19 September 2020

News Flash

थिएटर आणि तरुणाई

तरुणाई सध्या थिएटर्स पुन्हा कधी सुरू होत आहेत याकडे लक्ष ठेवून आहे.

गायत्री हसबनीस

करोनाकाळात ओटीटीवर तरुणाई रमली आहे अशी एकच चर्चा सुरू झाली. त्यामुळे ओटीटीवर वेबमालिकांच्या जोडीने नवनव्या चित्रपटांचे प्रदर्शनही सुरू झाले. पण अगदी होम थिएटरची सुविधा जरी उपलब्ध असली तरी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायची गंमतच वेगळी असं तरुणाईचं म्हणणं आहे. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणं हे वीकएण्डचं मोठं प्लॅनिंग असतं. त्यानिमित्ताने ‘सोशलाइझ’ होता येतं असं म्हणणारी तरुणाई सध्या थिएटर्स पुन्हा कधी सुरू होत आहेत याकडे लक्ष ठेवून आहे.

करोनापूर्व काळात थिएटरमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर चित्रपट बघणं, तिथून बाहेर पडल्यावर त्यावर होणारी चाय पे चर्चा, मग होणारी भटकं ती हा सगळा वीकएण्डला हमखास जमून येणारा बेत. सध्या चित्रपट ओटीटीवरच प्रदर्शित होत आहेत. नाही म्हणायला घरीच काही चमचमीत पदार्थ बनवायचे, व्हर्च्युअली सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आपापला चित्रपट पहायचा असं काहीतरी घराघरांत सुरू आहे, मात्र यात थिएटरवाली गंमत नाही असा तरुणाईचा सूर निघतो आहे. कम्युनिकेशनच्या क्षेत्रात कार्यरत असलेला मुंबईचा परिक्षित शर्मा सांगतो, चित्रपटाचा प्लॅन बऱ्याचदा करावा लागत नव्हता?. तो अगदी सहज जाऊ या, असं म्हणत व्हायचा त्यामुळे वीकेंड अगदी? परिपूर्ण जायचा. सोशलाइझ होणं असल्याने फ्रेशनेस यायचा. सोमवारपासून कामावर जायला उत्साह यायचा. चित्रपटामुळे का होईना चार लोकांत मिसळणं व्हायचं. सध्या ओटीटीवर चित्रपट पाहण्यातली ती गंमतच निघून गेली आहे. वैयक्तिकरीत्या ओटीटीवर एकलकोंडय़ा पद्धतीने चित्रपट पाहण्यात समाधानच नाही, असं तो सांगतो. तर नुकतीच शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या गौरी राऊळच्या मते या लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांच्या मनोरंजनविषयक आवडीनिवडी बदलल्या आहेत. ओटीटीवर सतत नवीन काही शोधण्याची सवय लागल्याने वॉचलिस्टमध्ये भरपूर मनोरंजक साहित्य दाखल झालं आहे, पण थिएटरमध्ये जाऊन एकत्र चित्रपट पाहण्याचा अनुभव गाठीशी असल्यावर ओटीटीवर चित्रपट पाहताना एकटेपणाची भावना निर्माण होते.

थिएटरमध्ये जाऊन ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ची उत्सुकता नरम पडली आहे. छोटय़ा छोटय़ा गमतीही मिस झाल्यात. उदा. शिट्टय़ा, टाळ्या, इमोशन आणि लाफ्टर. ओटीटीवर एकाग्रतेने चित्रपट पाहाणं अवघड असतं, कारण मध्येच कामं येतात, कोणी बोलावतं. त्यामुळे थांबत थांबत चित्रपट पाहाणं कं टाळवाणं होऊन जातं, असं पुण्याचा अक्षय गायकवाड सांगतो. तर मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी करणारा मोहित खोसला सांगतो, ओटीटीवर हवं तेव्हा ‘प्ले’ आणि ‘पोझ’ करण्याची संधी मिळते, ती एक सोय सोडली तर ‘नेटफ्लिक्स’ वगळता अन्य कु ठल्या ओटीटीवरचा आशय मी पाहत नाही. त्याउलट मला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यात जास्त गंमत वाटते. चित्रपट हा तरुण पिढीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. चित्रपटांचा भव्यपणा, त्यातली रंजकता एकत्रित अनुभवण्याला ते जास्त प्राधान्य देतात. मात्र ओटीटीवर चित्रपट पाहिल्यानंतर ना त्यातली भव्यता अनुभवता येत ना एकत्रित पाहण्याचा आनंद. त्यामुळे तरुणाईचा हिरमोड झालेला दिसतो.

ओटीटीवर आतुरतेने चित्रपट पाहिले गेले, मात्र ते पाहिल्यानंतर थिएटरमधील चित्रपटाचा? ‘फील’च  त्यात नव्हता, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. एकं दरीतच ओटीटीवर आपला प्रेक्षक असल्याने चित्रपट तिथे प्रदर्शित करण्याची अहमहमिका चित्रपट निर्मात्यांमध्ये सुरू असली तरी ओटीटीवर वेबमालिकांपलीकडे जाण्याची तरुणाईची तयारी दिसत नाही आहे.

या पार्श्वभूमीवर थिएटर्स कधी सुरू होत आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अर्थात, थिएटरमध्ये चित्रपट पाहाण्याचा अनुभव आधीसारखा उरलेला नाही याचीही कल्पना बऱ्याच जणांना आहे. गौरीच्या मते, पूर्वी ज्या मुक्तपणे आणि आनंदाने आम्ही सिनेमा थिएटरमध्ये जाऊन अनुभवायचो तसा तो आता अनुभवायला मिळणार नाही, कारण मनात सतत सोशल डिस्टन्सिंगचा विचार असेल, सावधानता बाळगणे आवश्यक असल्याने तोच विचार मनात घुमत राहील आणि आनंदाने चित्रपट थिएटरमध्ये पाहता येणार नाही. तर परिक्षितच्या मते, प्रेक्षकांना सुरुवातीला चित्रपट पाहताना भीती वाटेल पण उत्सुकताही तेवढीच असेल. थिएटर सुरू होणार आहेत हे कळताच पुन्हा त्याच जोशात प्लॅनिंगला सुरुवात होईल, असं तो सांगतो. पन्नास टक्के  प्रेक्षकांसह थिएटर्स सुरू झाली तरी त्याच भव्यतेने आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर चित्रपट दिसणार असल्याने तोच अनुभव घेता येईल. चित्रपट हा बिग स्क्रीनसाठी आहे तर ओटीटी वेबमालिकांसाठीचा मंच आहे, असं अक्षय ठामपणे सांगतो. सुरक्षेसंबंधित सगळे नियम पाळून चित्रपट पाहण्याची आपली तयारी असल्याचे मोहित सांगतो.

तरुणाईच्या सोशल लाइफमध्ये थिएटर्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हे या लॉकडाऊनच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. ओटीटीलाही डोक्यावर घेणारी तरुणाई सध्या लॉकडाऊनमधील एकटेपणाला कं टाळली आहे. आपलं सोशल लाइफ पुन्हा उत्साहात सुरू करण्याच्या तयारीत असलेली तरुणाई म्हणूनच थिएटर सुरू होण्याची वाट पाहाते आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2020 2:18 am

Web Title: youth expecting to reopen movie theater zws 70
Next Stories
1 आँखों की गुस्ताखियाँ..
2 सदा सर्वदा स्टार्टअप : आराखडा बिझनेसचा!
3 गणराज रंगी..
Just Now!
X