हॅलो फ्रेंडस्! क्या है फिलहाल आपका रिलेशनशिप स्टेटस? कब हुवा है लास्ट अपडेट? बोले तो.. रिलेशनशिप ये कन्सेप्ट इतनी लंबीचौडी है, के क्या बताए.. ही कन्सेप्ट पुन्हा एकदा चच्रेत यायचं कारण म्हणजे चेतन भगतची ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणारी ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही कादंबरी. चेतन भगतच्या कल्पक डोक्यातला विचार आपण प्रेडिक्ट करू शकणार नाही. चेतन तो है एक बेस्टसेलर रायटर. पण, आपून तो अपने हिसाब से भेजा लडा के देख सकता है. है के नही?
‘हाफ गर्लफ्रेंड’ ही काय भानगड आहे? ही काही नवी कन्सेप्ट आहे की काय? हाफ गर्लफ्रेंड म्हणजे नेमकं कोणतं नातं? यावर सोशल नेटवर्किंग साइटवर ऑलरेडी चर्चा सुरू आहे. कोणी म्हणतं ही रिलेशनशिप म्हणजे कन्फ्युजन, कोणी म्हणतं कॉम्प्रमाईज, कोणी म्हणतं त्यात कमिटमेंट नाहीये. अनेकांना ही एक ‘रिलेशनशिप अ‍ॅडजेस्टमेंट’ आहे, असं वाटतंय. फ्रेंडशिपपेक्षा काही तरी जास्त आहे, पण नक्की फिगरआऊट न करता येणारं हे नातं आहे, असं काही म्हणतात. कुणाला ही कथा हॉलीवूडपटावरून बेतलेल्या गोष्टीची गोष्ट वाटतेय, तर कुणी ही कन्सेप्टदेखील फॉरेनवरून आयात केल्याचं सांगतंय. या कन्सेप्टमध्ये मुलगा-मुलगी असा भेद नाहीये, म्हणजे हाफ गर्लफ्रेंड तसा हाफ बॉयफ्रेंडही असू शकतोच की! ते कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. हाफ गर्लफ्रेंड या टर्मिनॉलॉजीबद्दल तरुणाईला काय वाटतं? हे रिलेशनशिप स्टेटस असू शकतं का? ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कन्सेप्टविषयी काही जणांनी आपली मतं ‘व्हिवा’शी शेअर केली.

संस्कृती सुर्वे
‘हाफ गर्लफ्रेंड’ ही एक अशी कल्पना वाटतेय की, ‘ती’ मुलगी ‘त्या’ मुलाची पूर्णपणे गर्लफ्रेंड नाहीये. ‘ती’ मुलगी नि ‘तो’ मुलगा हे ‘कॉम्प्रमाईज्ड रिलेशनशिप’मध्ये आहेत. एकदा का तिला तिचा ‘मि. परफेक्ट’ मिळाला की ती त्या मुलाला सोडेलच, म्हणून ‘ती’आहे ‘हाफ गर्लफ्रेंड’! हा टॉपिक काही नवीन नाही. पुस्तकाच्या टीझरवरून जाणवतंय की, ही गोष्ट ‘फ्रेंडस् विथ बेनिफिटस्’ या हॉलीवूड मूव्हीच्या गोष्टीसारखीच आहे नि तिला इंडियन टच दिलाय. ‘माधव’ला ‘रिया’विषयी फक्त मत्री वाटतेय नि ते एक कॉम्प्रोमाईज आहे. त्यात कुठंही प्रेम नाहीये. चेतन भगतची पुस्तकं ही भारतीय नि त्यांच्या भावविश्वावर आधारलेली असल्यानं स्टोरीशी चटकन कनेक्ट होता येतं. त्याच्या जवळपास सगळ्या पुस्तकांच्या टायटलमध्ये नंबर्स असतात, जे खूप युनिक आहे.

अश्विन निमदेवकर
‘हाफ गर्लफ्रेंड’ या कन्सेप्टमध्ये मुलगा नि मुलगी हे ‘क्लोज रिलेशनशिप’मध्ये नसतात पण त्यांचं नातं फ्रेंडपेक्षा अधिक असतं. ती बऱ्याचदा एकत्र वेळ घालवतात. एन्जॉय करतात. एकत्र भटकणं, मजेत वेळ घालवणं वगरे गोष्टी करतात. कधी ‘वन नाईट स्टॅण्ड’ करतात. पण ही रुटीन रिलेशनशिप नाही. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप ही कन्सेप्ट नाही. त्यात ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ही असू शकते. ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही कन्सेप्ट नवीन आहे नि तिचा अनुभव यंगस्टर्स घेऊ लागलेत. The concept is new n is still in practice among youngsters. मात्र, माझ्या मते – चेतन भगतचं लिखाण हे भाबडं, अपरिपक्व असून फारसं कसदार नाहीये. त्यानं लव्ह स्टोरीजच्या चौकटीबाहेर पाऊल ठेवायला हवं.    

अर्णव नायर
‘हाफ गर्लफ्रेंड’ या चेतन भगतच्या नव्या पुस्तकाबद्दल नि त्यातल्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या रिलेशनशिप कन्सेप्टबद्दल यंगस्टर्समध्ये कुतूहल निर्माण झालंय. ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा रिलेशनशिपचा प्रकार फॉरेनमधून आलाय. ही टर्मिनॉलॉजी फॉरेनमधून अ‍ॅडॉप्ट केली आहे. ‘हाफ गर्लफ्रेंड’ हे नातं कधी कधी कन्व्हिनियंट असतं. कारण तुम्ही त्या मुलीबद्दल शुअर नसता, तेव्हा तुम्ही कमिटमेंटमध्ये अडकत नाही. बाकी, चेतन भगतची बुक्स रिअलिस्टिक असतात. त्यातले टॉपिक्स, कथा रिलेटिंग वाटतात.

अनुजा रामगुडे
‘हाफ ब्रदर’, ‘हाफ सिस्टर’ या कन्सेप्ट माहिती होत्या, पण चेतन भगतच्या पुस्तकामुळं आलेली ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही कन्सेप्ट नवीनच आहे. ‘रिलेशनशिप’ ही गोष्ट आताच्या युथसाठी नवीन नाही. त्यात गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असतातच. पण ‘हाफ गर्लफ्रेंड’ म्हणजे काय? मित्र- मैत्रिणींमध्ये कोणाला तरी एकालाच हवी असलेली रिलेशनशिप आणि दुसऱ्याला आपलं नातं मत्रीपर्यंतच राहावंसं वाटत असेल, तर ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा या प्रॉब्लेमवरचा तोडगा असावा.. किंवा ही ती रिलेशनशिप ‘अ‍ॅडजस्ट’ करण्याची नवीन पद्धत असावी. हे मुलांच्या आणि मुलींच्या बाबतीतही घडू शकेल. पुस्तकाच्या नावावरून बऱ्यापकी अंदाज बांधता येत असला तरी प्रत्यक्षात ‘हाफ गर्लफ्रेंड’ आहे तरी काय, हे पाहण्यासाठी पुस्तकच हातात येण्याची वाट पाहावी लागेल.

रेवती गोखले
चेतन भगतची पुस्तकं खूप वेगळ्या विषयांवर असतात. फ्रँकली स्पीकिंग, त्या पुस्तकांमध्ये एक गोष्ट कॉमन असते- ती म्हणजे पुस्तकातल्या ‘हीरो’ला दर वेळी ‘हीरॉईन’ एका नजरेतच आवडते.. अगदी फिल्मी स्टाईल! आणि पुढे मग गोष्टी वाढत जातात.. उदाहरणार्थ ‘२ स्टेट्स’ वगरे पुस्तकांमध्ये अगदी असंच घडलं. आता ‘हाफ गर्लफ्रेंड’ या नव्या पुस्तकाच्या नावावरून तरी असं वाटतं की, एखाद्या मुलाला त्याच्या सर्वात जवळच्या फ्रेंडला बहीण मानावं की तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असावं, याबद्दल त्या मुलाच्या मनात कन्फ्युजन असणार. नावावरून तरी हे पुस्तक खूप वेगळं आणि इंटरेस्टिंग असेल, असं वाटतंय. हाफ गर्लफ्रेंड ही कन्सेप्ट तशी कनफ्युजिंग वाटतेय.

अमिता पंडय़ा
‘हाफ गर्लफ्रेंड’ ही कनसेप्ट अशी आहे की ‘ती’ मुलगी पूर्ण कमिटमेंट देत नाहीये. ‘ती’ त्या मुलासोबत आहे, पण ‘ती’ तिच्या फ्युचरबद्दल शुअर नाहीये. ती दोघं किती तरी गोष्टी शेअर करतात. मूव्हीजला जाणं, कॅफेत जाणं वगरे. ती कदाचित तिच्या पर्सनल गोष्टीही त्याच्याशी शेअर करतेय. बिकॉज हाफ गर्लफ्रेंड इज मोअर दॅन फ्रेंडशिप बट लेस दॅन फुल्ली कमिटेड रिलेशनशिप. एरवी ‘जीएफ’ नि ‘बीएफ’ या रिलेशनमध्ये खूपच कमिटमेंट असते. लग्नाचा विचार या रिलेशनशिपमध्ये केला जातो. ‘हाफ गर्लफ्रेंड’मधली सिच्युएशन पाहता ‘ती’ मुलगी पूर्णपणे कमिटेड नाहीये. पुस्तकाच्या टीझरवरून वाटतंय की, त्याला ती आपली ‘जीएफ’ व्हावीशी वाटतेय, पण तिला त्याच्याशी फक्त फ्रेंडशिपच ठेवायची आहे. तरी ‘ती’ कॉम्प्रमाईज करून त्याची ‘हाफ गर्लफ्रेंड’ होते. चेतनच्या साऱ्या पुस्तकांनी यंग जनरेशनला अ‍ॅट्रॅक्ट केलंय. यंगस्टर्सच्या गोष्टींसोबतच त्यांचे प्रॉब्लेम्सही त्यानं चांगल्या प्रकारे आपल्या लिखाणातून मांडलेत. यंगस्टर्सच्या भावविश्वाची नेमकी नस त्याला सापडली आहे.