सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काम करणारी आई, आई ऑफिसला गेल्यावर वयामुळे होत नसतानादेखील घर सांभाळणारी आजी, बहीण-भावात भांडणे झाली की भावाला हवे ते देऊन शांत करणारी बहीण, मित्र-मैत्रिणींमध्ये गैरसमज झाल्यावर ते दूर करणारी मैत्रीण, नवरा-बायकोचं नातं सांभाळून घेणारी ती अर्धागिनी.. अशा अनेक जबाबदाऱ्या पेलणारी ही स्त्री कधी स्वत:कडे नीट लक्ष देते का? तिच्यासाठी असलेला दिवस म्हणजे महिला दिन, या दिवशी काही वेगळी वागणूक मिळते का? किंवा या दिवशी ती काही वेगळे करते का? जाणून घेऊया आपल्या काही मैत्रिणींकडून..

माझ्या घरी पुरुषांइतकेच स्त्रियांनादेखील महत्त्व आहे. त्यामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय आम्ही एकमताने घेतो. जर जास्त महिला राजकारणात आल्या तर काही प्रमाणात समाजासाठी फायद्याचे ठरेल. याचबरोबर पुरेसे प्रायोजक मिळाले तर स्त्रिया स्पोर्ट्समधील त्यांची योग्यता सिद्ध करू शकतील. माझ्या मते, महिला दिन साजरा करावा, पण वेगळ्या पद्धतीने जसे रॅली काढणे. यामुळे तरुणांमध्ये जागरूकता लवकर निर्माण होईल व रॅलीत ते सहभागीदेखील होऊ शकतील.
नीकिता बावसकर

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

एक दिवस महिला दिन साजरा करून काही उपयोग नाही. कारण एक दिवस साजरा करायचा आणि बाकीचे दिवस अत्याचार सहन करायचे, हे अत्याचार आधी थांबले पाहिजेत. मी या दिवशी काही वेगळे करीत नाही, पण माझी इच्छा आहे की या दिवसाचे औचित्य साधून खेडय़ा-पाडय़ातल्या बायकांना जाऊन भेटावे व त्यांच्या अधिकारांबद्दल त्यांना जाणीव करून द्यावी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायला उद्युक्त करावे. आपल्याकडेदेखील मातृसत्ताक पद्धत आली तर समाजात चांगले बदल घडतील. माझ्या घरी बहीण-भावांमध्ये भेदभाव केला जात नाही व घरी मोठे डिसिजन्स आजोबा नसल्याने आजी घेते. खेळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुरुषांएवढे महत्त्व स्त्रियांच्या खेळाला दिले जात नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या बलात्काराच्या घटना यामुळे मला आज अजिबात सुरक्षित वाटत नाही.
अनुजा ढेरे

मला मनापासून वाटतं महिला दिन साजरा करावा. साजरा करायचा म्हणजे असे काहीतरी कार्यक्रम अरेंज करायचे की ज्यामुळे विशेष करून गृहिणींच्या सुप्त गुणांना प्लॅटफॉर्म मिळेल. पण महिला दिनाला दिले जाणारे महत्त्व त्याच दिवसापुरते मर्यादित न राहता कायमचे असावे. सामाजिक स्थिती लक्षात घेता मुलींवर खूप बंधने आहेत, पण त्या करिअर-ओरिएंटेड असल्यामुळे तानमान बघून त्यांना मोकळीक दिली पहिजे. माझा घरी या दिवसाचे महत्त्व आहे. घरचे मला व माझ्या आईला विश करून गिफ्ट्सदेखील देतात. आजोबा नसल्याने आजीच्या मताला महत्त्व आहे. जास्त महिला राजकारणात आल्या तर कदाचित समाजात चांगला बदल घडेल, असे मला वाटते.
मानसी प्रभुदेसाई

आजपर्यंत मी कधी वुमन्स डे साजरा केला नाही. पण करायला हवा, कारण त्यामुळे स्त्रियांबद्दलची जाणीव वाढायला मदत होईल. आजकाल घराघरात मुला-मुलींमध्ये भेदभाव केलेले दिसत नाहीत. आमच्या घरी स्त्रियांच्या मताला पुरुषांच्या मताएवढेच महत्त्व आहे. जास्तीतजास्त खेळाडू महिला जाहिरातीत येऊ लागल्या तर त्या खेळत असलेल्या खेळाबद्दल लोकांना माहिती मिळेल.
वैभवी पाठक

आमच्या कॉलेजमध्ये वुमन डेव्हलपमेंट सेल आहे. तेथे आम्ही कर्तबगार स्त्रियांवर आधारित काही नाटिका, पथनाटय़ करत असतो; ज्यामुळे त्यांच्याबद्दल तर लोकांना माहिती मिळतेच, पण ते सादर करताना आम्हालादेखील हुरूप येतो. मला म्हणून वाटते की महिला दिन साजरा करावा व त्या दिवशी कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील असलेले स्त्रियांचे महत्त्व पटवून द्यावे. हे सगळे जरी वाटत असले तरी सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे. कुठलाही महत्त्वाचा निर्णय मात्र बाबाच घेतात. माझ्या मते डिसिजन मेकिंग पॉवर आई व बाबा दोघांकडे असावी, तसेच मुलींवरची बंधने थोडी कमी व्हावीत. ही बंधने खेळांच्या बाबतीतदेखील दिसतात. म्हणजे खेळात करिअर करायचे ठरवले की स्पर्धेसाठी बाहेर जावे लागते. मग एवढे दिवस एकटी कशी राहशील, त्यापेक्षा नकोच तुझा खेळ, असे घरच्यांचे म्हणणे पडते.
अंकिता संकल्प

महिला दिन साजरा करू नये, असे वाटते. कारण त्या दिवसानिमित्त वागणुकीतला बदल करायचा ठरवला तरी तो त्या दिवसापुरताच मर्यादित राहतो. कायमस्वरूपी काहीच होत नाही. कुठल्याही क्षेत्रात ठरावीक जागांवर महिला हव्यात, पण जास्त असून पण उपयोग नाही, कारण तेथेही भांडणे सुरू व्हयला वेळ लागणार नाही.
रेणुका डोंगरे