प्रियांका वाघुले

‘रुंजी’, ‘तेनाली रामा’सारख्या मालिकांमधून लक्षात राहणारा तुषार कावळे हाही तरुण कलाकारांच्या फिटनेस ब्रिगेडमधील एक आहे. नित्यनियमित व्यायाम करत फिटनेसच्या बाबतीत जागरूक राहिलेल्या तुषारच्या मते त्याचा आत्मविश्वास यामुळेच दुणावला. तुमचा आत्मविश्वास, निर्धार पक्का असेल आणि त्याला वाढता स्टॅमिना, जिद्द यांची जोड मिळाली तर माणसाचा पुढे जायचा प्रयत्न नेहमी यशस्वी ठरेल, त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करत राहायला हवेत, असे तो ठामपणे सांगतो.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

व्यायाम करताना तो अधिक अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्यावर त्याचा भर असल्याचे त्याच्या बोलण्यातून सहज लक्षात येते. तुषार कॅ लेस्थेनिक्सकरत असल्याचे सांगतो. कॅ लेस्थेनिक्सया प्रकारात वेटचा वापर न करता स्वत:च्या शरीराचा वापर करून अनेक फिटनेस प्रकार करत असल्याचे तो सांगतो. यामध्ये कोअरसाठी फ्रंट लिव्हर रईस, हॅन्डस्टॅन्ड, बल्गेरियन स्क्वॉट्स, पिस्टन स्क्वॉट्स हे प्रकार करत असल्याचे त्याने सांगितले, तर अप्पर बॉडीसाठी पुशअप्स, पुलअप्स, पॅरलल बार पुशअप्स असे व्यायाम करत असल्याचे तो सांगतो.

या व्यायाम प्रकारांनी स्वत:तील आत्मविश्वास, जिद्द आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याचा ध्यास खूप प्रमाणात वाढत असल्याचा अनुभव तुषार सांगतो, कारण १० ते १५ मिनिटांमध्ये सर्वसाधारणपणे शंभर पुशअप्स पूर्ण होतात, मात्र सध्या तेवढे पुशअप्स तो फक्त चार मिनिटांत पूर्ण करतो. व्यायामात सातत्य ठेवल्यामुळेच ही गोष्ट शक्य झाली असून अशा प्रकारे अनेक गोष्टींमध्ये इतका सकारात्मक बदल झाल्याचे तो सांगतो. व्यायामानेच शरीरात बदल होतातच, पण शरीराच्या आत होत असलेले बदल हे स्वत:ला जाणवत असतात आणि त्याचा पुरेपूर वापर आपल्या जीवनात होत असतो, असेही तो सांगतो.

व्यायाम करताना अनेक अडथळे समोर येतात, त्या वेळी स्वत:ला मोटिवेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचे असल्याचे तो सांगतो. स्वत:च्या शरीरासाठी, मनासाठी आपण काही तरी करतो आहोत, हीच भावना आपल्याला आनंद देणारी असते, असे तो सांगतो आणि जेव्हा असा आनंद होतो तेव्हा शरीरासाठी अपायकारक ठरणाऱ्या गोष्टींपासून आपण आपोआपच दूर होतो, असा आपला अनुभव असल्याचेही त्याने सांगितले. हेच फिटनेसचे रहस्य आहे ते लवकरात लवकर समजून घेऊन व्यायामाला लागा, असे आवाहनही त्याने के ले.

viva@expressindia.com