14 December 2017

News Flash

वुई आर सोशली स्मार्ट..

एक काळ होता जिथे मुलांच्या हातात वाचनाचं पुस्तक असायचं किंवा बॅटमिंटनचं रॅकेट.. सुट्टी पडल्यावर

मुंबई | Updated: February 15, 2013 1:11 AM

एक काळ होता जिथे मुलांच्या हातात वाचनाचं पुस्तक असायचं किंवा बॅटमिंटनचं रॅकेट.. सुट्टी पडल्यावर किंवा घरबसल्या काहीतरी टाइमपास म्हणून चेस खेळण्याची किंवा पत्त्याचा डाव मांडण्याची लगबग असायची. पण आता मात्र काळ खूप बदलला. काळाबरोबर मुलंही स्मार्ट झाली. आता हे सर्व खेळ ते एकटय़ाने खेळू लागलेत. स्मार्ट फोनच्या संगतीने तरुणाई घरबसल्या अनेक नानाविध खेळांची मजा लुटत आहेत. हा स्मार्ट फोन हातात असला म्हणजे चारचौघांतही जरा भाव वधारतोच. म्हणूनच चारचौघांत एक स्टेटस् सिम्बॉल म्हणून स्मार्ट फोन घेण्याकडे तरुणांचा कल वाढू लागलाय सांगतोय विनय उपासनी.  
(स्वतचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी आपल्याकडे म्हण आहे. म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याचं भारी आकर्षण असतं प्रत्येकाला. पूर्वी बायका दुपारच्या वेळी, पुरुषमंडळी पारावर तर तरुणमंडळी कट्टय़ावर बसून गावगप्पा हाणायचे. अमक्याचं अन् तमकीचं काय चाललंय हाच या गप्पांचा विषय. पूर्वीसारख्या त्या शिळोप्याच्या गप्पा नाहीत अन् तो पार नाही की कट्टाही नाही. तरीही हे सर्व सुशेगादपणे सुरू आहे. फक्त त्याचं स्वरूप बदललंय. फेसबुक, ट्विटर, स्मार्ट फोन हे त्याचं नवं माध्यम..)

क्रिशच्या स्मार्ट फोनवरची एसएमसची िरगटोन भल्या पहाटे (म्हणजे सकाळी दहा वाजता) वाजली. क्रिशने फोनवर झडपच घातली. सुन्याचा एसएमएस वाचून हलकंसं स्मित केलं आणि दिली एक स्मायली पाठवून..
एव्हाना जगभर (म्हणजे त्याचं फ्रेण्ड सर्कल) झाली होती ती बातमी..
क्रिशचं लग्न ठरलं ही बातमी एव्हाना वाऱ्यासारखी पसरली होती. आणि क्रिशच्या फेसबुक, ट्विटरच्या अकाउंटवर शुभेच्छांचा वर्षांव सुरू झाला होता.

प्राजक्ताच्या स्मार्ट फोनवरची एसएमसएसची िरगटोन वाजली. त्रासिक मुद्रा करूनच तिने मोबाइलकडे पाहिलं. ‘काय कटकटे’ असं पुटपुटत तिनं एसेएमएस वाचला. वैतागलीच.. परत का म्हणून मीच जायचं.. तिला काय धाड भरलीय.. ती सारखी ऑफिसला दांडय़ा मारते आणि मला तिचं काम करावं लागतं. ‘कमी तिथं आम्ही’ आणि त्याला एक त्रासिक स्मायली जोडून दिलं त्या एसेएमसला उत्तर तिनं..

ही वीरूच्या मोबाइलवरची एसएमएसची िरगटोन.. एसएमएस वाचून वैतागला.. च्यायला आजपण गेला का सेन्सेक्स खाली. आपलं नशीबच खत्रुड.. कालच शेअर्स घेतले आणि आज भाव कोसळले. तरी ही नाही म्हणत होती. पण आपण गेलो फुशारक्या मारायला. आणि आता सेन्सेक्सच्या तोंडावरच आपटलो.

ही झाली प्रातिनिधिक उदाहरणं. म्हणजे जग खेडं बनतंय ना त्याचं हे एक उदाहरण. एखाद्या गावात कसं जरा जरी खुट्ट झालं की त्याची खबर अख्ख्या गावाला पोहोचते. तसंच आता या स्मार्ट फोन, अ‍ॅप्स, अँड्रॉइड, ट्विटर, टॅब्ज वगरेंमुळे झालंय. जगात काहीही घडलं की क्षणार्धात ते तुमच्या तळहातावर येऊन विसावतं. म्हणजे तळहातावर असलेल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून ते जगभर पोहोचतं. एक मात्र खरं की कम्युनिकेशन गॅप वगरे आपण म्हणतो ना ती यामुळे कमी झालीय. तुम्हाला काही बोलायचंय, एखाद्या घटनेवरील तुमचं मत मांडायचंय खुशाल ट्विट करा, कमेंट टाका, किंवा उपलब्ध अ‍ॅपवर जाऊन तुमचं म्हणणं मांडा.. कोणाला काय वाटेल याची फिकीर नाही. लाइक आणि डिसलाइक करायला आहे की हो इतरांना वेळ. तुम्ही तुमचं मत मांडलंत की येतात हजारो लाइक्स आणि डिसलाइक्स.
दिल्लीतील त्या भयंकर घटनेनंतर नाही का तरुणाईने याच तंत्रज्ञानाचा वापर करून जनमत तयार केलं. आताही अफझल गुरूला फाशी देणं योग्य ठरलं की नाही याची ऊहापोहवजा चर्चा व्हॉट्स अ‍ॅपवर चालू आहेच की. दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोणत्याही विषयावर चर्वतिचर्वण करता येतंय ना, झालं तर मग. तुम्हाला तुमची मतं छतावर जाऊन लाउडस्पीकर हातात घेऊन मोठमोठय़ाने सांगावी तर लागत नाहीए ना. क्रिश, प्राजक्ता, वीरू ही याच स्मार्ट पिढीतली.
देश बदल रहा है.. तुमचं काय चाललंय मंडळी.. व्हॉट्स अप.. उठाओ फोन और हो जाओ स्मार्ट.
त्याला एक त्रासिक स्मायली जोडून दिलं त्या एसेएमसला उत्तर तिनं..

आदिती राव हैदरी
‘मर्डर थ्री’साठी मला मोबाइलचा व त्यावरच्या सुविधांचा भरपूर उपयोग झाला व या माध्यमाचे महत्त्व व ताकद समजली. घरी बसून, विशेष फिल्मच्या कार्यालयात बसून, प्रवासात वगैरे मोबाइलवरून मुलाखती- फोटो- एसएमएस- ईमेल वगैरे बरेच काही करू शकले. मोबाइल ही खरीखुरी ‘माध्यमक्रांती’ व संपर्कसुविधा आहे. व्यक्तिगत व व्यावसायिक असे दोन मोबाइल मी वापरते. पण प्रत्यक्ष भेटीतील संवाद- सुसंवाद- सहवास यातील भावभावना व आनंद मला जास्त महत्त्वाचा वाटतो. ती गंमत वा सहजता मोबाइलमध्ये नाही. त्यात ‘नवे जग’ मात्र आहे.

मनीषा केळकर
माझ्याकडे ब्लॅकबेरी व आयफोन-फाइव्ह असे दोन मोबाइल आहेत. एक अत्यंत व्यक्तिगत आहे. ‘ह्य़ांचा काही नेम नाही’ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी केदार सर व भरतने ते लपवले व मस्त पार्टी मागितली. ‘वंशवेल’च्या सेटवरदेखील राजीव पाटील सर व सुशांत शेलारने माझे मोबाइल लपवून मला हैराण केले, तेव्हा ‘माझे निदान मेमरी कार्ड द्या’ असे त्यांना म्हणाले. मला लहानपणापासून कॅमेऱ्याची अर्थात कुठेही गेलो तरी फोटो काढण्याची असणारी हौस-मौज मोबाइल कॅमेऱ्याने प्रचंड प्रमाणात पूर्ण होत आहे. माझ्या पप्पांमुळे (पटकथाकार राम केळकर) मला फोटो काढण्याची सवय लागतानाच त्यातून आठवणी तयार व कालांतराने जाग्या होतात. म्हणजेच माझा मोबाइल माझ्यासाठी ‘माय कॅमेरा’ आहे, पण सेटवर बऱ्याचदा तो इकडेतिकडे पडलेला असतो. रिंगटोन म्हणून माझ्या नवीन चित्रपटाचे गाणे असते, सध्या ‘बंदूक’चे आहे. अथवा ‘अग्नी बॅण्ड’ माझा फेव्हरेट आहे.

कांचन अधिकारी
मी दोन मोबाइलचा वापर करते, यामागे काही विशेष कारणे आहेत, ‘मी मराठी’ वाहिनीवर मी ‘सलाम’ नावाचा कार्यक्रम सादर करीत असताना महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेला संवाद साधण्याचे आवाहन करायचे तेव्हा माझा मोबाइल नंबर खूप सहजपणे सगळीकडे पोहोचला, म्हणून मी ‘व्यक्तिगत’ कारणास्तव दुसरा मोबाइल वापरू लागले. मग ‘दिलखुलास’ कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील नामवंतांशी संवाद वाढला.. मी स्वत: ‘प्रेमळ’ असल्याने एका मोबाइलवर ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये’ गाणे आहे. दुसऱ्यावर राजेश खन्नावरील प्रेमाखातर ‘गुनगुना रहे है भँवरे’ टाकले, पण काही दिवस तेथे ‘लग जाए गले’ गाणे असताना अनेक जण गमतीत काही बोलत. पूनम धिल्लॉन म्हणायची, अगं हेच गाणे लावण्याची तुझ्यावर वेळ का आली..

सई लोकूर
मोबाइल प्रचंड उपयुक्त व स्टाइलीश आहे. इंटरनेट, मेसेजेस, फेसबुक या माध्यमातून सतत लोकांच्या सहवासात राहता येते. विशेषत: मराठी चित्रपटसृष्टीत कोणाचे काय काय, कसे कसे चालले आहे याची सतत ‘ताजी खबर’ मिळत राहते. मेसेजेस सुविधेमुळे तर आता ‘कॉलिंग’चीही गरज कमी होऊन पैसे वाचू लागले आहेत. तशी मी मोबाइलवर कामाशिवाय फार बोलतही नाही. सतत नवे फोटो काढणे-अपलोड करणे यासाठीही मला मोबाइल प्रिय. माझ्याकडे ब्लॅकबेरी ९६३० आहे. मुलींना पांढऱ्या रंगाचा, तर मुलांना सिल्व्हर अथवा काळ्या रंगाचे मोबाइल सूट होतात. पांढऱ्या रंगाच्या मोबाइलच्या मागील बाजूला अनेक रंगांची ‘कव्हर’ बदलता येतात, मी ती माझ्या कपडय़ांप्रमाणे बदलते. माझ्या बबली इमेजला ते अगदी छानच शोभते. मी मोबाइल-संस्कृतीने प्रचंड एक्साइट झाले आहे. त्यातील नावीन्यावर माझे लक्ष असते.

सोनाली बेंद्रे
मी दोन मोबाइल वापरते, पण दोन्ही अत्यंत खाजगी आहेत. माझा एखादा नंबर कुठून तरी मिळवला व फिरवला तरी त्याचा काहीही उपयोग नाही. फक्त ओळखीचे क्रमांकच मी अटेन्ड करते. त्यातही पुन्हा माझ्या हातात सतत मोबाइल नसतो, घरी असल्यावर मी माझ्या आवडीच्या कामाला प्राधान्य देते, तेव्हा मोबाइल कोणत्या तरी रूममध्ये असतो. ऑफिस व शूटिंगला असतानाही कामालाच प्राधान्य! फक्त कौटुंबिक संपर्कासाठीच मोबाइलवर लक्ष ठेवते. उगाचच टाइमपाससाठी संपर्क साधणाऱ्यांकडे मी लक्षच देत नाही. आठवडाभरचे एसएमएस एकदम वाचते व मग उत्तर देते, तेदेखील किती व कसे महत्त्वाचे आहेत यावर अवलंबून आहे. मी मोबाइलला चिकटून घेतलेले नाही.

First Published on February 15, 2013 1:11 am

Web Title: we are socially smart