vn18सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यूटय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

vd08
‘मराठी टच’ पिक्सची धम्माल
‘भाऊ, पोरांना बोलाव, राडा झालाय’. असं हल्क म्हणतोय किंवा ‘कुणाला सांगू नको, आज मी डब्यात पाव-भाजी आणलेय’. हॅरी पॉटरच्या तोंडी हे वाक्य कसं वाटतंय? ही आणि अशा तऱ्हेची टिपिकल मराठी वाक्यं हॉलीवूड अ‍ॅक्टर्सच्या तोंडी असतील तर ही अशक्य वाटणारी गोष्ट फोटोंच्या माध्यमांतून करून ठाण्याच्या दोन तरुणांनी धमाल उडवून दिली. ‘मराठी टच’ या पेजवर त्यांनी गाजलेल्या हॉलीवूड पटांमधली दृश्य टाकली आणि त्याला असे अस्सल मराठी डायलॉग चिकटवले. हॉलीवूड स्टार्सच्या तोंडी आपल्या रोजच्या वापरातली वाक्यं टाकून त्यात धम्माल आणली गेल्येय. फेसबुकवर या पेजनं चिक्कार धुमाकूळ घातलाय. गेल्या महिन्याभरात या पेजला वीस हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत आणि आता तीच पोस्टर्स आणि फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेत.

# ट्विटर@९
एके काळी केवळ ‘टिवटिवाट’ अशा थोडय़ाशा उपहासात्मक पद्धतीनं उल्लेखलं जाणारं ट्विटर नऊ वर्षांचं झालंय. ‘ट्विटर’चे संस्थापक जॅक डोर्सी यांनी २१ मार्च २००६ रोजी ‘जस्ट सेटिंग अप माय ट्विटर’ असं ट्वीट केलं होतं. १४० ही ट्विटरवरची शब्दमर्यादा काही जणांना अभिव्यक्तीसाठी अडथळा ठरेल, असं वाटत असतानाही तसं न होता, तेच ट्विटरचं जणू वैशिष्टय़ ठरतंय. फेसबुकपाठोपाठ ट्विटरची लोकप्रियता वाढतेय. अधिकाधिक युजर्स ट्विटरवर लॉग इन होताहेत. जगभरातील असंख्य सेलेब्जचं ट्विटरवर अकाऊंट आहे.

गुढीपाडवा स्पेशल
vd09सोशल मीडियावर मराठी नववर्ष दिनाची अर्थात गुढीपाडव्याची एकच धूम होती. गुढीच्या आसनापासून ते कलशापर्यंत सगळ्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टींचा अर्थ समजावणारा फोटोपासून ते ‘नवीन’ या शब्दासहितच्या कल्पक काव्यात्मक चारोळींपर्यंत मेसेजेस फॉरवर्ड केले जात होते. काही मेसेजमध्ये तर थेट सिनेमाचाच आधार घेण्यात आला होता. उदाहरणार्थ एका फोटोत चक्क हृतिक रोशन वाळूत काठी रोवतोय, त्याला अमिषा पटेल विचारतेय की, ‘काय करतोयस?’ त्यावर हृतिकचं उत्तर- ‘दिसत नाही का?.. गुढी उभारतोय.’ आता हृतिकच्या फॅन्सनी आत्तापर्यंत केव्हाच ओळखलं असणार, की हा त्याच्या ‘कहो ना प्यार है’ या पहिल्यावहिल्या चित्रपटातला सीन होता. डायलॉग मात्र नवे होते. घरच्या गुढीपासून ते चौकातल्या गुढीपर्यंत नि मराठमोळ्या वेशभूषेपासून ते शोभायात्रेतील गमतीजमतीपर्यंतचे नि सेलेब्रिटींच्या गुढीपाडवा सेलिब्रेशनचेही फोटोज्, सेफ्लीज् अपलोड होत होते.

धरम संकट में
परेश रावल, नसीरुद्दीन शहा नि अनू कपूर असं दमदार त्रिकूट प्रथमच ‘धरम संकट में’ या सामाजिक उपहासात्मक सिनेमात एकत्र येणारेय. धरम पाल असे परेश रावलच्या व्यक्तिरेखेचे नाव असून नसीरुद्दीन शहा एका हिंदू बाबाची भूमिका साकारणार आहेत, तर अनू कपूर एका मुस्लीम बाबाच्या भूमिकेत असतील. एक विषय सुपरहिट ठरून तो प्रेक्षकांनी उचलून धरल्यावर बॉलीवूडमध्ये त्याच विषयावरचा चित्रपट कथानकात थोडाफार फेरफार करून आणला जातो. धर्म-ईश्वरविषयक मुद्दय़ांमुळंच ‘ओ माय गॉड’ आणि ‘पीके’सारखे चित्रपट सुपरहिट ठरले होते. ‘धरम संकट में’मध्ये धरमच्या भूमिकेत परेश रावल आहेत्
. तेव्हा ‘धरम संकटात आहे’ की ‘धर्म संकटात आहे’ याचा शोध सध्या तरी ट्रेलरमधूनच घ्यावा लागेल. त्याची ही लिंक –  
https://www.youtube.com/watch?v=dmwnzE14bZs
‘हॉटेल ट्रान्सील्व्हानिया २’ ही अमेरिकन थ्रीडी कॉम्प्युटर अ‍ॅनिमेटेड फॅण्टसी कॉमेडी फिल्म आहे. ‘हॉटेल ट्रान्सील्व्हानिया’चा हा सीक्वेल अर्थात दुसरा भाग असून आपल्या आवडत्या मॉन्स्टर्स नि ह्य़ुमन कॅरॅक्टर्सची एक झलक पाहायची संधी या चित्रपटाच्या टीजर ट्रेलरमुळं मिळेल. त्याची ही लिंक – https://www.youtube.com/watch?v=smcHKYUs4RE

‘टाइमपास २’चा ट्रेलर
vd10अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून सुपरहिट ठरलेल्या ‘टीपी’ अर्थात ‘टाइमपास’ या चित्रपटाचा सीक्वेल ‘टाइमपास २’चा ट्रेलर रीलीज करण्यात आलाय. त्याला तीन दिवसांत सव्वा तीन लाख व्ह्य़ूज मिळालेत. ‘यूटय़ूब’वर बघितल्या गेलेल्या भारतातल्या टॉप फाइव्ह व्हिडीओंपैकी एक व्हिडीओ ‘टीपी २’चा ट्रेलर आहे. ‘टीपी २’मध्ये प्रिया बापट नि प्रियदर्शन जाधवच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची पोस्टर्सही आगळ्या पद्धतीची तयार करण्यात आली आहेत. ‘टायटानिक’च्या पोजमधले पोस्टर सध्या व्हायरल होतेय.

‘बॉम्बे वेल्वेट’चा ट्रेलर
क्रिकेट वर्ल्ड कपच्या धामधुमीत भारत-बांगलादेशची मॅच चालू असताना रणबीर कपूर नि अनुष्का शर्माच्या बहुचर्चित ‘बॉम्बे वेल्वेट’चा ट्रेलर रीलीज करण्यात आला. यात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या केमिस्ट्रीसोबतच करण जोहरची खलनायकी भूमिका दिसेल. १९६०च्या दशकातल्या मुंबईचं प्रतिबिंब या ट्रेलरमधून दिसतंय. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट रणबीरच्या लुक्समुळं, सिनेमाच्या कथानकाच्या पाश्र्वभूमीमुळं, करणच्या पहिल्याच खलनायकी भूमिकेसह विविध कारणांनी चर्चेचा विषय झाल्यानं ट्रेण्डमध्ये राहिलाय. त्याची ही लिंक
https://www.youtube.com/watch?v=AmMIQZ1TAig
राधिका कुंटे- viva.loksatta@gmail.com