तेजश्री गायकवाड
या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच ‘मेट गाला’ फॅशन इव्हेंटने दरवर्षीप्रमाणे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्ही #metgala या हॅशटॅगवर अनेक इंटरनॅशनल, नॅशनल सेलिब्रिटींच्या छायाचित्रांबरोबर झळकलेल्या पोस्ट सोशल मीडियावरती बघितल्या असतील. या पोस्ट बघितल्या की आपसूकच मनात विचार येतो की, ही अशी फॅशन का? असे चित्रविचित्रच कपडे हे कलाकार का घालतात? खरं तर यामागे अनेक कारणं आहेत.

‘मेट गाला’ ज्याला औपचारिकपणे ‘कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूट गाला किंवा कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूट बेनिफिट’ म्हणतात आणि ‘मेट बॉल’ म्हणूनही ओळखलं जातं. न्यूयॉर्क शहरातील ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूट’ला वार्षिक निधी उभा करून देण्यासाठी सुरू केलेला हा एक फॅ शन उत्सव आहे. हा रेड कार्पेट इव्हेंट कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक फॅशन प्रदर्शनाचं उद्घाटन करतो. हेच या इव्हेंटचं एक कारण आहे. चित्रविचित्र कपडय़ांमुळे सगळीकडे चर्चा होते आणि याच चर्चेचा चॅरिटीसाठी जास्त फायदा होतो. या इव्हेंटसाठी दरवर्षी एक थीम ठरवून दिली जाते आणि त्या थीमच्या आधारावर येणारे पाहुणे कपडे घालतात. यंदाच्या मेट गालाची थीम ही ‘अमेरिकन स्वातंत्र्य’ या संकल्पनेवर  आधारित होती. म्हणूनच अमेरिकन ध्वजाच्या लाल-पांढऱ्या रंगाचा वापर करत डिझाईन के लेल्या स्कर्ट आणि ‘महिलांसाठी समान हक्क’ असं लिहिलेल्या गाऊनपर्यंत मनोरंजक ड्रेस या फॅ शन जत्रेत पाहायला मिळाले.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”

डिझायनर ड्रेस घालून काही तरी महत्त्वाचा संदेश देणं हेही या असे चिवित्र कपडे परिधान करून येण्यामागचं कारण आहे. वरती म्हटल्याप्रमाणे या इव्हेंटला दरवर्षी एक थीम असते. या थीमला धरूनच पाहुणे रेड कार्पेटवर हजेरी लावतात. काँग्रेसच्या महिला अलेक्झांड्रिया ओकासिओ – कॉर्टेझने मेट गालामध्ये पदार्पण केले ते पांढऱ्या, ऑफ-शोल्डर, फ्लोअर-स्वीपिंग गाऊनमध्ये.. हा गाऊन जे ब्रदर वेलींनी डिझाइन केला होता. गाऊनच्या मागील बाजूस, ठळक लाल अक्षरात ‘टॅक्स द रिच’ असं लिहिलेलं होतं. अलेक्झांड्रिया ओकासिओ कॉर्टेझ या डेमोक्रॅटिक पार्टी आणि यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधील सर्वात पुरोगामी आणि ठळक ओळख असलेल्या आवाजांपैकी एक आहेत. त्यांनी घातलेल्या या ऑल व्हाइट गाऊनमागे स्वत:चा राजकीय संदेश होता. त्यांचा ड्रेस हा अमेरिकेतील महिलांच्या मताधिकार चळवळीसाठी के लेले आवाहन होते. काहींनी त्यांना ढोंगी म्हटलं, कारण काहींच्या मते श्रीमंतांच्या इव्हेंटला जाताना त्यांनी गरीब लोकांसाठी सुरू असलेल्या उपक्रमाची प्रसिद्धी क रण्यासाठी ड्रेस घातला. तर इतरांनी हा मेसेज श्रीमंतांच्या इव्हेंटमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांचं कौतुक केलं.

यंदाच्या मेट गाला रेड कार्पेट सोहळ्यात हॉलीवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री किम कार्दशियनच्या अनोख्या लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिने संपूर्ण काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून संपूर्ण चेहऱ्यासह स्वत:ला झाकून घेतलं होतं. किमच्या ड्रेसवर अनेक मिम्सही झाले, पण इथंच तिचा हा लुक सफल झाला. कारण शब्दश: नखशिखान्त काळ्या रंगाच्या कपडय़ाने झाकलेलं असतानाही तिला सगळ्यांनी ओळखलं. एखाद्या सेलिब्रिटी आयकॉनचा चेहरा न बघताही त्यांना ओळखलं जातं त्यावरूनच संबंधित सेलिब्रिटी किती लोकप्रिय आहे याची प्रचीती येते. किम ही नेहमीच बॉडी पॉझिटिव्हिटीला सपोर्ट करते. कार्दशियनच्या शरीरयष्टीवर याआधीही अनेकदा टीका करण्यात आली आहे, वादविवाद झाले आहेत आणि तिचं कौतुक करणाराही एक मोठा चाहता वर्ग आहे. यंदा आमंत्रितांमध्ये मडोनाची मुलगी लॉर्डेस लिओनही होती. तिने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. २४ वर्षांच्या लिओनने  रेड कार्पेटवर तिचे अ‍ॅब्स आणि तिचे काखेतले केस न लपवता दाखवले. सौंदर्याच्या सगळ्या तथाकथित नियमांना हरताळ फासत तिने वॅक्सिंगला विरोध दर्शवला. काखेतील के स हे स्त्रीचे नैसर्गिक सौंदर्य आहे. सुंदर दिसण्यासाठी वर्षांनुर्वष मेकअपच्या नावाखाली या नैसर्गिक सौंदर्याचा अव्हेर करणाऱ्या गोष्टी मोडीत काढत ती पूर्ण आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर वावरली. तिचा हा आत्मविश्वास सोहळ्याला उपस्थित असलेल्या भल्याभल्यांना चकित करून गेला. एरवी के वळ चित्रविचित्र फॅ शन करणाऱ्या सेलिब्रिटींचीच चर्चा या मेट गाला फॅ शन सोहळ्याच्या निमित्ताने के ली जाते, मात्र सेलिब्रिटींचे असे अंदाज या चिवित्र फॅ शन सोहळ्यालाही चॅरिटी करण्यापलीकडे एक वेगळा अर्थ देऊन जातात.

viva@expressindia.com