पुण्याच्या कॉलेजविश्वात ‘पुरुषोत्तम करंडक’चं स्थान फार मोठं आहे. ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू होऊन पुढच्या वर्षी पन्नास वर्ष होतील. ‘पुरुषोत्तम’नं रंगभूमीला अनेक कलाकार दिले. त्याहीपलिकडे ‘पुरुषोत्तम’नं तरुणाईला जान दिली.
पुण्यातल्या महाविद्यालयांमध्ये काय सुरू आहे. असा प्रश्न कुणी जून-जुलै महिन्यामध्ये विचारला, तर त्यावर हमखास आणि पटकन मिळणारे उत्तर म्हणजे ‘पुरूषोत्तम’ची तयारी. महाविद्यालयीन विश्वात पाऊल टाकल्या टाकल्या महाविद्यालयाच्या कलामंडळाचा कोणता कार्यक्रम समोर येत असेल, तर ‘पुरूषोत्तमसाठी’ निवड चाचणी. महाराष्ट्र कलोपासकच्यावतीने गेली ४९ वर्षे पुरूषोत्तम करंडक स्पर्धा अगदी दिमाखात आणि तितक्याच कडक शिस्तीत सुरू आहे. दिवसेंदिवस या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांची प्रतिक्षा यादी वाढतेच आहे. पुण्याच्या महाविद्यालयीन विश्वामध्ये पुरूषोत्तमचं स्थान हे फक्त एखादी एकांकिका स्पर्धा एवढंच नाही. ऑगस्ट महिना – पुरूषोत्तम – भरतनाटय़ मंदिर या समिकरणाशी पुण्यातील तरुणाईच वर्षांनुवर्षांच भावनिक नातं निर्माण झाल आहे. महाविद्यालयातून पासआऊट होऊन अनेक वर्ष झाली, तरी महाविद्यालयामध्ये पुरूषोत्तमच्या तालमीला हटकून हजेरी लावणारी मंडळी आहेत. केवळ पुरूषोत्तम कराता यावं म्हणून महाविद्यालयामध्ये सतत नव्या नव्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारीही मंडळी आहेत.
पुरुषोत्तमच्या मांडवाखालून जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात पुरुषोत्तमच्या आठवणींचा कोपरा असतो. तालमींचे किस्से, पडलेल्या एकांकिका, गाजलेल्या एकांकिका, तालमीच्या वेळी जुळलेली नाती, तिकिट मिळवण्यासाठी केलेली धडपड.. असं खूप काही! महाविद्यालयांच्या कटय़ांवर ‘ ते नवातले आहेत..!’ असं काही ऐकू येतं. नवातले म्हणजे आदल्या वर्षी अंतिम फेरीत निवडल्या गेलेल्या नऊ महाविद्यालयांपैकी संघ.! पुरूषोत्तमची एक स्वतंत्र परिभाषा तयार झाली आहे. प्रत्यश्र एकांकिका सुरू होण्यापूर्वी एक वेगळीच स्पर्धा भरतनाटय़ मध्ये दरवर्षी रंगते. आपल्या महाविद्यालयाला चिअर करण्याची.! मात्र, त्यातही हुल्लडबाजीला जागा नसते. प्रयोगाच्या आधी दोन दिवस महाविद्यालयामध्ये तिकिटे विकताना. नव्या कल्पक घोषणा शोधून काढणाऱ्या, खणखणीत आवाज असणाऱ्या या चिअर लिडर्ससाठी तिकिटं राखून ठेवलेली असतात. वेळप्रसंगी दणक्यात चिअरिंग करणाऱ्या आपल्या सिनिअर्सना अगदी आवर्जून प्रयोगाला बोलावलं जातं. अनेकजण एकांकिकेतल्या सहभागाऐवजी या चिअरींगमुळे पुरुषोत्तमशी जोडले गेले आहेत.
‘पुरुषोत्तम’नं रंगभूमीला अनेक कलाकार दिले. अनेकांना नवी वाट दाखवली. पण तरीही पुरुषोत्तमनं काय दिलं या प्रश्नाच उत्तर एकच. तरूणाईला जान दिली.
केवळ पुरूषोत्तम कराता यावं म्हणून महाविद्यालयामध्ये सतत नव्या नव्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारीही मंडळी आहेत.
पुरुषोत्तमच्या मांडवाखालून जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात पुरुषोत्तमच्या आठवणींचा कोपरा असतो. तालमींचे किस्से, पडलेल्या एकांकिका, गाजलेल्या एकांकिका, तालमीच्या वेळी जुळलेली नाती, तिकिट मिळवण्यासाठी केलेली धडपड.. असं खूप काही! महाविद्यालयांच्या कटय़ांवर ‘ ते नवातले आहेत..!’ असं काही ऐकू येतं. नवातले म्हणजे आदल्या वर्षी अंतिम फेरीत निवडल्या गेलेल्या नऊ महाविद्यालयांपैकी संघ.! पुरूषोत्तमची एक स्वतंत्र परिभाषा तयार झाली आहे. प्रत्यश्र एकांकिका सुरू होण्यापूर्वी एक वेगळीच स्पर्धा भरतनाटय़ मध्ये दरवर्षी रंगते. आपल्या महाविद्यालयाला चिअर करण्याची.! मात्र, त्यातही हुल्लडबाजीला जागा नसते. प्रयोगाच्या आधी दोन दिवस महाविद्यालयामध्ये तिकिटे विकताना. नव्या कल्पक घोषणा शोधून काढणाऱ्या, खणखणीत आवाज असणाऱ्या या चिअर लिडर्ससाठी तिकिटं राखून ठेवलेली असतात. वेळप्रसंगी दणक्यात चिअरिंग करणाऱ्या आपल्या सिनिअर्सना अगदी आवर्जून प्रयोगाला बोलावलं जातं. अनेकजण एकांकिकेतल्या सहभागाऐवजी या चिअरींगमुळे पुरुषोत्तमशी जोडले गेले आहेत.
‘पुरुषोत्तम’नं रंगभूमीला अनेक कलाकार दिले. अनेकांना नवी वाट दाखवली. पण तरीही पुरुषोत्तमनं काय दिलं या प्रश्नाच उत्तर एकच. तरूणाईला जान दिली.

‘पुरुषोत्तमची शिस्त पुढेही उपयोगी’
प्रत्येकानं पुरुषोत्तमसारखी एखादी तरी स्पर्धा करायलाच हवी. स्पर्धा आत्मविश्वास देतात. अभिनय किंवा नाटक- चित्रपट क्षेत्रात करिअर करायचं असेल तर पुण्यातल्या विद्यार्थ्यांनं पुरुषोत्तम करायलाच हवं. त्यामध्ये बक्षीसं मिळणं, नंबर येणं हा पुढचा भाग झाला. पण यात भाग घेणं हेच खूप शिकवून जाणारं असतं. शिस्त हे पुरुषोत्तमचं वैशिष्टय़ आहे. पुरुषोत्तम’मध्ये लागलेली शिस्त पुढे नेहमीच उपयोगी पडते.
अमेय वाघ

‘यशापयश पचवण्याची तयारी’
स्पर्धा तुम्हाला स्वत:ची ओळख करून देते. पुरुषोत्तममध्ये तर सगळं तुम्हालाच करायचं असतं. दिग्दर्शक, कलाकार हे महाविद्यालयातलेच असावे लागतात. त्यामुळे प्रयोगही करून पाहण्याची संधी असते, तुम्ही नेमके कुठे आहात हे कळते. मला पासआऊट होऊन तीन वर्ष झाली पण अजूनही मला पुरुषोत्तमला केलेल्या एकांकिका पुढची वाट दाखवतात. पुरुषोत्तम खूप जुनी स्पर्धा असल्यामुळे त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनही वेगळा आहे. स्पर्धेसाठी एकांकिका करतानाही तुडुंब भरलेलं प्रक्षागृह हा वेगळा अनुभव आहे. लोकांना हाताळण्याची, कौतुक आणि टीका दोन्ही हाताळण्याची सवय होते. यश आणि अपयश दोन्ही पचवण्यासाठी तुम्ही तयार होता.
सिद्धार्थ मेनन

आव्वाज कुणाचा?