कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या स्क्रीनआडून तुम्ही आता दुकानातले कपडे ट्राय करू शकता, गॉगल हातात न घेताही तो तुमच्या डोळ्यावर कसा दिसेल ते बघू शकता, वेगवेगळा मेक-अप चढवून बघू शकता.. तेही प्रत्यक्ष दुकानात पाऊलसुद्धा न ठेवता! हे शक्य होतंय व्हच्र्युअल ट्रायल रूम्सच्या माध्यमातून. ई-शॉपिंगची दुनिया आता अधिक मोहमयी होतेय ती या कन्सेप्टमुळे.
‘आपली पिढी ही कदाचित शेवटची पिढी असेल जिच्या पेरेंट्सना ब्राउझ हिस्ट्री, लास्ट सीन, हिडन फाइल्स हे प्रकार माहीत नसतील.’ फेसबुकवर सहज म्हणून वाचलेलं हे वाक्य किती खरंय हे सतत जाणवत असतं. एवढंच नाही तर जुनी पिढीही फेसबूक, ट्विटर समजून घ्यायला लागली आहे. पण आता टेक्नॉलॉजीचं हे लोण फक्त सोशल मीडियापर्यंत राहिलं नाही, ई-शॉिपग, ई-मार्केटिंगपर्यंत पोचलंय. हल्ली प्लॅस्टिक मनी आणि त्यानं होणारे ऑनलाइन व्यवहार यांची चलती आहे. तरीही पाश्चिमात्य देशांच्या मानानं भारतात ई-शॉिपग म्हणावं तितका जोर पकडत नव्हतं. भारतातला मूळ यंगिस्तान म्हणवणारा क्राऊड इतर बाबतीत अगदी टेक्नोसॅव्ही असला तरी ऑनलाइन शॉपिंगपासून चार हात दूरच राहिला होता. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इंटरनेटवरून शॉपिंग करताना हात लावून बघण्याचा फील येत नाही. वस्तू प्रत्यक्ष कशी दिसेल ते कळतच नाही. म्हणजे ऑनलाइन शॉपिंगमध्ये ‘ट्रायल’ हा अडथळा दिसत होता. आता मात्र हळूहळू चित्र बदलतंय. कारण ऑनलाइन शॉपिंगच्या साइट्स हल्ली ट्रायलही द्यायला लागल्यात आणि तेही व्हच्र्युअल पद्धतीनं. अगदी रोज घरी घालायचा टी-शर्ट घ्यायचा असेल तरी चार टी-शर्ट्स घालून मग त्यातला एक घेण्याचा आपला िपड आहे. नेटवर प्रत्येक गोष्टीचा फोटो आणि डिटेल्स तर असतात, पण ती गोष्ट आपल्यावर नक्की कशी दिसते हे मात्र कळत नव्हतं. याचंच उत्तर आहे ही आपल्याकडे नव्याने येऊ पाहणारी ई-ट्रायलची संकल्पना.
 ई-ट्रायल म्हणजे घरच्या घरी तुमच्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉपसमोर बसून तुम्हाला हव्या त्या गोष्टींची ट्रायल घ्यायची आणि मग ती गोष्ट ऑर्डर करायची. सध्या अनेक वेबसाइट्स आपल्या ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी ही क्लृपी वापरत आहेत. यामध्ये कपडे, अ‍ॅक्सेसरीज, दागिने, शूज, चष्मे, गॉगल असं सगळं व्हच्र्युअली घालून बघता येतं. ‘पॉलीवूर डॉट कॉम’सारख्या काही साइट्स तर तुम्हाला हवा तसा संपूर्ण लूक तयार करून देतात. येथे तुम्हाला एक कॅनव्हास दिला जातो. त्यावर तुमच्या थीमनुसार बॅकग्राऊंड चित्र, काही टॅग लाइन आणि तुमचा ड्रेस असा संपूर्ण लूक तयार करून अपलोड करू शकता. यातील कपडे आणि अ‍ॅक्सेसरिज साइटवरून विकत घेण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. पुन्हा हे कलेक्शन तुमच्या सोशल नेटवìकग साइट्सवर अपलोड करून तुमच्या मित्रमंडळीकडून त्याविषयी मत घेऊ शकता.
झोवी.कॉम ने ‘झोवी आय’ म्हणून एक अ‍ॅप डेव्हलप केलंय. यात तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे निवडायचे आणि तुमच्याकडील वेबकॅमच्या सहाय्याने तुमचा फोटो वेबसाइटवर अपलोड करायचा. मग ती वेबसाइट तुम्ही निवडलेले कपडे तुमच्या अंगावर चढवून तुम्हाला दाखवेल. याच प्रोसेसला अजून वास्तववादी करण्याचा प्रयत्न ‘येभी.कॉम’नं केलाय. येथे तुम्हाला ‘ट्राय अँड बाय’ या संकल्पनेनुसार कपडय़ांपासून शूजपर्यंत सर्व गोष्टी घरी ट्रायलला मागता येतात. तुम्ही घरच्या घरी ट्राय करून आवडल्यास गोष्टी विकत घेऊ शकता.
ब्युटी आणि मेकअप ब्रँन्ड्ससुद्धा या स्पध्रेत मागे नाहीत. ओरीफ्लेम, लॅक्मे, रेव्हलॉन सारख्या नामवंत मेकअप ब्रँड्सनी त्यांच्या वेबसाइटवर अशा प्रकारची अ‍ॅप्स उपलब्ध करून दिली आहेत. यात तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा फोटो अपलोड करायचा किंवा त्यांच्या डेटाबेसवरच्या मॉडेलपैकी तुमच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता वर्ण, फीचर्स असणाऱ्या मॉडेलचा फोटो निवडायचा. त्यावर हवा तो आणि हवा तसा मेकअप करायचा आणि फोटो सेव्ह करायचा. लिपस्टिकचा कोणता रंग, कोणत्या आय श्ॉडोबरोबर सूट होईल आणि कुठली मेकअप किट आपल्या बजेटमध्ये बसेल याचा हिशेब आपल्याला मांडणे कधीकधी जिकरीचे होऊन जाते. त्यावर हे अ‍ॅप मदत करतं.
असाच एक प्रयोग ‘लेन्सकार्ट डॉट कॉम’ने केलेला आहे. येथे सनग्लासेस किंवा चष्मा निवडण्यापूर्वी तुमचा फोटो अपलोड करून त्यावर सूट होईल तो चष्मा किंवा सनग्लास निवडण्याची मुभा तुम्हाला दिली जाते. याच प्रमाणे ‘व्हच्र्युअल ट्रायल रूम डॉट कॉम’ या वेबसाइटवरून तुम्ही ज्वेलरीचा ट्रायलही फोटो अपलोड करून घेऊ शकता.
नुसती ट्रायल नाही मोफत स्टायलिंगही
तरुणाईसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यांची स्टाईल किंवा लूक. अनेकदा बॉलीवूड सिलीब्रिटीज आणि पेज ३ मंडळींना छानपकी तयार झालेलं पाहून आपल्यालाही असंच तयार करणारा स्टायलिस्ट असावा, असं वाटतं. आपल्या स्टायलिस्टनी आपल्याला कपडे, अ‍ॅक्सेसरीजबद्दल गाइड करावं अशी खूप जणांची इच्छा असते आणि हल्लीच्या प्रोफेशनल वातावरणात आणि करियर ओरिएन्टेड जगात ऑफिस, पार्टीज किंवा मीटिंग्समध्ये तुम्ही स्वत:ला कसे सादर करताय याला फार महत्त्व असतं. अशावेळी फक्त महागडय़ा गोष्टी विकत घेऊन चालत नाही, तर त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे कॅरी केल्या पाहिजेत. हीच गरज ओळखून ‘व्रुनिक.कॉम’, ‘स्टाईलक्रॅकर.कॉम’, ‘20ड्रेसेस.कॉम’ अशा साईट्स येऊ लागल्या आहेत.
‘20ड्रेसेस.कॉम’ वर गेल्यास अगदी सुरुवातीला वेबसाइटवर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी काही प्रश्न विचारले जातात. त्यांची उत्तरं दिल्यावर, फ्री रजिस्ट्रेशन केल्यावर तुमच्या आवडीनुसारच कपडे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात. ‘व्रुनिक.कॉम’ वर गेल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशननंतर त्यांच्या स्टायलिस्टशी चर्चा करून तुमच्या लूकविषयी सल्ला मिळवता येतो. आणि ही सर्व प्रोसेस फ्री असते. तुम्हाला फक्त तुमच्या कपडय़ांचे पसे चुकवायचे असतात. ‘स्टाईलक्रॅकर.कॉम’ ही काही स्टायलिस्टनी एकत्र येऊन सुरू केलेली साइट आहे. यावर मेंबरशीप घेतल्यावर तुमचा अख्खा वॉर्डरोब स्टायलिस्टकडून डिझाइन करून मिळतो. त्यांचे स्टायलिस्ट तुमच्याबरोबर शॉिपगलासुद्धा येतात. तुम्हाला तुमच्या पसंतीचे कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज कुठे उत्तम किंमतीत मिळू शकतील याबद्दल येथे मार्गदर्शन केलं जातं. तसंच ब्रँण्ड्सच्या सेलची खबर तुम्हाला सगळ्यात पहिली मिळते. त्याचबरोबर तुमच्या हेअर आणि फेस मेकअपची काळजीसुद्धा घेतली जाती.       
त्यामुळे आता ‘शुरू हो जाव.’ तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार घरी बसल्याबसल्या यांपकी एक पर्याय निवडून तुमचा शॉिपग अनुभव अजून सुकर बनवू शकता. गरज आहे ती फक्त विवेकानं विचार करण्याची. ऑनलाइन शॉपिंगची दुनिया अधिक मोहमयी होण्याच्या मार्गावर आहे. या मोहजालात अडकणार नाही याची काळजी घेऊनच याचा आनंद घेतला पाहिजे.

काय आहेत व्हच्र्युअल ट्रायल रूम्स
ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाइट आता व्हच्र्युअल ट्रायल रूम्स द्यायला लागल्या आहेत. स्टाइल स्टुडिओ, मेक-अप स्टुडिओ, ट्रायल रूम, फिटिंग रूम अशा कुठल्याही नावानं या साइटवर असतात. या इंटरॅक्टिव्ह अ‍ॅप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमचा फोटो अपलोड करायचा आणि मग फक्त एकेकदा क्लिक करून वेगवेगळे ड्रेस ट्राय करू शकता. त्या फोटोला हे कपडे आपोआप चढवले जातात. फक्त कपडेच नाही तर तुमचा पूर्ण लूक यातून तयार करू शकता. शिवाय जोडीला काही स्टायलिंग टिप्स आणि सजेस्टेड लुक्स असतातच. ज्यांना आपला फोटो अपलोड करायचा नाही त्यांच्यासाठी काही साइट्स मॉडेल्सचाही ऑप्शन देतात. आपल्या रूपाला, उंचीला, वर्णाला आणि अंगकाठीला साजेशी मॉडेल निवडायची आणि तिच्या फोटोवर ड्रेस घालून आपला ड्रेस निवडायचा.

ई ट्रायल्स क शाकशाच्या?
व्हच्र्युअल ट्रायल रूम्स प्रामुख्याने कपडय़ांसाठी असल्या तरी दागिने, बूट, पर्स, चष्मे, गॉगल या अ‍ॅक्सेसरीजदेखील ट्राय करायला वाव असतो. आपल्या फोटोला चष्मा कसा दिसेल ते थेट तुमच्या स्क्रीनवर दिसतं आणि तो फोटो सेव्ह करून शेअर करायचाही ऑप्शन असतो. अगदी मेक-अपसुद्धा ट्राय करून शकता. परदेशात बहुतेक लोकप्रिय ब्रँड स्टोअर्सनी ऑनलाइन शॉपर्ससाठी अशा फिटिंग रूम्स कधीच उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या लोकप्रियही आहेत. एम अँड एस, झारा या आता आपल्याकडे आलेल्या ब्रँड्सच्या युरोपातल्या साइट्सवर ती सोय आहे. आता आपल्याकडेही ऑनलाइन बायर्सची संख्या वाढल्याबरोबर या सुविधा यायला लागल्या आहेत.

ऑनलाइन ट्रायल देणाऱ्या काही साइट्स
http://www.20dresses.com
http://www.stylecracker.com
http://www.vroonik.com
http://www.zovi.com
http://www.yebhi.com
http://www.virtualtrialroom.com
http://www.polyvore.com
http://www.lenskart.com
http://www.lakmeindia.com/lakme-salon
http://www.esteelauder.com/LetsPlayMakeover
http://www.revlon.com/Revlon-Home/Interactive-Tools-Menu/Interactive-Face-Tool
http://www.oriflame.com/products/makeup-guide