Diwali 2024 Festival दिवाळी म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा आनंदाचा व उत्साहाचा सण! नवीन कपडे, छान छान वस्तू, लाडू, चिवडा, चकल्यांची मस्त मेजवानी, फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई याने घर आनंदून जातं. आपण भारतीय म्हणजे मुळातच उत्सवप्रिय. त्यातही जर दिवाळीचा सण असेल तर आपल्या आनंदाला उधाणच येतं. दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सण जवळ आले की घराची दुरुस्ती, सजावट हे सर्वात महत्त्वाचं काम असतं. सणासुदीचे दिवस सुरू झाले की आपलं घर देखील सुरेख सजवावं असं प्रत्येकालाच वाटतं. येणारं प्रत्येक वर्ष जसं आधीच्या वर्षांपेक्षा वेगळं असतं, तसंच नित्य वर्षी येणारे सणवारसुद्धा वेगळे असतात. म्हणूनच दिवाळीसाठी घर स्पेशल दिसावं असं वाटत असेल तर काही छोटे छोटे बदल करून ते सुंदररीत्या सजवता येईल.

आपल्याला शारीरिक, आर्थिक, मानसिक, धार्मिक, सामाजिक तसेच व्यावसायिक अशा विविध पातळींवर विचार करायला लावणारा दिवाळी हा सण आपल्या घराच्या सजावटीच्या माध्यमातून सर्व बाबींची पूर्तता करणारा ठरू शकतो. खास दिवाळीसाठी अंतर्गत संरचना आणि सजावट करत असताना आपल्यासाठी तसंच आपल्या घरासाठी गरजेच्या वस्तूंची निवड करून केलेल्या गोष्टी वातावरणनिर्मितीच्या दृष्टीने निश्चितच उपयुक्त ठरतात. या वातावरणनिर्मितीचा थेट परिणाम आपल्या मानसिकतेवर चांगल्याप्रकारे होऊन मनोमन आनंद मिळू शकतो.

corporate gifting gift trend on diwali occasion diwali gifts ideas for friends diwali gifts for family zws 70
भेटवस्तूंचा ट्रेण्ड
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
home decoration on diwali diwali decoration ideas diwali decoration ideas for home
घर सजवण्याची वेळ झाली…
When Aishwarya Rai Bachchan shared her tips for glowing skin
वयाच्या पन्नाशीतही तजेलदार त्वचा असणाऱ्या ऐश्वर्या रायने सांगितले सौंदर्याचे रहस्य? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!

घरातील पडदे आणि कुशन्स

दिवाणखान्यातली बैठक जर सोफा प्रकारातली किंवा भारतीय बैठक असेल तर त्यावरच्या कुशन्स, लोड यांची कव्हर्स गडद रंगांची असावीत. हल्ली पैठणी, खण, बांधणी आदी ट्रॅडिशनल लूक असलेली तयार कव्हर्स बाजारात सहज उपलब्ध आहेत. पडद्यांमध्येही वैविध्य असल्याने कुशन कव्हर्सना मिळतेजुळते पडदे विनासायास मिळू शकतात. फक्त रंगसंगतीचा मेळ बसला पाहिजे हे ध्यानात ठेवा. मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट पद्धतीने रंगांचा ताळमेळ बसवावा. एकाच डिझाइनचे, रंगांचे सेटही मिळतात, त्यांचा वापर करता येईल. यात कुशन्स, लोडची कव्हर्स, पडदे असतात. बैठक मस्त जमली की इतर सजावटीकडे लक्ष द्या. विशेषत: पडद्यामागून दिसणारी दिवाळीची रोषणाई आकर्षणाचा विषय असते. या दिवसांमध्ये घरामध्ये काढल्या जाणाऱ्या फोटोंसाठी पडद्याची सजावट फार उपयुक्त ठरते.

हेही वाचा >>> भेटवस्तूंचा ट्रेण्ड

लक्ष्मीपूजन सजावट

ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत, त्या ठिकाणी मागे भिंतीवर कायमचा एक रॉड किंवा पॅनलिंग करून ठेवा. त्या रॉडवर आपण दरवर्षी वेगवेगळा रंगीत कपडा किंवा वापरात नसलेली जरीची साडी बांधल्यास संपूर्ण सजावट उठावदार दिसेल. त्याचप्रमाणे एकच वॉलपेपरचा रोल लागेल, अशा साइजचे पॅनलिंग केल्यास दर वर्षी तेवढाच वॉलपेपर बदलणंही कठीण जाणार नाही. यामुळे प्रत्येक वर्षी आपल्याला सजावटीमध्ये विविधता आणता येईल.

रांगोळीची सजावट

अजून एक रेडी रांगोळीचा हटके प्रकार म्हणजे कापडावरची रांगोळी. कापडाचे डिझाइन करून त्यावर मोती, आरसे लावून किंवा भरतकाम करून ही रांगोळी तयार करता येते. हल्ली काही ठिकाणी, प्रदर्शनांमधून अशा रेडीमेड शिवलेल्या रांगोळ्या दिसायला लागल्या आहेत. थोडा वेगळा प्रयोग करायचा असेल तर शंख, कवड्या आणि शिंपल्यांचा वापर करून पॅचवर्क स्टाइलची कापडी रांगोळी तयार करता येईल. रांगोळीची ही हटके सजावट पटकन होण्यासारखी आहे.

झाडांची सजावट

दिवाणखाना, बैठकीची खोली दिवाळीच्या निमित्ताने विविध रंगांनी सुशोभित करण्यासाठी कुंडीत क्रोटन्स आणि कोलियसचे अनेक प्रकार लावता येतात. क्रोटन्सच्या अनेक जाती आहेत, प्रत्येक जातीचा रंग वेगळा असतो. एक – दोन रंगांचे किंवा मिश्र रंगाचे क्रोटन्स कुंडीत लावून घरात ठेवले तर घराची शोभा वाढते. सुरेख कुंडीमध्ये लावलेलं एखादं छोटंसं रोपटंही छान सजावटीचं माध्यम ठरू शकतं. टेराकोटा, सिरॅमिकच्या छान रंगसंगती असलेल्या, आकाराने लहान कुंड्या मिळतात. त्यात आवडीचं झाड लावून त्याचीसुद्धा सजावट करता येऊ शकते. पानं जाड, चकचकीत असल्यामुळे बरेच दिवस क्रोटन्स टवटवीत दिसतात. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि दिवसातले दोन-तीन तास ऊन या क्रोटन्सच्या प्रकारांना मिळाले तर हे प्रकार दिवाळीनंतरसुद्धा अनेक दिवस टिकतात.

लॅम्पची सजावट

दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव! दीप, पणत्या, आकाशकंदील असा सगळा प्रकाशमयी सरंजाम दिवाळीच्या स्वागतासाठी आता सज्ज झाला आहे. पण या दिवाळीत पारंपरिक रोषणाईबरोबरच इलेक्ट्रिक लॅम्पच्या साहाय्याने घर छान प्रकाशमय करू शकतो. यामुळे संपूर्ण खोलीला एक वेगळाच उबदार स्पर्श प्राप्त होतो. आजकाल लॅम्पमध्ये भरपूर वैविध्य दिसून येतं. वॉल लॅम्प, पिक्चर लॅम्प, हँगिंग लॅम्प, टेबल लॅम्प, फ्लोअर लॅम्प, क्रेप पेपर लॅम्प, क्रिस्टल लॅम्प, केनपासून बनवलेले लॅम्प, हॅण्डमेड पेपरपासून बनवलेले लॅम्प इत्यादी. खोलीतील एक वॉल एकदम मोकळी असल्यास तिथे वॉल लॅम्प एकदम चपखल बसेल. या लॅम्पच्या अवतीभवती किंवा खाली छोट्या दोन पेंटिंग्ज लावल्या तर सुरेख दिसेल. फक्त तुमच्या कलात्मक नजरेने आपल्या घरासाठी कोणता लॅम्प चांगला दिसेल हे हेरलं पाहिजे. या दिवाळीत लॅम्पची सजावट करून घराला एक फेस्टिव्ह लुक मिळेल यात शंकाच नाही.

डायनिंग टेबलवरील सजावट

दिवाळीच्या सकाळचं मन प्रफुल्लित करणारं वातावरण आणि डायनिंग टेबलवर ठेवलेले खास दिवाळीसाठी बनवलेले फराळाचे पदार्थ आणि तेदेखील सजवलेल्या डायनिंग टेबलवर ग्रहण करण्याचा आनंद मिळाला तर तो निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. बाजारात विविध प्रकारचे टेबल मॅट्स, डिनर सेट्स, ग्लासेस, डिशेस, बाऊल्स, टेबल नॅपकिन्स, काटे-चमचे उपलब्ध असतात. खास दिवाळीसाठी यामधून निवडक वस्तूंना पसंती देऊन या विशेष दिवसांसाठी आपण वापरू शकतो. अर्थातच, अशा प्रत्येक वस्तूची निवड करताना आपला कस लागतो. पसंत केलेल्या प्रत्येक वस्तूची टेबलवरील मांडणीदेखील सजावटीच्या दृष्टीने आकर्षक दिसणं महत्त्वाचं असतं.

फुलांची सजावट

दिवाळीसाठी झेंडू आणतानाच इतर सीझनल फुलंही आणा. अगदी घरभर नव्हे, पण मोक्याच्या ठिकाणी या फुलांची सजावट करा. ही रचना इकेबानासारखी आकर्षक करता येईल. ही ताजी टवटवीत फुलं ठेवायला टेराकोटा, सिरॅमिकचे लहानमोठे फ्लॉवरपॉट वापरता येऊ शकतील. घरातल्या सामानामुळे पाण्यात ताजी फुलं ठेवायला अडचण होणार असेल तर मग खऱ्यासारखीच दिसणारी फुलं, त्यांचे गुच्छ, माळांचा वापर करता येईल. सेंटेड कॅण्डल फ्लॉवर्सही वापरता येतील. एका मोठ्या आकाराच्या सुबक भांड्यांमध्ये किंवा तसराळ्यात किंवा घंगाळ्यात (तांब्या किंवा पितळीचे असेल तर उत्तम) पाणी घ्यायचं. आकारानं मोठी पण वजनानं हलकी अशी फुलं निवडायची. फुलं किंवा पाकळ्या पाण्यावर तरंगल्या पाहिजेत. मोठ्या आकाराचं भांडं असेल तर जरबेरासारख्या मोठ्या फुलांचा वापर करता येईल. फुलांच्या रंगांप्रमाणे सजवून तरंगणारी नक्षी पाण्यावर तयार करू शकतो. हल्ली बाजारात मिळणाऱ्या फ्लोटिंग कॅण्डल्स या पाण्यावर सोडल्या की काम झालं. ही सजावट खूपच सुंदर दिसते आणि घर उजळून टाकते.

या सर्व गोष्टींबरोबर दगडाच्या, पितळेच्या वस्तू, घंटा, नक्षीकाम केलेले मातीचे, लाकडाचे दिवे, समया या सर्वांमुळे वातावरणात प्रसन्नता भरून राहील. त्याचबरोबर जागोजागी कल्पकतेने ठेवलेली फुले आपल्याला आनंद तर देतीलच, पण घराचं पावित्र्यही जपतील. अशा रीतीने दसऱ्याच्या निमित्ताने केलेली गृहसजावट आपल्या खूप दिवस लक्षात राहील. घराचा किंवा दिवाणखान्याचा एखादा कोपरा अधिक उठावदार, प्रसन्न करता येईल. असे छोटे छोटे बदल आणि कलात्मक वस्तूंचा वापर करून कमी वेळेत एकदम झटपट सुरेख सजावट करता येते.

viva@expressindia.com

Story img Loader