12 August 2020

News Flash

लॉकडाऊन आणि लगीनघाई!

लग्नसोहळ्याचा हा थाटमाट कमी झाला असला तरी ते पूर्णपणे थांबलेले नाहीत.

तेजश्री गायकवाड

लगीनघाई हा आपल्याकडे तसा मोठा जिव्हाळ्याचा विषय.एप्रिल – मे महिना म्हणजे सुट्टीसोबत लग्न एन्जॉय करायचे महिने. या महिन्यात हमखास लग्नं होतात. पण यंदा लॉकडाऊनमुळे आपल्या या एन्जॉयमेंटवर पाणी फिरलं आहे. आणि तरीही अनलॉकच्या पहिल्या टप्प्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. आता पुन्हा एकदा अनेकांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे, पण आता यापुढे आपल्याला ‘न्यू नॉर्मल’प्रमाणेच लग्नं करावी लागणार आहेत हे लक्षात घेऊन लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये अनेक बदल झाले आहेत.

लग्नकार्य म्हटलं की घरची मंडळी एकत्र येऊन कित्येक महिने नियोजन आणि खरेदीचा घोळ घालत आनंदसोहळा साजरा करत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे या घरच्या कार्याची जागा आता होमवेडिंग्ज या प्रकाराने घेतली आहे. लॉकडाऊन आणि कोविडमुळे ज्यांची लग्ने लांबणीवर पडली आहेत अशा हजारो जोडप्यांसाठी ‘भारत मॅट्रीमोनी’ यांनी मॅट्रीमोनी डॉट कॉमसह  ‘होमवेडिंग्ज’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. सरकारने सांगितलेल्या लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करत ५० अतिथींसाठी ग्राहकांच्या घरी विवाहसोहळा आयोजित क रून देणं म्हणजे ही नवी होमवेडिंग्ज सेवा. होमवेडिंग्ज या संकल्पनेबद्दल  सांगताना मॅट्रीमोनी डॉट कॉमचे मॅरेज सव्‍‌र्हिसेसचे मुख्य व्यवसाय अधिकारी वेंकटरमणी सुरेश सांगतात, ‘एकमेकांची मनं जुळली आहेत, पसंतीही झाली आहे आणि लग्नही ठरलं होतं, पण लॉकडाऊनमुळे सगळंच अडकलंय अशा जोडप्यांशी के लेल्या सततच्या चर्चेतून ही संकल्पना सुचली.  यामध्ये आम्ही लग्नकार्यात वेगवेगळी कामे पार पाडणाऱ्या किं वा सेवा देणाऱ्यांनाही सहभागी करून घेतलं आहे. यामुळे अनेकांना बेरोजगारीतून थोडी का होईना वाट सापडेल असं आम्हाला वाटतं. होमवेडिंग्जच्या माध्यमातून दरमहा १००  पेक्षा जास्त विवाहसोहळे आयोजित करण्याचा मानस आहे’, असे त्यांनी सांगितले.

घरच्या लग्नातील हरकाम करणाऱ्या नारायणाची जागा आता या कं पन्यांनी घेतली आहे. कोविड काळात होणाऱ्या या लग्नसमारंभाचा नूरच वेगळा असणार आहे. इथे लग्नाच्या कार्यालयात शिरताना हॉल किती भव्य, सजावट कि ती सुंदर याकडेही लक्ष जाणार नाही की लग्नाला जमलेल्या नववधूच्या मैत्रिणींचे चेहरे न्याहाळणेही अवघड होणार आहे. कारण लग्नातल्या या सगळ्या गोष्टी आता कशा बदलेल्या असतील हे सांगताना वेंकटरमणी म्हणतात, वेडिंग एक्सपर्ट ग्राहकांना सर्वोत्कृष्ट केटर्स, मेकअप आर्टिस्ट, डेकोरेटर्स, पुरोहित आणि बरेच काही घबसल्या शोधून देण्यास मदत करतील. घरातच राहून तुम्ही सगळे नियोजन करू शकाल. यात आता आम्ही महत्त्वाच्या सेवा देणार, त्यात अल्कोहोल—आधारित सॅनिटायझर्स, फेस मास्क, शिल्ड आणि ग्लोव्ह्ज प्रत्येकाला दिले जातील. शिवाय, कार्यालयात तापमान तपासणीमापक बंधनकारक असणार आहे.  ग्राहकांची पसंती आणि त्यांच्या बजेटनुसार पुरोहित, केटर्स, सजावटकार, मेकअप कलाकार आणि छायाचित्रकार मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत.

लग्नघरात कामं करण्यासाठी अनेक माणसांची गरज लागते, सध्या हे काम एक टे वेडिंग प्लॅनर्स आपल्या खांद्यावर घेतात. वधू आणि वराच्या मनातला भव्यदिव्य आणि हटके  लग्नसोहळा साजरा करण्यासाठीचे नियोजन करताना या वेडिंग प्लॅनर्सचा कस लागतो. सध्या तर लॉकडाऊनच्या या काळात हे आव्हान अधिकच वाढले आहे, असे ‘ एस.आर.के. वेडिंग आणि इव्हेंट प्लॅनर’चे वीरेंद्र कांबळे सांगतात. ‘भारतामध्ये लग्न हा मोठा व्यवसाय आहे. अनेकांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. या आधी अशी परस्थिती कधीही उद्भवली नव्हती. त्यामुळे या व्यवसायात आता झालेले बदल आम्हीही पहिल्यांदाच अनुभवतो आहोत. बदलती आर्थिक परस्थिती बघता आम्ही आमच्या पॅकेजेसमध्ये बदल केले आहेत. वेडिंग प्लॅनरचा हा व्यवसाय आणि यातली स्पर्धा हे दोन्ही दृष्टिकोन सध्या बाजूला ठेवून  हा  आम्ही कमीतकमी टीमसह वधू आणि वर दोन्हीकडच्यांना चांगल्या पद्धतीने लग्नसोहळा कसा करता येईल यासाठी मदत करत आहोत. हॉल जास्त प्रमाणात उघडलेले नाहीत, त्यामुळे एकतर राहत्या ठिकाणी ही सोय करावी लागते. सोसायटीची परवानगी मिळत नसेल तर आम्ही फार्महाऊसचाही पर्याय ठेवला आहे. अर्थात, दोन्ही ठिकाणांपैकी कु ठेही लग्न करायचे झाले तर परवानग्या घेण्याची प्रक्रिया पार पाडावीच लागते, असे ते सांगतात. सजावटीमध्येही उपलब्ध साहित्यातूनच सजावट  केली जाते आहे. प्रवेशद्वारावर एकवेळ काहीही सजावट नसली तरी चालेल पण सॅनिटायजर, तापमान मोजायचं मशीन हे हवंच. बैठक व्यवस्थेतही मोठा बदल करावा लागतोय. अंतर ठेवून पण आकर्षक बैठक व्यवस्था करण्यावर आमचा भर आहे. आमच्या या कामात जास्त धोका आमच्या मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसरला आहे. त्यांना पीपीई किट घालूनच काम करावं लागतं. त्यामुळे अगदी मोजक्या पन्नास लोकांचा सोहळा असला तरी त्याचे नियोजन मात्र सध्या थकवणारे आहे, असे कांबळे यांनी सांगितले.

लग्नात अनेक गोष्टी करायच्या राहिल्या तरी इतकं  दु:ख होत नाही जेवढं लग्नात फोटो काढले नाही तर होतं. लग्नाचा फोटो आल्बम म्हणजे प्रत्येक जोडप्यासाठी अमूल्य ठेव असते. सध्या तर प्रीवेडिंग फोटोही प्रोफे शनल फोटोग्राफरकडूनच काढून घेण्याचा हट्ट असतो. कोविड काळात अशा पद्धतीने फोटोसेशन हे एक आव्हान ठरतंय असं वेडिंग फोटोग्राफर रोहित नागवेकर म्हणतो. ‘गेली काही वर्ष प्रचंड ट्रेण्डमध्ये असलेलं प्री वेडिंग फोटोशूट प्रकरण सध्या या काळात पूर्णपणे बंदच झालं आहे. प्री वेडिंग फोटोशूटसाठी प्रसिद्ध असलेल्या सगळ्याच जागा आता बंद आहेत. लग्नातही फोटो काढण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. एकटय़ाने, प्रत्येक कुटुंबासोबत, अगदी जवळ जवळ उभं राहून पोज न देता मोजकेच फोटो काढण्यावर भर दिला जातोय. मोजके च  लोक असल्यामुळेही जास्त फोटो काढायची वेळ येत नाही. त्यातही मास्कचा वापर अनिवार्य असल्यामुळे फोटोजमध्ये जास्त चेहराही दिसत नाही. ग्रुप फोटोजमध्ये तेवढय़ापुरता त्यांना  मास्क काढायला सांगून  पटकन फोटो काढावा लागतो. उलट सध्या मास्क घालून फोटो काढून घेण्याचा ट्रेण्ड वाढत चालला आहे, असं रोहित सांगतो. सध्या तरी फक्त लग्नसोहळ्याचेच फोटो काढून घेतले जातात. पूर्वीप्रमाणे  साखरपुडा, टिळा, हळदी, संगीत, मेहंदीसारख्या बाकीच्या कार्यक्रमांचे फोटो काढून घेतले जात नाहीत, घरच्या घरीच या समारंभाचे फोटो काढले जातात, असेही त्याने सांगितले.

लग्नसोहळ्यातला आनंद टिकवण्याची धडपड सुरू असली तरी तामझाम मात्र कमी झाला आहे. आणि यातून लग्नासाठीचे कपडेही वेगळे राहिलेले नाहीत. एरव्ही आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या दिवशी डिझायनर ड्रेस किं वा साडय़ांनाच पसंती दिली जाते, परंतु सध्या बाजारात मॉल्स, दुकानं बंद असल्यामुळे अनेकांनी त्यातल्या त्यात साठवणीतलं जे आहे तेच मिक्स मॅच करून परिधान करण्यावर भर दिला जातो आहे. काही डिझायनर्सनी याही परिस्थितीत आपले ग्राहक दूर जाऊ नयेत यासाठी डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. अनिता डोंगरे, सब्यसाची मुखर्जी यांसारख्या अनेक डिझायनर्सचे कपडे डिजिटली लोकांना उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे व्हर्च्युअल प्रेझेंटेशनचाही पर्याय असल्याने अनेक फॅ शनेबल मनांना थोडा दिलासा मिळाला आहे. या डिझायनर कपडय़ांवर मॅचिंग डिझायनर मास्क हे मात्र सध्या मस्ट आहे.

एकंदरीतच लग्नसोहळ्याचा हा थाटमाट कमी झाला असला तरी ते पूर्णपणे थांबलेले नाहीत. याही परिस्थितीत जमेल त्या पद्धतीने लग्नगाठीत बांधले जाण्याचा हा क्षण जमवायचाच या निर्धाराने अनेक प्रेमी जोडपी या ‘न्यू नॉर्मल’शी जुळवून घेत बोहल्यावर चढताहेत. हे प्रेम जोवर कायम आहे तोवर या लग्नसमारंभांना काहीच तोटा नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 4:47 am

Web Title: wedding celebration and lockdown zws 70
Next Stories
1  ‘पॅड’वुमन
2 सदा सर्वदा स्टार्टअप : संचालक मंडळाचे महत्त्व
3 कळी फुलते पण…
Just Now!
X