11 December 2019

News Flash

भरजरी कपडय़ांचं करायचं काय?

लग्नसोहळ्यातला वधूचा पोशाख हा आकर्षणाचा, चर्चेचा, कुतूहलाचा विषय असतोच. आपल्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या क्षणाची तयारी करताना आपण सर्वोत्तम दिसू याकडे सगळ्याच मुलींचं लक्ष असतं.

| December 12, 2014 01:03 am

लग्नसोहळ्यातला वधूचा पोशाख हा आकर्षणाचा, चर्चेचा, कुतूहलाचा विषय असतोच. आपल्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या क्षणाची तयारी करताना आपण सर्वोत्तम दिसू याकडे सगळ्याच मुलींचं लक्ष असतं. अर्थातच त्यासाठी भरजरी साडीही तशीच घेतली जाते. नववधू म्हणजे लफ्फेदार पैठणी, भरजरी शालू, चमचमता लेहंगा यापैकी एक किंवा सगळंच घ्यायला दुकानंच्या दुकानं पालथी घातली जातात. विवाह सोहळ्याचं ‘सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन’ होण्यासाठी प्रत्येकीलाच काहीतरी एक्सक्लुजिव्ह घालायचं असतं आणि त्या नादात हजारो रुपयांच्या साडय़ा आणि शालू घेतले जातात. लग्नसमारंभानंतर मात्र या साडय़ा कपाटाचं धन होऊन राहतात. हे कपडे बऱ्याचदा इतके जड असतात की, प्रत्यक्ष विवाहाचा दिवस सोडता आयुष्यात पुन्हा कधीही घालायची इच्छा किंवा मोह होत नाही. लग्न झालं, आता या कपडय़ांचं करायचं काय? एवढे जड भरजरी कपडे पुन्हा कुठल्या ऑकेजनला घालायचे? हे असे काही कॉमन प्रश्न नेहमीच पडतात. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं डिझायनर मिहीर परुळेकर यांनी दिलेल्या टिप्समधून मिळाली.
* खरेदी करताना प्युअर फॅब्रिकची निवड करावी. म्हणजे प्युअर सिल्क, पटोला, कांजीवरम इत्यादी. प्युअर फॅब्रिक असल्यामुळे कपडे कितीही र्वष ठेवले तरी छान राहतात. जर काळी पडण्यासारखे प्रकार टाळता येतात.
* शालू घ्यायचा झाला तर तो बनारसी शालू असावा. त्यातल्या भरगच्च पॅटर्नपेक्षा नजाकतीनं विणलेल्या अस्सल कामाला किंमत द्यावी. रंगामध्ये प्रयोग करायला हरकत नाही. त्यातही आता बरेच वेगळे प्रकार पाहायला मिळतात.
*  साडीचा ब्लाउज घेताना तो अशा प्रकारचा असावा की तो ३ ते ४ साडय़ांवर घालता येईल. साडीमधल्याच ब्लाउजपीसची फॅशन आता नाही.
* हल्ली रिसेप्शनसाठी घागरा किंवा लेहेंगा जास्त प्रिफर केला जातो. तो घेतानाच अशा घ्यावा की, त्यावर एखादा कुर्ता किंवा क्रॉप टॉप घालून वेगळ्या ऑकेजनसाठी वापरता येईल.
* दुपट्टा हेवी असल्यामुळे तो एखाद्या सिंपल प्लेन कुर्त्यांवर मिक्स मॅच करून घालता येईल. यामुळे त्या ड्रेसला एक फॉर्मल लुक येऊ शकतो.
* साडी किंवा ब्रायडल वेअर घेतानाच आपल्याला कॅरी करायला त्रासदायक प्रकार घेऊ नयेत. ऑकेजन महत्त्वाचं असलं तरी त्यातला तुमचा कम्फर्टेबल वावर सर्वाधिक महत्त्वाचा असतो.
viva.loksatta@gmail.com

डिझायनर अंजू मोदी यांचे लॅक्मे फॅशन वीकमधील कलेक्शन

First Published on December 12, 2014 1:03 am

Web Title: what should be done with expensive cloths
टॅग Cloths
Just Now!
X