‘व्हिवा’चा बदललेला लूक खूप आवडला. नवीन कॉलम्स चांगले आहेत. ‘व्हिवा’ म्हणजे तरुणाईसाठी अगदी झकास पुरवणी आहे. टीनएजर्सना जास्तीत जास्त समजून घेणारी, टीन्सना मार्गदर्शन करणारी आणि त्यांच्या लाइफस्टाइलसाठी हवी ती माहिती पुरवणारी अशी ही पुरवणी आहे. म्हणूनच ती चांगली वाटतेय. आता २० फेब्रुवारीपासून बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू होतेय. मनामध्ये भीती आहे, पण त्यासोबत आनंदही आहे. कारण परीक्षा संपल्यावर खूप काय काय करायचं आहे. वर्षभर ज्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्या करायला मिळणार म्हणून उत्सुकता आहे.
– तेजश्री गायकवाड

‘घर सोडून राहताना’ समर्पक
स्वसंरक्षणाय आणि घर सोडून राहताना हे दोनही लेख चांगले होते. स्वसंरक्षणाय मध्ये डेबी स्टीव्हन्सने दिलेल्या टीप्स उपयुक्त वाटल्या. श्रेया अयाचितनं लिहिलेली घर सोडून राहतानाची परिस्थिती अगदी तंतोतंत असते. मनात असेच अनेक विचार घेऊन मैत्रिणी राहात असतात.
– सुदेष्णा माने

‘ओपन अप’ सदर उपयुक्त
व्हिवा पुरवणीतला ‘ओपन अप’ हा नवा कॉलम खूप आवडला. डॉ. वैशाली देशमुख या सदरात तरुणांना पडलेल्या प्रश्नांची पटणारी सोल्युशन्स देतात.
– गायत्री लाड

मंगोलियाची खाद्यसफर भावली
व्हिवाच्या पान ४ वर येणारा खावे त्यांच्या देशा हा कॉलम मला आवडतो. शेफ देवव्रत जातेगांवकर देत असलेली मंगोलिया देशाची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. त्यातली माहिती नावीन्यपूर्ण आहे. ती दिल्याबद्दल धन्यवाद.
-करुणा सूर्यवंशी

‘ओपन अप’मुळे धीर मिळाला
ओपन अप या सदरातून डॉ. वैशाली देशमुख मॅडमचे लेख वाचत असते. मीसुद्धा सध्या नोकरीच्या शोधात आहे. कधी कधी डिप्रेशन येतं. पण या कॉलमधील मागचं आर्टिकल वाचून मला खरंच खूप कॉन्फिडन्स आला. मी सध्या माझ्या आईकडून कुकिंग शिकतेय. त्यामुळे मला खूप छान वाटतंय. आनंद मिळतोय. थँक यू सो मच डॉक्टर वैशाली मॅम.
शर्वरी

@व्हिवा पोस्ट : व्हिवा पुरवणीतील सदरं कशी वाटतात, लेखातील विचार पटतात का, पुरवणी कशी वाटते, ते आम्हाला सांगा. त्याबरोबर या पुरवणीत आणखी काय वाचायला आवडेल तेही शेअर करा. आमच्या viva.loksatta@gmail.com  या मेल आयडीवर व्हिवा पोस्ट असं सब्जेक्ट लाइनमध्ये लिहून तुमच्या सजेशन्स पाठवा.