09 August 2020

News Flash

विंटर फॅशन!

विंटर ट्रेण्डवर टाकलेली ही नजर नक्कीच फायदेशीर ठरेल..

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

हिवाळ्यातील हितगूज म्हणजे शॉपिंग. यंदा काय नवीन येतंय, कुठले रंग ट्रेण्डमध्ये आहेत, कशा स्टाइल्स आपण आजमावू शकतो, नवे पॅटर्न कोणते आहेत इत्यादी गोष्टींकडे आपण नेहमीच डोळे लावून बसलेलो असतो. शॉपिंगसाठी निघालेल्या तरुणतरुणींसाठी यंदा ऑनलाइन आणि ऑफलाइन पुष्कळ आऊटफिट्स उपलब्ध झाले आहेत. त्यातून यंदाच्या हिवाळ्यात रंग, फॅब्रिकआणि स्टाइल्समध्ये तुम्ही विविध प्रकार ट्राय करू शकता. त्यामुळे विंटर ट्रेण्डवर टाकलेली ही नजर नक्कीच फायदेशीर ठरेल..

मध्यतंरी फॅशनच्या फलकावर नवे तंत्रज्ञान येत राहिले. त्यातलं फॅ ब्रिक्सचं, रंगाचं आणि पॅटर्न्‍सचं प्रकरण तंतोतंत लागू पडेल आताच्या वर्षांखेरच्या थंडीच्या मौसमात. कारण यंदा फॅ ब्रिक्समध्ये नानाविध बदल आणि प्रकार आले आहेत, ज्याची झलक विंटर सीझनमध्येही पाहायला मिळते आहे. तत्पूर्वी हिवाळ्याचा आणि थंडीचाही अंदाज घ्यायला हवा, कारण सध्या मुंबईसारख्या काही शहरांमध्ये (प्रदूषणाच्या पाश्र्वभूमीवर) थंडीचे चित्र अगदीच शून्य दिसते आहे, पण याचा फारसा विचार न करता थोडीफार का होईना थंडी पडू लागली आहे या सराकात्मक विचारानेच मार्केटकडे वळायला हवे.  हिवाळ्याचे चित्र डोळ्यासमोर दिसते ते फक्त ख्रिसमस म्हणून नाही तर स्वच्छ – नितळ हवा, गारेगार वातावरण, निरभ्र आकाश, न तळपणारा सूर्य, प्रसन्नता आणि एक पुसट, पण जाणवणारी शांतता असते. अर्थात, हे वर्णन ऐकलं की मग त्याप्रमाणे विंटर सीझनमधले कपडेही आरामदायी, उबदार आणि मुलायम असे.. रंगीबेरंगी, कूल आणि ग्लॅमरस पद्धतीचेच असायला हवेत..

रंग, पॅटर्न्‍स आणि फॅब्रिक्स –

बऱ्याच जणांच्या मनात खासकरून तरुण पिढीच्या मनात असा विचार येत असेल की यंदा प्रथमच आम्ही नवीन काय ट्राय करू शकू? याला उत्तर असं की यंदा तुम्ही हिवाळ्यात शोभतील आणि परिणामी थंडीच्या मौसमात आपल्या शरीराला आवश्यक ठरतील असे कपडे वापरू शकता. यंदाच्या थंडीत तुम्ही एथनिक वेअरचाही खूप जास्त प्रमाणात उपयोग करून घेऊ  शकता, कारण यंदा अजूनही वेडिंग सीझनच्या फॅशनची क्रेझ संपलेली नाही, उलट ती वाढत चालली असल्याने त्याचा बराचसा प्रभाव विंटर कलेक्शनवरही आहे. मुळात यंदाच्या वेडिंग सीझनला वगळलेले आणि त्याच्याबरोबर विरुद्ध रंग (यंदाच्या ट्रेण्डनुसार) एथनिक वेअरसाठी विंटर सीझनमध्ये इन झाले आहेत. उदाहरणार्थ, या वेळी लग्नाच्या हंगामात सटल रंग जास्त आले होते ज्यात गुलाबी-अगदी स्किन कलरप्रमाणे लाइट, पिवळा, हिरवा, केशरी असे रंग प्रामुख्याने होते. तर आता डार्क रंग एथनिक वेअरमध्ये म्हणजे मरून, करडा, गडद हिरवा, ग्रे कलरमध्ये न्हाऊन निघालेला ‘निळा’, मेंदी कलर, गडद जांभळा असे अनेक रंग पाहायला मिळतील. मुळात या सीझनला तर एथनिक वेअरमध्ये तुम्हाला मल्टिकलरचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे एथनिक वेअरमध्ये यंदा धमाका आहे हे नक्की.

एथनिक वेअरप्रमाणेच वेस्टर्न आऊटफिट्सध्येही (खरंतर आता एथनिक वेगळं आणि वेस्टर्न वेगळं असं काही उरलेलं नाही पण असो..) सारखेच रंग आले आहेत. म्हणजेच सर्व गडद रंग हे वेस्टर्न आऊटफिट्समध्येही पाहायला मिळतील. यातही क्रीम कलर (डार्क), मरुन, डार्क ब्राऊन, डार्क ऑरेंज, काळा, मळकट पिवळा व पांढरा, गडद राखाडी आणि नेव्ही ब्ल्यूमधील जवळपास सर्व श्रेणीतील रंग हे वेस्टर्न आऊटफिट्समध्ये पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या वेस्टर्न आऊटफिट्सचे खास वैशिष्टय़ म्हणजे रंग खूप मोल्ड मूडचे असले तरी ते खूप पूरक आणि आकर्षक वाटतात. आणि त्यांची स्टाइलही खूप वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. अगदी कॅज्युअलही नाही आणि आकाराने अगदी ढगळही नाही. योग्य विचार करून यंदा ते डिझाइन केले गेले आहेत. अगदी सहज आणि सुंदर पद्धतीने ते आपण कोणत्याही ओकेजनला वापरू शकतो. या रंगांप्रमाणेच गुलाबी रंगही यंदा या सीझनमध्ये झळकणार आहे. यामध्ये श्ॉम्पेन पिंक, रोझवूड पिंक, पिच पिंक असे रंगही पाहायला मिळतील. सध्या सिनेमांच्या तुलनेत विंटर कलेक्शन तुरळकच दिसायला सुरुवात झाली आहे. या वेळी तुमची योग्य फॅब्रिकची निवड तुमच्या लुकलाही जास्त चांगल्या पद्धतीने खुलवू शकते. तसेच तुम्ही कोणती स्टाइल आत्मसात करताय यावरही तुमचा लुक अवलंबून आहे. गेल्या वर्षीच्या फोरकास्टप्रमाणे यंदाच्या विंटर कलेक्शनमध्ये अ‍ॅनिमल प्रिंट्स, नियॉन, चेक्स यांसारखे पॅटर्न्‍स आणि सिल्क क्रेप, लेदर, सिल्क शिफॉन, फ्रिन्जेस, ट्रान्स्परन्ट, वूल, डेनिम, वेलवेट, सॅटिन, फर असे फॅब्रिक्स ट्रेण्डमध्ये असतील. फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अ‍ॅमेझॉन, शिइन, क्लब फॅक्टरी अशा ऑनलाइन साइट्सवरून तुम्ही शॉपिंग करू शकता तर ऑफलाइनसाठी विविध मॉल्स आणि स्टोअरमध्ये जाऊ  शकता. विशेष करून ‘शॉपर्स स्टॉप’, ‘एफबीबी’, ‘रिलायन्स ट्रेण्ड्स’ आणि ‘ग्लोबल देसी’सारख्या दुकानांमध्ये नक्कीच खरेदीला जाऊ  शकता.

हिवाळ्यासाठी समर आऊटफिट्स –

यामध्ये समर आऊटफिट्स थंडीच्या मौसमासाठी रिइन्व्हेन्ट केले आहेत. प्रामुख्याने समर आऊटफिट्सचा थोडक्यात जुगाड करून तुम्ही विंटर आऊटफिट्स स्वत:च तयार करू शकता. ते कसं? तर तेही अगदी सोपे आणि मजेदार आहे. ‘लिवा’या ब्रॅण्डने काही टिप्स त्याकरिता दिल्या आहेत. खरंतर विंटर सीझनमध्ये लेयरिंगवर आपण भर देऊ शकतो. ज्यामुळे पूर्ण आऊटफिटला एक वेगळा लुक मिळतो. समर आऊटफिट्स घेऊन तुम्ही तसे लेयरिंग करू शकता. यासाठी स्लिप ड्रेसच्या आत तुम्ही टी – शर्ट घालू शकता. स्वेटर्सवर विविध ड्रेसेस परिधान करू शकता. कोणते ड्रेसेस घालायचे यातही काहीच मर्यादा नाहीत. तसेच टर्टल नेक गार्मेटवर स्लिवलेस ड्रेस असा कॉम्बो विलक्षण गोड दिसतो. ज्यांना काळ्या रंगाचे आकर्षण आहे त्यांनी त्यावर कॅमल कोट जरूर घालावा. वर म्हटल्याप्रमाणे अ‍ॅनिमल प्रिंट्स हे यंदाच्या विंटरमध्ये सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे लेदरला पर्याय म्हणून तुम्ही हा प्रकार ट्राय करू शकता. हे प्रिंट्स तुम्ही लेदरमध्ये न घेता वूलमध्ये घ्या आणि डेनिम जीन्सवर ते वापरा. डेनिम जीन्सवर लाँग बटन कॉट वापरा किंवा या प्रिंट्सचे वनपीस वापरून त्यावर फरचे कॉट वापरू शकता आणि त्याखाली लेदर शूजचा पर्याय आहे.

अ‍ॅनिमल प्रिंट्समध्ये स्नेक प्रिंट, चिता प्रिंट, टायगर प्रिंट आणि झेब्रा प्रिंट असे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत. या सगळ्यात प्रामुख्याने अधोरेखित होणारा मुद्दा म्हणजे ऑफिस पार्टीचा. खासकरून विंटर सीझनला तर ऑफिस लुक नक्की ट्राय करायला हवा. यात तुम्ही डिझायनर/प्लेन फॉर्मल शर्टवर फॅन्सी स्कर्ट घालू शकता. तर फॉर्मल पॅन्ट्सवर रफल टॉप किंवा ग्लिटरचा टॉप घालू शकता. ख्रिसमस इव्हला स्कार्फचा मामला एकदम मस्त वाटतो. त्यामुळे थोडे लाइट कलरचे आणि क्रीम/ब्राऊन शेडचे स्कार्फ तुम्ही वापरू शकता. ख्रिसमस संपता संपता न्यू ईअरचा आठवडा येतो तेव्हा आपण स्लिवलेस ड्रेस खासकरून मेटॅलिक फॅब्रिकचे आणि त्यावर वेलवेट जॅकेट्स वापरू शकता किंवा याचा उलटा फंडाही तुम्ही वापरू शकता. यात रिव्हर्झेबल आऊटफिट्सही आहेत जे खासकरून सेक्विन फॅब्रिकचे आणि व्होलेटा स्टाइल्सचे आहेत. तर टय़ूनिकमध्ये किंवा त्यावर स्वेटर असे प्रकारही हटके आहेत. हिल्स वापरणार असाल तर वनपीस-कोट अशा कॉम्बोवर वापरा नाहीतर स्निकर्स किंवा लेदर शूज घाला.

साडय़ांच्या प्रकारातही तांत, कासावू, बोन्काई, कांजिवरम, चिकनकारी या साडय़ांचा समावेश आहे. साडय़ांवरही तूम्ही टर्टल नेक स्वेटर्स, जॅकेट्स आणि ब्लेझर्स घालू शकता. गंमत अशी की ८० च्या काळातील फॅशनही या वेळी तितकीच ट्रेण्डिंग आहे आणि काही काळ तरी ती अजून ट्रेण्डिंग राहू शकते. यात प्रामुख्याने नियॉनचा ट्रेण्ड हमखास रुजेल. ज्यात नियॉन ड्रेस किंवा नियॉन बॉटम्सवर ओव्हरसाइज्ड आणि ग्लिटर जॅकेट्स घालू शकता.

मेन्सवेअर – यात यंदा हूडी, कॅज्यूअल सूट्स, कावबॉय सूट्स, स्वेटशर्ट्स जॅकेट्स, बेसबॉल जॅकेट्स, रोल नेक्स, चेक्स जॅकेट्स, रॅबीट स्वेटर्स, शिअर्ड विन्क असे नानाविध प्रकार उपलब्ध आहेत.

या वेळी पहिल्यांदाच विंटर कलेक्शनमध्ये नाना तऱ्हेचे मिश्रण स्टाइलिंगमध्ये दिसणार आहे. त्यामुळे जराही वेळ न दवडता लवकर शॉपिंगला लागू या!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2019 1:33 am

Web Title: winter fashion shopping abn 97
Next Stories
1 क्षण एक पुरे! : तालप्रेमी
2 टेकजागर : भक्कम सायबर तटबंदीची गरज
3 जगाच्या पाटीवर : प्रयोग‘सिद्ध’
Just Now!
X