नवे कॉलम्स चांगले
-‘लोकसत्ता’ आणि व्हिवा टीमला नववर्षांच्या हार्दकि शुभेच्छा! नवीन वर्षांत ‘व्हिवा’ने चालू केलेले कॉलम चांगले आहेत आणि आजच्या जनरेशनला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले वाटताहेत. ३ जानेवारीच्या ‘व्हिवा’मध्ये फॅशन इंडस्ट्री कशी चालते याविषयी दिले आहे. फॅशन विश्वाची ‘ऑफ द रेकॉर्ड’ माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद. मॉडेल्सना पसे कोणाकडून मिळतात? कशाच्या आधारावर मिळतात (निकष काय?) असे काही प्रश्न अद्याप मनात आहेत, त्याला पुरवणीतून उत्तरे मिळतील अशी आशा आहे. व्हिवामधील ‘खाऊचा कट्टा’ हा माझा आवडता कॉलम आहे. या वर्षी चालू झालेले ‘ओपन अप’ आणि ‘व्हिवा वॉल’ हे कॉलमही आवडले. याद्वारे आपण तरुणाईला व्यक्त होण्याचे माध्यम दिले आहे, त्याबद्दल धन्यवाद.  
– चतन्य वाळिंबे

निखळ मैत्रीचा विषय भावला
कॉझ वी शेअर एव्हरीथिंग हा १० जानेवारीच्या अंकातला अनघा पाटीलनं लिहिलेला लेख खूपच भिडला. आवडला. हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद. मला हा विषय फारच जिव्हाळ्याचा वाटतो. मुलगा आणि मुलगी यांची निखळ मैत्री समजून घेतली पाहिजे. आमच्या आसपासचे लोक आमची प्युअर फ्रेंडशिप स्वेच्छेने समजून घेतील अशी प्रार्थना.
– सुहासिनी दुर्वे

अनिताला शुभेच्छा!
‘व्हिवा’च्या १० जानेवारीच्या अंकात  ‘तिचे हिरवे हात’ हा अनिता हाडळविषयी लिहिलेला लेख खूपच आवडला. अनिताचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अनिताला भेटावंसं, तिच्याशी बोलावंसं वाटतंय.  तिच्या कामात काही अडचणी येत असतील तर माझी मदत करण्याची इच्छा आहे. तिच्या भल्या कामाला हातभार लावायला मला आवडेल. अनिताला खूप शुभेच्छा. अशा चांगल्या कामाविषयी, लिहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या समाजाच्या पाठीशी धीटपणे उभ्या राहणाऱ्या आणि नेटानं काम करत करणाऱ्या अशा मुलींची माहिती मिळणं प्रेरणादायी असतं.
– प्रीती वाळिंबे