scorecardresearch

Premium

क्षण एक पुरे! : आयटी ते ‘बी बास्केट’

लहानपणापासून निसर्गाच्या  सान्निध्यात राहिलेल्या आणि हुशारी असल्यामुळे इंजिनीयर झालेल्या अमितला निसर्ग खुणावतच राहिला.

अमित गोडसे
अमित गोडसे

वेदवती चिपळूणकर

हाती घेतलेलं एक प्रोफेशन सोडून द्यायची हिंमत त्याने करिअरच्या एका टप्प्यावर दाखवली. मोठय़ा आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या आघाडीच्या कंपनीतील नोकरी त्याने अचानक सोडली. निसर्गाची आवड लहानपणापासूनच त्याला होती. मात्र एक दिवस अशी घटना घडली की मधमाशी या कीटक प्राण्याने त्याच्या डोक्यात घर केलं आणि त्याने सगळं सोडून मधमाशांच्या संवर्धनासाठी अभ्यास करायला सुरुवात केली. सध्या ‘बी मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेला तो तरुण म्हणजे अमित गोडसे. लहानपणापासून निसर्गाच्या  सान्निध्यात राहिलेल्या आणि हुशारी असल्यामुळे इंजिनीयर झालेल्या अमितला निसर्ग खुणावतच राहिला. एक दिवस त्याने धाडस दाखवून स्वत:च्या ‘पॅशन’नुसारच काम करायचं ठरवलं.

Two tribals died
पालघर : नंडोरे येथे विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू, रानडुक्कर पकडण्यासाठी रचला होता विद्युत सापळा
Fire at a multi storey building in girgaon 27 residents rescued safely from building
मुंबई : गिरगावमधील बहुमजली इमारतीला आग; इमारतीत अडकलेल्या २७ रहिवाशांची सुखरूप सुटका
kidnapping of minor girl
१५० सीसीटीव्ही निरीक्षणातून अपहरणाचा छडा; ४ वर्षीय चिमुरडीची सुटका, आरोपीला अटक
Nana Patole criticized Devendra Fadnavis
“फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…

त्याच्या आणि निसर्गाच्या नात्याबद्दल सांगताना अमित म्हणतो, ‘‘बाबा कोल-फिल्डमध्ये असल्याने त्यांची पोस्टिंग्ज ठिकठिकाणी होत असायची. काही वर्ष मी आजी-आजोबांकडे रायपूरमध्ये होतो. शाळेत मात्र मी उडिसामध्ये गेलो. केंद्रीय विद्यालयाची ती शाळा होती. आसपास खूप हिरवाई होती, झाडंझुडपं होती. निसर्गाने वेढलेलं ते वातावरण होतं. मला शाळेत जाण्यात विशेष रस कधीच नव्हता. आंबे, चिंचा पाडणं, झाडावर चढणं, रानात भटकणं असेच माझे छंद होते आणि त्यात मी रमायचो. एकदा तर मी शाळेत परीक्षा आहे हे विसरून रानात खेळतच बसलो. आई ओरडली की मी झाडावर चढून बसायचो. आई-बाबांना कधी कधी असंही वाटायचं की माझ्या संगतीमुळे मी असा वागतो. पण मला स्वत:लाच अभ्यास विशेष आवडायचा नाही आणि निसर्ग जास्त जवळचा वाटायचा. मात्र दहावीत जरा बरे मार्क मिळाले म्हणून मला सायन्सला घातलं. मग गणित वगैरे जरा बरं दिसतंय म्हणून इंजिनीयरिंगला गेलो. उंस्र्ॠी्रेल्ल्र सारख्या मोठय़ा कंपनीत नोकरीला सुरुवातही केली आणि माझं पाऊ ल मुंबईत पडलं.’’

नोकरी आणि मुंबई दोन्ही गोष्टी अमितला फारशा रुचल्या नाहीत. मात्र मुंबईने खूप काही शिकवलं हे सांगायला तो विसरत नाही. मुंबई आणि कॉर्पोरेटमधील नोकरीबद्दल तो म्हणतो, ‘‘मी नोकरी करत होतो तेव्हा एक क्युबिकल होतं जे माझं डेस्क होतं. केबिनमध्ये बसलेल्या सिनीयर्सना मी पाहायचो. त्या केबिनमध्ये बसून काम करायला आवडेल का?, असा प्रश्न मी स्वत:ला विचारला. त्यावेळी माझ्या मनाने मला सरळपणे नाही म्हणून उत्तर दिलं. मुंबईत मी फार काळ राहूही शकलो नसतो. मुंबईत फ्लॅट घेण्यापेक्षा पुण्यात घेणं त्या मानाने परवडणारं होतं आणि आयटीला पुण्यातही भरपूर संधी आहे. त्यामुळे पुण्यात फ्लॅट घेऊन मी तिथे गेलो. मात्र ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या सोशल मूव्हमेंटमध्ये स्वयंसेवक म्हणून मुंबईला येऊन काम करत होतो. त्यावेळी मुंबईने मला जगण्याचे अनेक दृष्टिकोन दिले. टाइम मॅनेजमेंट ही मोठी गोष्ट मुंबईने मला शिकवली.’’

निसर्गाची आवड वगैरे तरी ठीक आहे, मात्र एकदम मधमाशांसारख्या वेगळ्याच कीटकाचा ध्यास घेण्याच्या मागे एक घटना आहे. त्या टìनग पॉइंटबद्दल अमितने सांगितलं, ‘‘पुण्यात राहात असताना बिल्डिंगमध्ये एक मधमाशांचं पोळं झालं होतं. सवयीने बिल्डिंगमधल्या लोकांनी पेस्ट कंट्रोल करणाऱ्या लोकांना बोलावलं. हे पेस्ट कंट्रोलवाले लोक पोळ्यावर सरळ केमिकलचा फवारा करतात आणि त्यात कित्येक मधमाशा मृत्युमुखी पडतात. ते दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. निसर्गाचं प्रचंड कौतुक आणि आवड असल्यामुळे मला ते बघवलं नाही आणि सहनही झालं नाही. त्यावेळी मात्र मी ठरवलं की मधमाशांच्या बचावासाठी आणि संवर्धनासाठी आपण प्रयत्न करायचे, काम करायचं. त्यानंतर मी ऑफिसमध्ये सुट्टी टाकली आणि याच्या शोधाला लागलो. ऑफिसमध्ये मला स्वाइन फ्लू झालाय असं सांगून मी मधुमक्षिका पालन केंद्रात प्रशिक्षणासाठी गेलो.’’ प्रशिक्षणात त्याला अनेक नवीन गोष्टी समजल्या आणि नवीन अनुभवही त्याने घेतले. मधमाशीची भीती घालवण्यासाठी एकदा तिचा दंशही स्वत:ला होऊ  दिला, असं तो म्हणतो. त्यानंतर कामाला सुरुवात करायचं ठरवल्यावर मात्र नोकरी करणं मला शक्य झालं नसतं. त्यामुळे मी नोकरीचा सरळ राजीनामा दिला आणि पूर्णवेळ या कामाला द्यायला लागलो. त्यावेळी पुण्याला माझ्यासोबत माझे आजी-आजोबा राहात होते. त्यांना मी नोकरी सोडल्याचं सांगण्याऐवजी वर्क – फ्रॉम – होम करतोय असं सांगितलं होतं. मात्र एकदा आई पंधरा दिवसांसाठी राहायला येणार होती. त्यावेळी मात्र सगळ्यांना सगळं सांगावं लागलं. आईला प्रश्न पडला की सगळ्यांना काय सांगू? माझा मुलगा मधमाशांची पोळी काढायला जातो? पण हळूहळू माझ्या कामाने सगळ्यांना माझ्याबद्दल खात्री वाटू लागली, असा अनुभवही अमित सांगतो.

मधमाशांच्या संवर्धनासाठी सुरू केलेलं हे काम आता साडेचार – पाच वर्षांचं झालं आहे. ‘बी बास्केट’ या नावाने अमित ही कंपनी चालवतो. सध्या सहाजणांची असलेली ही कंपनी अनेकांना मधमाशा न मारता मधाचं पोळं काढण्याचं ट्रेनिंग देते, स्वत: अशा पद्धतीने मधाचं पोळं काढण्याचं काम अमित करतो आणि त्याचसोबत मधमाशांचं ब्रीडिंग करायचं ट्रेनिंगही त्याने घेतलेलं आहे. या आर्टिफिशियल पद्धतीने घडवून आणलेल्या नॅचरल ब्रीडिंगमुळे मधमाशांची संख्या वाढायला मदत होते. या सगळ्या कामाबद्दल अमित म्हणतो, ‘‘ब्रीडिंगमुळे मधमाशा तर वाढतातच, पण हल्ली टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये केल्या जाणाऱ्या फाìमगसाठी या मधमाशांच्या पेटय़ा फार उपयुक्त ठरतात. काही वेळा केवळ फाìमगसाठीचं पॉलिनेशन नव्हे तर माणसांची मन:स्थिती सुधारण्यासाठीही मधमाशा मदत करतात. त्यांचं सातत्याने सुरू असलेलं नि:स्वार्थी काम पाहताना अनेकांचं डिप्रेशन दूर झाल्याचेही किस्से आहेत.’’

सेट होत असलेलं करियर सोडून मधमाशांच्या मागे जाण्याची हिंमत करणाऱ्या अमितने स्वत:च्या करियरमध्ये तर जम बसवलाच आहे. पण तो आता अनेकांना हिमतीची प्रेरणा देतो आहे.

आयुष्यात आपल्याला जे हवं ते करण्यासाठी एकदा तरी हिंमत करावीच लागते. रिस्क हा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र रिस्क ही कॅल्क्युलेटेड असावी. आजूबाजूच्या सगळ्यांचा विचार न करता आपण आपल्याला आवडते ती गोष्ट करायला हवी. आपल्याला एकच आयुष्य मिळतं. त्यामुळे त्यात आपल्याला हवं तेच करण्यासाठी आपल्यात थोडीशी हिंमत असावीच लागते.

– अमित गोडसे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about bee boy amit godse

First published on: 08-02-2019 at 01:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×