युथ फेस्टिवलमध्ये सादर झालेले संवेदनशील विषय
* स्त्रियांवरचे अत्याचार
* रिसेशनचे चटके आणि महागाईची चणचण
* ओढलेली रिलेशन्स आणि विकत घ्यावी लागणारी नाती
* समलैंगिकता
* पाश्चात्य संस्कृतीची ओढ
मुंबई विद्यापीठाचा ‘युथ फेस्टिवल’आणि पुण्याचा ‘पुरुषोत्तम करंडक’या आंतरमहाविद्यालयीन स्तरावरच्या महत्त्वाच्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. तरुणांच्यातली उर्मी आणि गुर्मी यातून दिसते. अभिनायासारख्या कलेच्या बोलक्या माध्यमातून सामाजिक, संवेदनशील आणि नाजूक विषय हाताळण्यासाठी लागणारी कौशल्य, जागरूकता, सजगता आणि िहमत ह्या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या ठिकाणी जागृत आहे, हेच या स्पर्धामधून अधोरेखित झालं. स्पर्धामध्ये यंदा सादर झालेल्या विषयांमधून तरुणाईविषयी एक वेगळा ‘अँगल ऑफ पस्रेप्शन’मिळाला.
खरंतर जुल ते ऑगस्ट हा काल म्हणजे कॉलेजमधल्या फेस्टिवल्समध्ये भाग घेण्याचा आणि धम्माल, मस्ती करण्याचा. कॉलेज सुरु झाल्या-झाल्या प्रत्येक अ‍ॅक्टिव्ह कॉलेजियन्सना वेध लागतात ते युथ फेस्टिवलचे. मुंबई विद्यापीठाकडून आयोजित केला जाणारा युथ फेस्टिवल म्हणजे मुलांमधल्या टॅलेण्टला भरभरून वाव देणारा कॉलेज लाईफचा एक अविभाज्य घटक !!! स्पृहा जोशी, उदय टिकेकर, आरती अंकलीकर टिकेकर, सिद्धार्थ जाधव यांसारखे कित्येक कलाकार ह्याचं युथ फेस्टिवलमधून घडले आणि पुढे जनमानसात लोकप्रिय झाले. संत तुकाराम सारख्या चित्रपटात आपल्या जिवंत अभिनयाने एक अनोखा ठसा प्रेक्षकांच्या मनावर रुजवलेल्या वीणा जामकर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर, युथ फेस्टिवल म्हणजे एक अनोखी धम्माल आणि तुम्हाला खूप काही शिकवून जाणारा फेस्टिवल. आणि खास करून यामधले थिएटर आणि फोक डान्सचे इव्हेंट्स तर तुम्हाला खूप काही देऊन जातात.
युथ फेस्टिवल आणि नाटक ही परंपरा खूप जुनी. एकांकिका, एकपात्री आणि स्कीट्स यांमधून सादर केल्या जाणाऱ्या कलेवर प्रेक्षक खूश असतात. गेल्या दोन – तीन वर्षांत  विष्एकांकिकांच्या विषयांमधून सर्वच विद्यार्थ्यांची आणि त्याचबरोबर दिग्दर्शकांचीही सर्जनशीलता दिसायला लागली आहे. सात-आठ वर्षांपूर्वीच्या नाटकांच्या विषयांचा फॉरमॅट पाहता, कुठेतरी ‘घिसेपिटे’ विषय किंवा ‘तोच-तोच’ पणा दिसून यायचा असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि दिग्दर्शकांचही म्हणणं आहे. पण गेल्या दोन- तीन वर्षांत सादर केले जाणारे विषय हे बरेच संवेदनशील आणि सामाजिकतेचं भान असलेले आहेत.
या वर्षी िहदी एकांकिकांमध्ये पहिली आलेली जोशी-बेडेकर कॉलेजची ‘दमन’ ही एकांकिका उदाहरण म्हणून ह्या एकांकिकेत स्त्री-भ्रूण हत्येचा गेल्या कित्येक वर्षांपासून चच्रेत असलेला विषय, ‘पोलीस स्टेशनमधील’ सीनच्या स्वरूपात अतिशय संवेदनशील रूपात दाखवण्यात आला. पोदार कॉलेजने सादर केलेल्या दोन्ही एकांकिका (मराठी आणि िहदी) सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या आणि त्याच बरोबर तरुण पिढीवर भाष्य करणाऱ्या होत्या. चांगली सॅलरी मिळावी आणि आजच्या जगात कुठेतरी ‘सव्‍‌र्हाईव्ह’ व्हावं ह्या हेतूने प्रत्येक तरुण मुलाचं जीआरई देणं बरोबर नाही. हे सांगता सांगता असहायपणे स्वतही तेच करणं या एकांकिकेत दिसलं. ही असहायता सध्याच्या तरुण पिढीच्या मानसिकतेवर एक दृष्टीक्षेप टाकून जाते. सध्या तीव्रपणे ज्याच्या झळा जाणवताहेत अशा ‘रिसेशन’ पिरियड मधलं एका मध्यमवर्गीय घराचं चित्र, त्या रिसेशनला सामोरं जाणं आणि त्या पाठोपाठ सुरु असलेला न संपणारा ‘जाच’ ह्या सगळ्याच गोष्टी उल्लेखनीय पद्धतीने अधोरेखित केल्या होत्या. भवन्स कॉलेजने सादर केलेल्या एकांकिकेत एका प्रामाणिक वकिलाची झालेली ससेहोलपट जागृत प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाते. त्याचबरोबर माणूस संवेदना, आणि माणुसकी हरवत चालल्यासारखा वागतोय, सध्याच्या रिलेशन्स वर भाष्य करणारी, नाती विकत घ्यावी लागतील किंवा लागताहेत हे त्यातून जाणवलं. मुलांची पाश्चात्य संस्कृतीची ओढ, समलंगिकता यांसारख्या अनेक विषयांवर जीजी, सिद्धार्थ, मिठीबाई, एम.डी. यांसारख्या अनेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या.
एखादा सामाजिक आणि संवेदनशील विषय ३० मिनिटाच्या थिएटरच्या चौकटीत बसवताना करावी लागणारी कसरत आणि त्यातून प्रत्येक विद्यार्थाची आणि त्यांच्या दिग्दर्शकांची दिसणारी सर्जनशीलता आणि मेहनत वाखाणण्याजोगी होती. विठ्ठलाच्या स्वरूपात सध्याच्या सर्व सामाजिक, राजकीय विषयांवर आसूड ओढणारी संजय पवार लिखित ‘ऐन आषाढात पंढरपुरात’ ही एकांकिकाही ह्यावर्षी सादर करण्यात आली. ३०  मिनिटांच्या एकांकीकेपेक्षाही १ मिनिटांत सादर केलं जाणारं स्कीट खूप चॅलेंजिंग असतात, असं म्हणणाऱ्या आकांक्षाचं म्हणणं असं होतं की, युथ फेस्टिवलमध्ये सादर केल्या जाणाऱ्या विषयांवरून प्रत्येक मुलाची जागरूकता आणि पर्यायाने संवेदनशीलताही दिसून येतेय. पण त्याचबरोबर आपण जनजागृतीशिवाय दुसरं काहीही करत नाही आहोत ही खंतही मनाला वाटत राहते. पण कुठेतरी अजूनही वेगवेगळे विषय हाताळले जाऊ शकतात आणि वेगवेगळ्या पस्रेप्शनमधून मांडता येऊ शकतात असंदेखील ती म्हणाली. पिल कॉलेजने सादर केलेल्या एकांकिकेत असलेली टॅग लाईन ‘मला लाज वाटते मुलगी असण्याची’ ही स्वतकडे मुलगी म्हणून बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देऊन जाते असं तिचं म्हणणं आहे. बेसिकली स्कीट्समधून ह्यावर्षी जास्त प्रमाणात ‘स्त्रियांवरचे अत्याचार’ हा विषय जरी हाताळला गेला असला, तरी कुठेतरी त्या विषयाकडे वेगवेगळ्या व्यक्तींच्या ‘अँगलने’ बघायला लावणं हे प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांने खूप उत्तमरीत्या आणि यशस्वीरीत्या पार पाडलंय.
खरंतर युथ फेस्टिवल म्हणजे तरुणांच्यातली उर्मी आणि गुर्मी हे दोन्ही फॅक्टर सांभाळणारे घटक. पण अभिनायासारख्या कलेच्या बोलक्या माध्यमातून सामाजिक, संवेदनशील आणि नाजूक विषय हाताळण्यासाठी लागणारी कौशल्य, जागरूकता, सजगता आणि िहमत ह्या साऱ्या गोष्टी अजूनही विद्यार्थ्यांच्या ठिकाणी जागृत आहेत. एक जागता प्लॅटफॉर्म मिळत असल्यामुळे तरुणाईची संवेदनशील वृत्ती एका वेगळ्याच स्वरूपात समोर येतेय. आणि म्हणूनच यंदाचा युथ फेस्टिवल एक वेगळा ‘अँगल ऑफ पस्रेप्शन’ देऊन जातेय.
viva.loksatta@gmail.com