थंडीचा मोसम सरू झालाय राजेहो, नि तुम्ही अजून घरात काय करताय.. म्हणजे हाडाचे ट्रेकर्स कायमच ट्रेकिंगला तय्यार असतात. पण ज्यांना बाहेर पडायला कारण लागतं, अशांना सांगते की, आता गडावर उन्हाचा रखरखाट कमी असेल. धुकं विरल्यावर वरून दिसणारा व्ह्य़ूदेखील छान असेल.. तो चलो निकल पडो, गडों की ओर.. हे ट्रेकिंग म्हणजे लई भारी काम असतं.. गड चढणं ही फार सोप्पी गोष्ट नाहीये वाटते तेवढी, पण ती तेवढी अवघडही नाही. एकदा माथ्यावर पोहचलात की एकदम बोलती बंद.. कसंये की ते फििलग स्वत:च घेऊन बघायला हवं.
काही दशकं जुन्या ग्रुप्सपासून ते आत्ताशाच्या ग्रुप्सपर्यंत अनेक ट्रेकिंग ग्रुप्स अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यातर्फे वाइल्ड लाइफ टूर्स, अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्ट्स, एज्युकेशनल टूर्स, फॅमिलीसाठी प्लेजर ट्रिप्स आयोजल्या जातात. ट्रेकिंगमध्ये मुलींची संख्या लक्षणीय ठरतेय. आत्मविश्वास, टीमवर्क, अपडेटेड माहिती, अनुभवी सल्ला, स्मोकिंग-ड्रिंकिंगला ठाम नकार नि निसर्गाशी सुसंवाद साधत अनेक ट्रेक्स होताहेत. ११ डिसेंबर, ‘माऊंटन डे’च्या निमित्तानं काही ट्रेकर्सनी त्यांचं मनोगत ‘व्हिवा’शी शेअर केलं.

सुषमा फळसमकर, ट्रेक ओ किंग
  vv06 सह्य़ाद्री नि हिमालयात मी गेली १० र्वष ट्रेकिंग करतेय. गेली चार र्वष वेगवेगळ्या ग्रुप्ससाठी ट्रेक्स-ट्रेल अरेंजही करतेय. आठवणीतल्या हरिश्चंद्र गडाच्या ट्रेकमध्ये आम्ही नॉनस्टॉप १६ तास चाललो होतो. हिमालयातला आवडीचा ट्रेक होता धुंधारकांडी पास. एका बाजूला पूर्ण ग्लेशिअर नि दुसऱ्या  बाजूला वाळूमिश्रित दगड.. वाटाडय़ाच्या अनुभवी सल्ल्यामुळं हा ट्रेक पूर्ण करता आला होता. ट्रेक करताना आयोजकांनी सांगितलेले नियम काटेकोरपणं पाळावेत. तसे नियम न पाळल्यानं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण सह्य़ाद्रीत वाढलंय. हिमालयात होतात ते नसíगक अपघात. दोन्हीकडचा निसर्ग तरी कसा.. इकडे सह्य़ाद्रीचे कडेकपारी कातळ, गड-किल्ले नि हिमालयात बर्फाच्छादित शिखरं नि दऱ्या-निसर्ग. ही दोन्ही ठिकाणं निश्चितच फिरायला हवीत. निसर्गात फिरायचं व्यसन लागलं तर उत्तमच.

अमोल देशमुख, चक्रम हाईकर्स
vv07माझे बाबा चक्रम हाईकर्सचे अध्यक्ष असल्यानं घरात कायमच ट्रेकिंगचे वारे होते. पालकांसोबत मी आठ वर्षांचा असताना पहिला ट्रेक केला होता. तेव्हा आपण काही तरी अ‍ॅडव्हेन्चर करतोय, असं वाटलं होतं. पुढं मॅच्युरिटीसोबत ट्रेकिंगमधला इंटरेस्टही वाढला. लोणावळा-भीमाशंकर ट्रेक लक्षात राहिला तो त्यातल्या खूप अडीअडचणींमुळं. आम्ही दिवसाचे १४ तास चाललो होतो. प्रचंड पावसामुळं सॅकमधलं सगळं सामान भिजलं होतं. हा त्रास सहन करतही आम्ही ट्रेकिंग एन्जॉय केलंच. मान्सूनट्रेकसाठी कोणती काळजी घ्यावी, हे यातून शिकलो. अपघात टाळण्यासाठी ट्रेकिंगची पूर्वतयारी काळजीपूर्वक करावी. ट्रेकिंगसाठीचं लॉजिस्टिकल प्लॅिनग महत्त्वाचं असतं. आत्मविश्वास असेल तरच ट्रेकिंग करणं जमू शकेल. ट्रेकिंग करताना अनुभवाची शिदोरी हवीच. मात्र थोडय़ाशा अनुभवाच्या जोरावर इतरांनाही नेण्यासारख्या गोष्टींचा अतिरेक होतोय. सेल्फीज नि फोटो काढण्याच्या नादात आवश्यक सुरक्षेकडं दुर्लक्ष होतंय. ट्रेकिंगमध्ये शिकणं, अनुभवणं, टीमबििल्डग या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ट्रेकिंग म्हणजे स्वत:चं लाइफ एक्सप्लोर करणं..

सुरभी पेंढारकर
vv08गेली सात र्वष मी घरच्यांसोबत ट्रेक करतेय. शाळेत असताना मला हाइटची भीती नव्हती, पण मधल्या काळात गॅप पडल्यानं हाइटची भीती वाटायला लागली. पण ट्रेकिंगला घरचेच सोबत असल्यानं नि त्यांनी सांभाळून घेतल्यानं माझा आत्मविश्वास नि स्टॅमिना वाढून भीती नाहीशी झाल्येय. दर ट्रेकिंगला एकेक वेगळा अनुभव मिळतो. सह्य़ाद्रीत कितीही बघितलं तरी ते कमीच वाटेल. दरवेळी प्रत्येक गडाचं सौंदर्य नव्यानं जाणवतं. सुरेक्षेचा उपाय म्हणून त्या ठिकाणाची अपडेटेड माहिती मिळवा. वाटाडय़ा सोबत घ्याच. ट्रेकिंगमध्ये मुलींचं प्रमाण अजून वाढायला हवं. ट्रेकिंगबद्दलची भीती मनातून काढून टाकून मुलींनी आपला स्टॅमिना वाढवायला हवा. कास ते महाबळेश्वर हा माझा आवडता ट्रेक. पावसाळ्यातल्या या ट्रेकमध्ये सातारा इतका छान दिसतो.. हिरवागार निसर्ग, छोटे-मोठे धबधबे, मधूनच मोठाल्या पवनचक्क्या.. अशा खूप देखण्या भागातून हा ट्रेक आहे. हा फारसा हेक्टिक नसणारा ट्रेक ट्राय करून बघा..

प्रांजली कुलकर्णी, शिवशौर्य ट्रेकर्स
vv09लहानपणापासून मला फिरण्यासाठी घरून प्रोत्साहन मिळालं. शाळेत मी दार्जििलगला मोठय़ा ट्रेकला गेले होते. आताशा अडीच र्वष सातत्यानं ट्रेकिंगला जातेय. आता मला एनआयएममध्ये जायचंय. थ्रिल नि कठीण असा रायगडचा ट्रेक होता. दुसरा होता मुल्हेर-साल्हेरचा ट्रेक. तर पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमण मोहिमेत नदी, जंगलं, पठारं, चढ असं सगळंच अनुभवता येतं. ट्रेकिंग म्हणजे स्वत:चाच शोध घेणं. वेळेचं महत्त्व पदोपदी शिकणं. कठीण गोष्टी पार करून पुढं चालणं. ट्रेकिंगमधले सगळेच प्रकार महत्त्वाचे असतात नि खऱ्या ट्रेकरला ते अनुभवायची उत्सुकता हवी. काही पॅशनेट ट्रेकर्सना स्वत: इतिहास जाणून घेऊन तो इतरांपर्यंत पोहचवायचा असतो. तर काही जण ट्रेकिंगचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यातच धन्यता मानतात. ते ट्रेकची मजा घालवतात. ट्रेकिंग हा फार अवघड प्रकार असतो, ही समजूत दूर सारून मुलींनी ट्रेकिंगमध्ये इंटरेस्ट घ्यायला हवा.

ओमकार जुवेकर, हायब्रीड ट्रेकर्स
vv29गेली सात र्वष मी ट्रेकिंग करतोय. कॉलेजमधल्या प्रोफेसरांसोबतचा राजगड-तोरणा या पहिल्याच ट्रेकिंगचा अनुभव अविस्मरणीय होता. प्रचंड पाऊस नि सततच्या चालण्यानं मी खूप दमलो होतो. पंधराएक वेळा पडलो होतो. एवढं झाल्यावर मी पुन्हा ट्रेकला येणार नाही, अशी इतरांना खात्रीच वाटत होती. परतल्यावर तापही आला होता. हे चॅलेंज आवडून मी पुढल्या वर्षीही ट्रेक केला. नंतरच्या वर्षी ट्रेक न झाल्यानं चुकल्यासारखं वाटलं त्यामुळं २०१० मध्ये आम्ही बायोटेक ग्रॅज्युएट्सनी मिळून हायब्रीड ट्रेकर्स हा ग्रुप तयार केला. H-Heights, Y-Youth, B-Bindaas, R-Refresh, I-Intense, D-Determination हा त्याचा फुलफॉर्म. फक्त डिपार्टमेंटपुरता मर्यादित असणारा हा ग्रुप आता विस्तारलाय. सुरक्षेचा उपाय म्हणून स्वयंसेवकांची मदत, साऊंडकॉल सिस्टमचा वापर इत्यादी काळजी घ्यावी. ट्रेकिंग म्हणजे टेस्ट युवरसेल्फ. आपल्यात दडलेले गुण शोधणं, ते प्रयत्नपूर्वक वाढवून ध्येय गाठल्यानं आत्मविश्वास वाढतो. थ्रिलसोबत काही तरी वेगळं केल्याचं समाधानही मिळतं.

भूपाली वझे, भरारी गिर्यारोहण
vv28गेली १२ र्वष मी ट्रेक-ट्रेल करतेय. सहावीत बहिणीसोबतचा पहिलाच राजमाचीचा ट्रेक खूप आवडला. ट्रेकिंगदरम्यान आपल्या क्षमतांचा शोध लागतो. परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. हल्ली ट्रेकिंग म्हणजे पार्टीसाठीची पर्वणी असा अ‍ॅप्रोच काही जणांमध्ये वाढतोय. त्यांना गडाची कसलीच कथाकाळजी नसते. काही गडांचे पिकनिक स्पॉट केले गेल्यानं वाईट वाटतं. गडांच्या िभतींवर नावं कोरणं, कचरा करणं असे प्रकार थांबवण्याविषयी हळूहळू जागृती होतेय. सुरक्षेच्या दृष्टीनं लीडर-वाटाडय़ाचं ऐकावंच. ओव्हरकॉन्फिडन्सला थारा देऊ नये. ट्रेकिंगमध्ये झालेली फ्रेण्डशिप क्लोज असते नि लाँग लािस्टग टिकते. माझ्या आठवणीतला ट्रेक होता अलंग-मलंग-कुलंग. बरेच अवघड पॅचेस असणारा हा ट्रेक सगळ्यात कठीण वाटला होता. दरवर्षीच्या पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमण मोहिमेमुळं मी वर्षभरासाठी रिचार्ज होते..

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.