सफरचंद हे काही उत्तम गुणधर्म असणाऱ्या फळांपैकी एक. पहाडी प्रदेशात, थंड हवेत सफरचंद होत असली तरी आजकाल ती आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. सफरचंदापासून केलेल्या काही वेगळ्या, टिकणाऱ्या रेसिपीज् आजच्या मेन्यू कार्डमध्ये..
उत्तम फळात गणल्या जाणाऱ्या सफरचंदाचे मूळ स्थान युरोप व आशियातील थंड पहाडी प्रदेश आहे. सफरचंदाचे झाड आकाराने लहान व रेशमासारखे मुलायम असते. त्याची पाने अंडाकार, टोकदार, दोन-तीन इंच लांब व कात्र्या-कात्र्याची असतात. याचे फळ नरम गोल व संत्र्याएवढे असून वरून चपटे असते. त्याची फुले लाल असतात. सफरचंदामध्ये अनेक जाती आहेत. त्यात गोन्हउन डेलीशस, प्रिन्स आल्बर्ट, चार्ल्स रोल्स, न्यूटन वन्डर, ब्रेमले सिडिलग, लेक्सन सुपूर्व ब्लेनहीम ऑरेज, ऑरेंज पिपिन, रेड सोल्जर व अमेरिकन मधर या दहा मुख्य जाती विशेष प्रसिद्ध आहेत. सफरचंदाचे टिकणारे पदार्थ म्हणजे त्यापासून लोणचे, मुरंबा, चटणी व सरबत बनवले जाते.
भारतात काश्मीर व कुलूच्या परिसरात व हिमालयाच्या कित्येक भागांत उत्तम प्रतीची सफरचंद होतात. पहाडी प्रदेशातही यांची लागवड केली जाते. कंदाहार व जपानसारख्या दूरच्या देशांतून आपल्या देशात पेटय़ा भरून सफरचंद विकायला येतात. सफरचंद लवकर खराब होत नसल्यामुळे ती दूरदूरच्या प्रदेशांत पाठवता येतात.
काश्मिरी सफरचंद स्वस्त असतात. सफरचंदाचा स्वाद आबंट-गोड असतो. अशा चवीचे सफरचंद उत्तम प्रतीचे समजले जाते. कारण आंबटगोड स्वाद असणारे सफरचंद पित्त-वायूचा प्रकोप शांत करतो, व आतडय़ांना मजबूत करते. सफचंदामध्ये ग्लुकोज, काबरेहायड्रेट, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, इथर, मॅलिक अ‍ॅसिड, लिसिथिन, खनिज वगरे क्षार असतात. त्यात जीवनसत्त्व बी-१ आणि सी असते. सफरचंदामध्ये टार्टरिक अ‍ॅॅसिड असल्याने ते एखाद्या तासात पचते आणि खाल्लले दुसरे अन्नही ते लवकर पचवते. सफरचंदाच्या गरापेक्षा त्याच्या सालीत जीवनसत्त्व सी जास्त प्रमाणात असते. दुसऱ्या फळांपेक्षा सफरचंदात फॉस्फरसचे प्रमाण सर्वात अधिक असते. सफरचंदामध्ये लोहाचे प्रमाणही अधिक असते.

सफरचंदाचे वेफर्स
साहित्य : ताजे सफरचंद १ नग, िलबाचा रस १ चमचा, मीठ चवीनुसार, कॉर्नस्टार्च १ चमचा, तेल तळायला.
कृती : िलबाच्या रसात मीठ मिसळून त्यात सफरचंदाचे पातळ गोल काप घालावे. दोन मिनिटांनंतर तिला काढून कोरडय़ा कॉर्नस्टार्चमधे घोळवून, झटकून कडक होईस्तोवर डीप फ्राय करा. ही रेसिपी मीठ, िलबू न लावतासुद्धा करू शकतो.

अ‍ॅपल डोनट
साहित्य : सफरचंद २ नग, मदा १ वाटी, बेसन २ चमचे, आरारोट २ चमचे, दही २ चमचे, वनस्पती तूप तळायला, १ तारी साखरेचा पाक – १ वाटी.
कृती : पदार्थ तयार करण्याच्या १ दिवसअगोदर दही, आरारोट, मदा, बेसन, कोमटसर पाण्यात घट्ट भिजवून ठेवणे. सफरचंदाचे काप करून ते मद्याच्या द्रावणात बुडवून तळून घेणे. तळलेले काप साखरेच्या पाकात बुडवून गरम गरम खायला देणे.

सफरचंदाचं लोणचं
आपण सहसा फळांपासून केलेलं लोणचं कमीच खातो. पण एक वेगळा आणि सोपा प्रकार आपण इथे पाहू. पाश्चिमात्य देशांत बऱ्याच ठिकाणी हे लोणचं बनवतात.
साहित्य : सफरचंद ५ ते ६ नग, साखर १ वाटी, िलबाचा रस िलबू ३ नग, कलमी पावडर अर्धा चमचा, काळे मिरे ४ ते १० नग
कृती : मध्यम आकाराच्या तुकडय़ांमध्ये सफरचंद (न सोलता) कापून घेणे. अर्धा वाटी साखरेला एका भांडय़ात गरम करा. पाणी न घालता त्याचे कॅरेमल तयार करा. (म्हणजेच त्याला तपकिरी रगं येईस्तोवर गरम करा.) सफरचंदाच्या तुकडय़ांना १ शिटी देऊन मुरंब्यासारखे वाफवून घ्या. त्यात तयार केलेले कॅरामल िलबाचा रस, दालचिनी पावडर, मीठ, चिली
फ्लेक्स घालून थंड करून सव्‍‌र्ह करा.

अ‍ॅपल नेस्ट
साहित्य : अ‍ॅपल २ नग, साखर २ वाटय़ा, पनीर अर्धी वाटी, बदाम पिस्त्याचे काप, मध २ चमचे
कृती : सफरचंद चिरून दोन भाग करून मधला भाग काढून टाकावा व त्याला ८ ते १० मिनिटे बेक करावे किंवा तळून घ्यावे. पनीर किसून त्यात साखर मिसळून तव्यावर परतून त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवावे. त्यानतंर वाटीमध्ये हे बॉल्स ठेवून त्यावर मध, बदाम पिस्त्याचे काप घालावे. छोटय़ा फ्रायपॅनवर साखर घालून त्याचे तार काढून त्या तारांनी अ‍ॅपलभोवती घरटय़ासारखे गुंडाळावे.

अ‍ॅपल जलेबी
हा सुद्धा प्रकार पारंपरिक जिलेबी प्रकारात केलेला. पण एक नवीन गोडाचा प्रकार म्हणून मला आवडणारा. मी एक पदार्थ इथे देतोच. पण माझ्या वाचनात आलेल्या एका १०० वर्षे जुन्या पुस्तकातसुद्धा याचा उल्लेख केला आहे.
साहित्य : मदा १ वाटी, बेसन २ चमचे, आरारोट, दही २ चमचे, तेल १ चमचा, २ तारी साखरेचा पाक, केशर, तूप तळायला, सफरचंदाचे काप, बदामाचे काप.
कृती : मदा, बेसन, आरारोट एकत्र करुन त्यात दही, तेल थोडे कोमट पाणी घालून भिजवावे. रात्रभर उबदार जागेत झाकून ठेवा. सकाळी फुगून आल्यावर पुन्हा फेसून घ्यावे. जास्त पातळ झाले असेल तर थोडा मदा, आरारोट घालावा. त्या पीठीत सफरचंदाचे काप बुडवून तुपात तळून घ्यावे. मंद आचेवर कुरकुरीत तळावे. त्यानंतर त्याला साखरेच्या पाकात बुडवून लगेच
काढा, वरून बदामाचे बारीक काप घालून सव्‍‌र्ह करा.
टीप : साखरेचा पाक जास्त पातळ झाला, तर पदार्थ कुरकुरीत होणार नाही. तळल्यानंतर जिलेबी कुरकुरीत नसतील तर त्यात थोडे आरारोटचे प्रमाण वाढवावे.