सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या  व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..

न्यूयॉर्क शहरात गेल्या आठवडय़ात रंगलेल्या ‘मेट गाला पार्टी’मध्ये  सेलेब्रिटीजच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ गाऊन्सची काही दिवस सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. सेलेब्रिटीजच्या लूक्सची दखल लोकांनी घेतलीच, पण त्यासोबत त्यावरून गमतीदार विनोदही तयार करण्यात आले होते. न्यूयॉर्क येथील ‘मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्ट’च्या ‘कॉच्यूम इन्स्टिटय़ूट’कडून दरवर्षी या पार्टीचे आयोजन करण्यात येते. याला ‘कॉच्यूम इन्स्टिटय़ूट गाला’ किंवा ‘मेट गाला’सुद्धा म्हणतात. या संग्रहालयातर्फे दरवर्षी एका थीमवर आधारित कपडय़ांचे प्रदर्शन भरविले जाते. त्यामध्ये जगभरातील नामांकित डिझायनर्सना आपले कपडे सादर करण्याची संधी मिळते. त्यानिमित्ताने ही पार्टी आयोजित केली जाते आणि यंदाच्या पार्टीची थीम ‘चायना : थ्रु द लुकिंग ग्लास’ ही होती. त्यानुसार सेलेब्रिटीजनी आशियायी थीमवर अनुसरून कपडे घातले होते. त्यातील काही सेलेब्रिटीजच्या लूक्सची झलक   दाखवायचा हा प्रयत्न.
मॉडेल रेहानाचा पिवळा धम्मक गाऊनची सर्वाधिक चर्चा झाली. तो लक्षवेधी होता खरा, पण त्याचा लांबलचक ट्रेल बघून सोशल नेटवर्किंगवर याची ऑम्लेट गाऊन म्हणून खिल्लीही बरीच उडवण्यात आली.

   अ‍ॅन vss04हॅथवे : अ‍ॅन आपल्या एलिगंट ड्रेसिंगसाठी ओळखली जाते. या पार्टीमध्येही तिने घातलेला डिझायनर राफा लॉरेन्सचा स्ट्रेट फिटचा सोनेरी गाऊन सिम्पल असला तरी सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. त्यात गाऊनचा हूड तिच्या लुकचा हाय पॉइंट होता.

vss01सारा जेसिका पारकर : साराच्या गाऊनपेक्षा तिचा ब्लॅक अ‍ॅण्ड रेड हेडगीअरने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या ड्रॅगनलाही लाजवेल इतका तिचा हेडगीअर भव्य होता.

vss02लेडी गागा : आपल्या ड्रेसिंगमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लेडी गागाचा या पार्टीमधला ड्रेस मात्र साफ चुकला. ब्लॅक गाऊन विथ व्हाइट निटेड किमोनो तिच्या बॉडीला फोकसमध्ये आणण्यापेक्षा तिला अजूनच बल्की दाखवत होता. त्यामुळे या पार्टीमधील ड्रेसिंगमध्ये ती साफ अपयशी ठरली.

vss03रेहाना : या पार्टीमध्ये सर्वात गाजला रेहानाचा गाऊन. डिझायनर ज्यू पै याच्या या गाऊनमध्ये ती एखाद्या साम्राज्ञीप्रमाणे मिरवत होती. तिच्या या पिवळ्याधम्मक गाऊनचा लांबलचक ट्रेल आणि त्यावरील सोनेरी एम्ब्रॉयडरी सर्वाचे लक्ष वेधून घेत होती.
(संकलन : मृणाल भगत) – viva.loksatta@gmail.com