food-logoपौगंडावस्थेत मुलगी आली की, तिला पहिला प्रश्न भेडसावतो पिंपल्सचा. सोळावं वर्ष धोक्याचं म्हणतात ते मुरुमांच्या बाबतीत अगदी सत्य आहे. मुरुम किंवा अ‍ॅक्ने, पिंपल्स केव्हा होतात? तेल आणि मृत त्वचेच्या पेशी चेहऱ्यांच्या रंध्रांमध्ये अडकतात तेव्हा पिंपल्स येतात. किशोरवयात किंवा प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या वर्षांत ही समस्या जास्त जाणवते. याच काळात, पुरुष आणि स्त्रियांच्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात टेस्टेस्टिरॉनची निर्मिती होते. ज्यामुळे तेलग्रंथींना (सेबम) अधिक तेलाची निर्मिती करण्यास चालना मिळते. या अतिरिक्त तेलामुळे त्वचेची रंध्रे बुजतात आणि मुरुमांची निर्मिती होते. यात रोगजंतूंचीही वाढ होते आणि जर ते इतर पेशींपर्यंत पोहोचले तर त्यामुळे सूज, लालसरपणा आणि पू निर्माण होऊ शकतो.

संशोधकांनी सिद्ध केले आहे की, मुरुमांचा संबंध आहाराशीदेखील आहे. तुम्ही जे खाता त्याचा परिणाम तैलग्रंथींवर होत असतो. त्यामुळे मुरुमांना दूर ठेवायचं असेल तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आजच्या लेखात याविषयीच्या थोडय़ा टिप्स :

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

साखर आणि काबरेहायड्रेट्सचे सेवन नियंत्रित करा : पांढरा ब्रेड, भात, फ्रेंच फ्राइज आणि बटाटे हे पदार्थ तुमच्या त्वचेला मोठय़ा प्रमाणावर हानी पोहोचवतात. रिफाइंड साखरही तुम्हाला धोकादायक आहे, कारण त्यामुळे रक्तशर्करा वाढून मुरुमे वाढण्यास मदत होते.

काही काबरेहायड्रेट्सचे पचन इतरांच्या तुलनेत धीम्या गतीने होते, ज्यामुळे त्यांचे सेवन केल्यानंतर रक्तशर्करेत लगेच वाढ होत नाही. त्यामुळेच संपूर्ण धान्याचे ब्रेड आणि पास्ता, ब्राऊन राइस, रताळे, वाटाणे, शेंगदाणे, शेंगा आणि फळे-भाज्यांचा समावेश आहारात करा.

सूक्ष्मजंतूंचा समतोल राखा : काही बॅक्टेरिया शरीराला आवश्यक असतात. दह्य़ामध्ये असे उपयुक्त बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आहारात दह्य़ाचा समावेश अवश्य करा.

नसíगकपणे आंबवलेले पदार्थ आणि कच्चे पदार्थ (ज्यात लाभकारक लाइव्ह बॅक्टेरिया असतात) तुमच्या आहारात समाविष्ट करा.

दह्य़ामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे तुमच्या शरीरात मुरुमे तयार करू शकणाऱ्या हानीकारक रोगजंतूंना दूर ठेवतात.

भरपूर पाणी प्या : दररोज ताजे आणि शुद्ध पाणी भरपूर प्या. शरीरात पाण्याची पातळी चांगली राखल्याने पेशींची वाढ, त्यांचे पुनरुज्जीवन, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे आणि मृत पेशींना काढून टाकण्यात मदत होते. तसेच त्वचेवर तकाकी राहते.

फॅट्सची मात्रा नियंत्रित करा : आपल्या आहारातून आपण अनेक प्रकारचे फॅटी अ‍ॅसिडचे सेवन करत असतो, ज्यामुळे मुरुमांची वाढ होण्यास मदत मिळते. तुमच्या शरीरात मोठय़ा प्रमाणावर सूज असल्यास ती त्वचेवरही दिसून येते. ओमेगा-३ फॅट्स तुमच्या शरीरातील द्रव्यांना नियंत्रित करण्याबरोबरच पेशींचे निर्जलीकरण होण्यापासून रोखतो. यामुळे पेशी सशक्त आणि ओलावा टिकून राहतो. ओमेगा-३ फॅट सूज कमी करते, ज्यामुळे त्वचेला होणारा दाह कमी होऊन स्वच्छ आणि तलम त्वचा होते.

ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड गोडय़ा पाण्यातील मासे, उदाहरणार्थ सॅलमन, साíडन. जवसाचं तेल, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया आणि बदाम यांच्यातून मिळते. मका, सूर्यफूल, कनोला यासारख्या वनस्पती तेलांचा वापर कमी करा.

औषधी वनस्पतींचा आधार घ्या : दालचिनी, हळद, आलं आणि तुळस, ओरेगॅनो, लसूण दाह किंवा सूज कमी करणारे आणि रोगजंतूंचा नाश करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आहेत. याचा आहारात वापर करा.

प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा : अ‍ॅडिटिव्हज, साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ आणि कृत्रिम रंगांचा वापर केलेल्या पदार्थात विषारी द्रव्य असू शकतत. ज्यामुळे मुरुमांची समस्या वाढू शकते. असे खाद्यपदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने त्याचा ताण यकृतावर पडतो आणि अतिरिक्त विषारी पदार्थ यकृतात शुद्ध न झाल्याने त्याचा परिणाम मुरुमांच्या वाढीत होतो.

मुरुमांशी लढण्यासाठी आवश्यक सर्वोत्तम जीवनसत्त्वे आणि मूलद्रव्ये!

िझकने समृद्ध पदार्थ : मुरुमांवर मात करण्यासाठी िझकने समृद्ध असलेले पदार्थ खाणे सर्वोत्तम उपाय आहेत. तुमच्या दैनंदिन आहारात िझकचा समावेश करा. ऑयस्टर, ओट, चीझ, सूर्यफुलाच्या बिया, कोहळा, पालक, टोफू, मशरूम्स, शेंगभाज्या आणि बदाम याच्या माध्यमातून आपल्या आहारात िझकचा समावेश करता येऊ शकतो. मुरुमांशी संबंधित विषाणूंशी लढण्याच्या आणि त्वचेची सूज कमी करण्याच्या गुणधर्मामुळेच िझक मुरुमविरोधी एक मुख्य अस्त्र ठरते. बिटा-कॅरोटीनचे ‘अ’ जीवनसत्त्वात रूपांतर करण्यासाठीही िझकची गरज असते.

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध पदार्थ : चेरी, बेरीवर्गीय फळं, ग्रीन टी आणि पालक त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या आणि मुरुमांना चालना देणाऱ्या शरीरातील मुक्तपणे फिरणाऱ्या मूलतत्त्वांवर हल्ला चढवते. स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी, करवंदासारखी बेरीवर्गीय फळं मूठभर खाल्ल्याने किंवा वाटीभर पालक सॅलड खाल्ले तरी दिवसाची अँटिऑक्सिडंट्सची मात्रा पूर्ण होते.

सेलेनियमने समृद्ध पदार्थ : ब्राझिल नट्स, बदाम, कांदा, लसूण आणि होल ग्रेन सेलेनियमचे चांगले स्रोत आहेत. सेलेनियम प्रभावी अँटिऑक्सिडन्ट आहे. हे पदार्थ तुमच्या त्वचेची लवचिकता कायम ठेवते आणि त्याची सूज कमी करते. दिवसभरात मूठभर बदाम खाल्ल्यानेही दिवसाची सेलेनियमची मात्रा पूर्ण होऊ शकते.

‘सी’ जीवनसत्त्वांनी समृद्ध पदार्थ : खरबूज, संत्रे, टोमॅटो, स्ट्रॉबेरी तसेच ब्रोकोली (कोबीची एक जात) आणि सिमला मिरचीसारख्या भाज्या तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देऊन पेशीभिंतींना बळकट करतात. हे पदार्थ त्वचेवर मुरुमांमुळे राहणाऱ्या व्रणांपासून वाचवतात आणि त्वचेला हानी पोहोचवण्यापासून रक्षण करतात.

जीवनसत्त्वे ‘ई’ने समृद्ध असलेले पदार्थ: यात शेंगदाणे, सोयाबीन, बदाम, हिरव्या पालेभाज्या, रताळे आणि ओट, मका, पूर्ण धान्य आणि अंडी यांचा समावेश होतो. जीवनसत्त्व ‘ई’युक्त पदार्थ तुमच्या त्वचेवर व्रण उमटण्यापासूनही रोखते. तुम्हाला रोजच्या आहारात जीवनसत्त्व मिळावे यासाठी सॅलडमध्ये किंवा स्वयंपाकात ऑलिव्ह ऑइल यांचा वापर करा.

क्रोमिअम समृद्ध पदार्थ : रक्तशर्करा पातळी संतुलित ठेवण्याच्या गुणधर्मामुळे क्रोमिअमने समृद्ध असलेले पदार्थाचे सेवन केल्याने मुरुमांना दूर ठेवता येईल. लेटय़ूस (सॅलडची पानं), कांदे, टोमॅटो, पूर्ण धान्य आणि बटाटे हे क्रोमिअमचे चांगले स्रोत आहेत.

तळलेले पदार्थ शक्यतो टाळा. यामुळे मुरुमांच्या वाढीला चालना मिळते. असे पदार्थ खाल्ल्याने एक-दोन दिवसांत मुरुमे येऊ शकतात. त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या आणि मुरुमांना दूर ठेवा.

 

संजना मोटवानी – viva.loksatta@gmail.com
(लेखिका सर्टिफाइड न्यूट्रिशिनिस्ट  आहेत.)