28 February 2021

News Flash

पुन्हा नव्वदीत!

वेगवेगळ्या रंगांच्या, साइजच्या या क्लिप्स छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात.

|| तेजश्री गायकवाड

फॅशनचं जग एका वर्तुळात कार्य करतं. त्यामुळे  जुने ट्रेण्ड  नवीन स्वरूपात परत येतातच. असेच अनेक नव्वदच्या दशकातील ट्रेण्ड पुन्हा हे दशक गाजवत आहेत.  क्रॉप टॉपपासून ते फुटवेअर, आयवेअरपर्यंत इतिहासजमा झालेल्या अनेक  गोष्टींचा ट्रेण्ड  पुन्हा आला आहे. अशाच काही अ‍ॅक्सेसरीज आणि क्लोदिंगच्या ट्रेण्डबद्दल…

१) टिक टॅक हेअरक्लिप : लहानपणी सगळ्याच मुलींनी आवर्जून टिक टॅक क्लिप्स वापरल्या असतील. वेगवेगळ्या रंगांच्या, साइजच्या या क्लिप्स छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. सध्या या हेअर क्लिप्स पुन्हा एकदा वेगळ्या डिझाईनसह बाजारात आल्या आहेत. या क्लिप्सची क्रेझ हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंत आणि जगातील इतर सर्व भागांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. यामध्ये जास्त प्रमाणात खडे, वेगवेगळ्या रंगांचे स्टोन, मोती, सीक्वेन्स लावलेले हेअरक्लिप फॅशनमध्ये आहेत. तसच ग्लॅम, भौमितिक आकार, ब्रॅण्डची नावे लिहिलेल्या हेअरक्लिपसुद्धा ट्रेण्डमध्ये आहेत.

२) थिक हेअरबॅण्ड : साधारण दोन ते तीन वर्षांपासून अजिबात फॅशनमध्ये नसलेले  हेअरबॅण्ड अचानक ट्रेण्डमध्ये आले, पण या हेअरबॅण्डने पुन्हा आगमन करताना आपला अंदाज नक्कीच बदलला आहे. सध्या ट्रेण्डमध्ये असलेले हे  हेअरबॅण्ड साइझने जाड आहेत. प्लास्टिकच्या हेअरबॅण्डवर मोती, मणी चढवलेले आहेत, तर कापडी हेअरबॅण्ड आणि त्यावरही मोती, मणी लावलेले हेअरबॅण्ड्स ट्रेण्डमध्ये आहेत. काही कापडी हेअरबॅण्डचा बेस भाग हा प्लास्टिकचा आहे, तर काही कापडी हेअरबॅण्डमध्ये इलास्टिकचा वापर केला जातो आहे. हेअरबॅण्डमध्ये कापडी हेअरबॅण्ड, स्वेट हेअरबॅण्ड, टर्बन हेअरबॅण्ड, स्कार्फ हेअरबॅण्ड, नीट हेअरबॅण्ड हे वेगवेगळ्या पद्धतीचे हेअरबॅण्ड सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.

३) जीन्स : जीन्स हा कपड्याचा प्रकार कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाही. दरवेळी काही तरी नवीन एलिमेंटसह जीन्स ट्रेण्डमध्ये येतातच. यंदा जुन्या काळातील जीन्स पुन्हा ट्रेण्डमध्ये आल्या आहेत. यात बेल बॉटम, बूटकट जीन्स, हाय राइज आणि वाइड लेग, प्लीट-फ्रन्ट हे जुने प्रकार फॅशनमध्ये आहेत, तर लॉन्ग फॉर्म, शॉर्ट गेट लूज याही जुन्याच, पण  नवीन पद्धतीने आलेल्या जीन्स ट्रेण्डमध्ये आहेत. या जीन्स टी-शर्ट, शर्ट, टॉप, शॉर्ट कुर्तीवर पेअर केल्या जातात.

४) चोकर नेकलेस : चोकर हा नेकलेसचा प्रकार सतत ट्रेण्डमध्ये ये-जा करणारी अ‍ॅक्सेसरी आहे. चोकर हा प्रकार टिपिकल काळ्या रंगामध्ये येतो. हा टिपिकलपणा सोडून हे चोकर आता अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच सिल्क चोकर, चाम्र्ड चोकर, वेलवेट चोकर, लेस चोकर, बो चोकर, टॅटू चोकर, डेन्टी चोकर, पेन्डन्ट चोकर, स्टेटमेंट चोकर असे अनेक प्रकारचे चोकर खूप ट्रेण्डमध्ये आहेत. हे चोकर कॅज्युअल ड्रेसिंगपासून ते पार्टीवेअर, टी-शर्ट, टॉप यावरही शोभून दिसतात.

५) हुप्स : हुप्स हा कानातल्याचा असा प्रकार आहे जो कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटवर एकदम फिट बसतो. कोणत्याही आऊटफिटवर काय कानातले घालायचे हे ठरत नसेल तेव्हा तुम्ही हुप्स नक्कीच घालू शकता. हुप्स हे अगदी आधीपासून वापरले जातात. हा प्रकार कधीच आऊट ऑफ ट्रेण्ड गेलेला नाही, परंतु आवर्जून नवीन रूपात हुप्स येत असतात. यात सध्या खूप जास्त ट्रेण्डमध्ये आहेत ते म्हणजे शेल हुप कानातले. हे कानातले तुम्ही इंडो वेस्टर्नपासून ते भारतीय अशा कोणत्याही पद्धतीच्या कपड्यांवर घालू शकता. याव्यतिरिक्त गोल्डन मोठे आणि पातळ आकारातले हुप्स, सिल्वर पातळ आकारातले हुप्स, वेगवेगळ्या रंगांचे प्लास्टिकचे हुप्स, स्टोनवर्क असलेले हुप्ससुद्धा फॅशनमध्ये आहेत.

६) रेट्रो सनशेड : ऊन लागू नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या सनशेड आता आपल्या फॅशनचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यातही अनेक प्रकार नेहमीच उपलब्ध असतात. यामध्ये नव्वदच्या दशकात गाजलेले कॅट आय शेड, भौमितिक आकार असलेल्या शेड, मिरर लेन्स शेड, क्लिअर शेड, स्टायलिश कलर टिन्टेड शेड,  ओवरसाइज सत्तरच्या दशकातले स्क्वेअर शेड, फ्लॅट टॉप शेड, सक्र्युलर राऊंड शेड, दोन-टोन लेन्स शेड, ब्लोड एमब्लीश शेड, मॉर्डन हाफ फ्रेम शेड असे अनेक प्रकार सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. प्रत्येक वेगळ्या आऊटफिटसाठी तुम्ही वेगवेगळया प्रकारचे सनशेड्स घालू शकतात.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2021 12:39 am

Web Title: the world of fashion old trends trendb of accessories and clothing akp 94
Next Stories
1 ग्लोबल सी मेरी बोली…
2 संशोधनमात्रे : माती, पाणी, उजेड, वारा…
3 अस्ता‘व्यस्त’!
Just Now!
X