News Flash

यंदाचा फेस्टिव्ह ट्रेंड : साधं पण ‘क्लासी’

यंदाचं ‘विंटर- फेस्टिव्ह’ कलेक्शन कसं असेल याची झलक नुकत्याच मुंबईत झालेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये बघायला मिळाली. गणपतीबरोबर सुरू होणाऱ्या फेस्टिव्ह सीझनसाठी शॉपिंग करण्याआधी जाणून घ्या

| August 29, 2014 01:05 am

यंदाचं ‘विंटर- फेस्टिव्ह’ कलेक्शन कसं असेल याची झलक नुकत्याच मुंबईत झालेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये बघायला मिळाली. गणपतीबरोबर सुरू होणाऱ्या फेस्टिव्ह सीझनसाठी शॉपिंग करण्याआधी जाणून घ्या अपकमिंग ट्रेंड्सविषयी..

वावरायला सहज असणारे कपडे आणि इझी फिट फॅशन हे यंदाच्या सीझनचे विशेष आहे.

‘नीट अँड क्लीन लूक’ चलतीत असल्यामुळे केस मागे बांधायची स्टाईल पुन्हा आली आहे.
श्रावण महिना आल्यावरच खरं तर सणांची सुरुवात होते आणि अर्थात शॉपिंगचीही! आता गणपती, मग नवरात्र-दसरा आणि त्यानंतर दिवाळी. या सगळ्याची तयारी करायची असतेच आणि फॅशन डिझायनर्ससुद्धा हे पुरेपूर ओळखून असतात. त्यामुळेच गणपतीच्या आधीच लॅक्मे फॅशन वीक उरकून घेतला जातो, जेणेकरून आपल्यासारख्या शॉपिंगप्रेमी लोकांना शॉपिंग लिस्ट बनवायला काही अडचण येणार नाही. यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये साधेपणाला महत्त्व आलंय. म्हणजे न्यूड मेक-अप, सौम्य रंगाच्या शेड्स, एखादाच पण युनिक दागिना असा साधा तरीही क्लासी लूक यंदा इन आहे. थोडक्यात यंदा ‘गो इझी’ हा फेस्टिव्हल मंत्रा असणार आहे. त्यामुळे तुमच्या साडय़ांचे लांब पल्लू, दुपट्टे, गाऊनचे ट्रेल सांभाळण्यापेक्षा सणांचा मनमुराद आनंद घेण्याची संधी नक्कीच मिळेल असं म्हणायला हरकत नाही.
यंदाच्या ‘फेस्टिव्हल लूक’वर एक नजर टाकूया.

युनिक अ‍ॅक्सेसरीज
अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलायचं झाल्यास कुंदनचे दागिने आता कडीकुलुपामध्ये बंद करून ठेवा. कारण यंदा तुमच्या स्वत:च्या लग्नाशिवाय इतर कोणत्याही समारंभामध्ये तुम्हाला कुंदनचे दागिने घालता येणार नाहीत. या सीझनमध्ये गोल्ड ज्वेलरी फोकसमध्ये असेल. पण म्हणून कुठलीही गोल्ड ज्वेलरी चालणार नाही. इट हॅज टू बी युनिक. बीग इअररिंग्स, हेड अ‍ॅक्सेसरीज किंवा स्टेटमेंट नेकपीस या तिघांपैकी एकाची निवड तुम्हाला या सीझनमध्ये करावी लागेल. बाजूबंदाचा पर्यायसुद्धा आहे तुमच्यासमोर. मागच्या सीझनमधील कमरबंदची जागा यंदा बाजूबंदानी घेतली आहे. त्यामुळे याचाही विचार करायला हरकत नाही.

अर्दी शेड्स
रंगांच्या बाबतीत काळ्या रंगापासून सुरुवात करत ग्रे, नेव्ही, बेज, सफेद, मरून, मेहंदी ग्रीन, चॉकलेटी, ब्राऊन, ऑफ-व्हाइट या शेड्स फेस्टिव्हल सीझनची जान असणार आहेत. नेहमीच्या कलरफुल शेड्सच्या जागी या रंगांनी तुमच्या लूकला एक घरंदाज थाट मिळेल. सॅटिन, जॉर्जेट, शिफॉन या कापडांची जागा सिल्क, टसर कापडाने घेतल्यामुळे या शेड्सच्या मदतीने तुमचा रुबाब वाढणार इतके नक्की. गेल्या सीझन इतके भन्नाट प्रिंट्स या सीझनमध्ये पाहायला मिळणार नाहीत, पण प्रिंट्स बोल्ड असणार इतकं मात्र नक्की. त्यात कॉन्ट्रास्ट शेड्सबरोबर खेळण्यापेक्षा यंदा डिझाइनर्सनी मिक्स अँड मॅचला जास्त महत्त्व दिलं आहे. गोल्ड, सिल्व्हर या शेड्ससुद्धा पाहायला मिळतील. पण ब्राइट गोल्डपेक्षा अर्दी शेड्सच जास्त पाहायला मिळेल.

इझी फिट गार्मेट्स
अनारकली, एम्ब्रॉयडरी केलेल्या साडय़ा, पंजाबी सूट्स या सर्वाना या सिझनमध्ये रामराम करा. कारण हा सिझन असणार आहे इझी आणि कम्फर्टेबल कपडय़ांचा. वन पीस ड्रेस, स्ट्रेट फिट ड्रेसेस, लाँग कुर्तीज सध्याच्या सीझनमध्ये हिट आहेत. सांगताना जरा विचित्र वाटतंय, पण तुमचे कलरफुल स्पोर्ट्सवेअरसुद्धा फेस्टिव्हल सीझन गाजवणार आहेत. स्टीच्ड साडय़ासुद्धा चलतीमध्ये असणार आहेत. चुणीदार-कमीजची जागा लाँग कुर्तीज घेतील.

मिनिमल  मेकअप
फेस्टिव्हल सीझन म्हटला की, इतर काही नाही पण मेकअप तरी ब्राइट असलाच पाहिजे असं कित्येकांचं म्हणणं असतं. पण यंदा  मेकअप कमीत कमी ठेवण्याची तयारी तुम्हाला करून घ्यावी लागेल. न्यूड मेकअप यंदा राज्य करणार आहे. फारतर तुम्ही लीप कलरमध्ये प्रयोग करू शकता, पण जास्त नाही. लालच्या मर्यादित शेड्सचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. केस मोकळे सोडण्याऐवजी ‘नीट अँड क्लीन लूक’ हिट ठरेल. केस शॉर्ट असतील तर उत्तमच, पण लांब केसांमध्ये बन किंवा पोनीटेलची हेअरस्टाइल हवी. त्यात हेअर अ‍ॅक्सेसरीज यंदा मोठय़ा प्रमाणात दिसतील, त्यामुळे केसाचा बन बांधल्यास त्यामध्ये छानशी अ‍ॅक्सेसरीसुद्धा खोवता येईल.  

नर्गीस फाखरी (डावीकडे) आणि  श्रुती हसन डिझायनर
अनुश्री रेड्डी आणि शेहला खान यांच्या सौम्य रंगाच्या फेस्टिव्ह वेअरमध्ये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:05 am

Web Title: winter festive collection in lakme fashion week
Next Stories
1 ओपन अप : प्रेमभंग
2 ट्रान्स पे डान्स
3 खाबुगिरी : सात्त्विक ‘आस्वाद’!
Just Now!
X