशनच्या क्षेत्राची सांगड घालत अनेक नवीन प्रकल्प सादर केले. फॅशन डिझाइनच्या पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी हेबा शेख हिने तिचा अंतिम संग्रह (फायनल कलेक्शन) सर्वासमोर सादर केला. यामध्ये फॅशन व तंत्रज्ञानाचा मिलाफ साधताना १९६०च्या दशकातील फॅशनपासून प्रेरणा घेत तिने आपल्या संग्रहात लिथिअम बॅटरीयुक्त कोटचा समावेश केला होता. हा कोट परिधान क रून शरीराचे तापमान नियमित केले जाते. उष्णतेचे संवेदक या कापडाला शिवण्यात आले आहेत. हा कोट अत्यंत कमी वजनाचा व घालण्यास आरामदायी असा आहे. तर कम्युनिकेशन डिझाइनच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आयुषी ड्रोलिया हिने इलस्ट्रेशन्ससह ऑनलाइन बुक तयार केले होते. या बुकमध्ये मुंबईतील काही विशिष्ट भाग ठळक करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात फिरताना ही ठिकाणे शोधणे सोपे होईल. मुंबईतील प्रत्येक भागाचे खाद्यपदार्थ, पेय, नाइटलाइफ आणि अन्य काही वैशिष्टय़ांसह स्वतंत्र मॅपिंग करण्यात आले आहे. कम्युनिकेशन्सच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी स्वस्तिका सोमानी हिचा प्रकल्प तर याही पुढे जाणारा होता. यामध्ये एका वेबसाइटच्या स्वरूपात फॅ शन प्रवाहांवर पडणाऱ्या आयकॉन्सच्या प्रभावाचे विश्लेषण करण्यात आले आहे. यात मेगन मार्कल आणि कायली जेनर यांच्या आवडींचाही समावेश करण्यात आला होता. या वेबसाइटच्या वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या आयकॉनच्या फॅ शनची नक्कल करता येते. किंवा त्यांनी ज्या पद्धतीने फॅ शन केली आहे त्याचा अभ्यास करत नवीन काहीतरी निर्माण करण्याचे स्वातंत्र्यही या वेबसाइटच्या माध्यमातून मिळणार आहे. कम्युनिकेशन डिझाइनमध्येच पदवी शिक्षण घेत असलेल्या श्रेया शहाने विविध भौगोलिक प्रदेशांच्या माध्यमातून मुंबईचा आवाज पकडला आहे. मुंबई शहरातील गजबज या प्रकल्पातून कॅसेट टेपमध्ये कल्पकरीत्या पकडण्यात आली आहे. फॅ शन डिझाइनची विद्यार्थिनी मोनिका वन्नियार हिनेही आपले फायनल कलेक्शन सर्वासमोर सादर केले. मोनिकाच्या पुरुषांच्या कपडय़ांच्या कलेक्शनचे नाव ‘अहंत्व’ असे होते. याचा अर्थ स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आपले व्यक्तित्व न गमावता सृजनशील पोशाखांच्या माध्यमातून स्वत:चे रूप खुलवू पाहणाऱ्यांसाठी हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. एशियन डिझायनर वीकमध्ये नुकताच इमìजग टॅलेंट पुरस्कार पटकावणाऱ्या मोनिकाने तिच्या यशाचे श्रेय तिच्या मेंटर्सना दिले. अंकिता बेलेकर या विद्यार्थिनीने मल्टिफंक्शनल या कॉन्सेप्टवर त्याच पद्धतीचं कलेक्शन तयार केलं होतं. कॉलेजच्या मुलांना नेहमीच नवनवीन काही ना काही हवं असतं. हेच हेरून तिने असे गारमेंट्स डिझाइन केले ज्याच्या वापराने एकाच आऊटफिटमधून तुम्ही ३ वेगवेगळे लुक तयार करू शकता. कॉलेज संपल्यावर बाहेर कुठे वेगळ्या कार्यक्रमांना जायचं असेल तर ते सहज वेगवेगळे लुक ट्राय करू शकतात.

फॅशन ही फक्त कपडे डिझायनिंगमधूनच उतरते असे नाही. केवळ नामांकित फॅशन डिझायनर्सच्या कलेक्शनचापाठपुरावा न करता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फॅशन क्षेत्रात उपयोगी पडेल असे काही डिझाइन करण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न, त्यांची कल्पकता आणि हुशारी यांना नामांकित फॅ शन डिझायनर्स, उद्योजक यांच्याकडून दाद मिळाली. असे अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतून प्रत्यक्षात उतरले असून ते समाजोपयोगी आहेत. त्यांच्या किमतीही कमीत कमी आहेत त्यामुळे समाजातील सगळ्याच वर्गाना या नवीन माध्यमाचा वापर आणि उपयोग सहज शक्य आहे, असं मत  पर्ल अकॅडमीच्या अध्यक्ष प्रा. नंदिता अब्राहम यांनी व्यक्त केलं.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 12:10 am

Web Title: technology fashion heba shaikh
Next Stories
1 कानाला खडा!
2 आला खादीचा सण…
3 अभिनेत्रींना साडी नेसवण्याचे आगळेवेगळे करिअर
Just Now!
X