गायत्री हसबनीस

ऑनलाइन साइटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या समर कलेक्शनमध्ये यंदा ‘स्विमवेअर’ सादर झाले आहे. या वेळी समर सीझनला शोभून दिसतील अशा लाइट रंगांचा वापर कमी करून त्याऐवजी मल्टिकलर, फंकी कलर आणि कलरफुल एम्बलिशमेंट स्विमवेअरमध्ये आले आहेत. त्यामुळे यंदाच्या हॉलिडेजमधील आऊटिंगसाठी बीचवेअर आणि स्विमवेअर हे अगदी नावीन्यपूर्ण आणि कम्फर्टेबल असे आले आहेत. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, शिइन, द लेबल लाइफ अशा साइट्सवर स्विमसूट्स हमखास उपलब्ध झाले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून फॅशनमध्ये समर सीझनला लक्षवेधी बदल होत आहेत आणि या वर्षीही तसे बदल पाहायला मिळतील. कपडय़ांच्या अनुषंगाने उन्हाळ्यात रुटिन, आऊटिंग, पार्टीज, रिसॉर्टिंग आणि बीचिंग या सर्व गोष्टी विचारात घेतल्या गेल्या आहेत. उन्हाळ्यात विशेष करून मुलंमुली रिसॉर्ट आणि बीचचा आवर्जून विचार करतात. त्यामुळे अशा लोकेशनसाठी साचेबद्ध फॅशनन करता कम्फर्टेबल, लाइटवेट आणि चांगल्या ड्रेपेबिलिटीच्या स्विमवेअरना पसंती मिळते आहे. फास्ट ड्रायिंग आणि मल्टिकलर्ड स्विमवेअरनासुद्धा जास्त पसंती दिली जातेय. या सीझनला स्विमसूट्सची फॅ शनविशेष वेगळी आहे. मुलींना पूर्वी फार कमी पर्याय स्विमसूटमध्ये उपलब्ध होते, परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून अधिक प्रमाणात स्विमसूट्सचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मिक्स फॅशनस्विमवेअरमध्येही आली. कॉस्मोपॉलिटन लाइफस्टाइलनुसार स्किम्पी बॉटम्स, इटसी आणि चिकी बॉटम्स अशा स्विमवेअरची स्टाइल स्टेटमेंट ट्रेण्डमध्ये आहे. तसेच रेट्रो हाय वेस्टेड बिकिनी, अ‍ॅथलेटिक वनपीस अशा नावीन्यपूर्ण स्टाइल्सही यात मोडतात. ‘व्हिक्टोरिया सिक्रेट्स’ यांसारख्या मोठय़ा ब्रॅण्डने असे स्विमवेअर आणले आहेत. या वर्षी स्विमवेअरच्या फॅब्रिक्समध्ये लायक्रा, वायनल, ट्रायकोट, पावर मेश आणि नायलॉन असे फॅब्रिक्स आहेत. डिझाइन्समध्ये स्विमसूट्स हे जास्त करून पॅटर्न्‍स, प्रिंट्स आणि नोशन्स यांमध्ये दिसतील. ब्राइट अ‍ॅबस्ट्रॅक्ट, बोल्ड फ्लोरल्स आणि गिंनम पॅटन्र्ड स्विमवेअर यंदा ट्रेण्डमध्ये आहेत. अप्पर ड्रेसिंगसाठी स्विमवेअरमध्ये फोम ब्रा, इलॅस्टिक आणि बोनिंग स्ट्रॅपलेस टॉप्स आहेत. याशिवाय बॉडी गार्मेटमध्ये कफ्तान आणि सरॉन्ग्स आहेत. समर सीझनला स्विमवेअरमध्येही खूप वेगळ्या प्रकारचे, पद्धतीचे सूट्स उपलब्ध आहेत.

कव्हर-अप्स : यंदा कव्हर-अप्समध्ये हॅण्डमेड क्निटेड ट्रीम आणि रोब स्टाइलचे स्विमवेअर आहेत. शिअर स्विमवेअरही यात पाहायला मिळतात. यात प्रामुख्याने क्रोशेट कव्हर-अप्स आहेत. फ्लोरल, हॅण्डक्राफ्टेड, पोलका डॉट्स, टाय अ‍ॅन्ड डाय पॅटर्नमध्ये पॅरिओ कव्हर-अप्स आहेत. पॅरिओ कव्हर-अप्समध्ये कॅलिडोस्कोप, पॅरिओ व्रॅप, गॉटेक्स पॅरिस आणि टूरमलाइन पॅरिओ स्विमवेअर सध्या सर्वत्र लोकप्रिय आहेत. मार्बल प्रिंट, एथनिक प्रिंट आणि फ्लोरल प्रिंटमध्ये खास करून फंकी अ‍ॅस्थेटिक असलेले कव्हर-अप्स मिळतील. शिफॉन बीच कव्हर-अप्सही यंदा ट्रेण्डमध्ये दिसतील ज्यात कॉन्ट्रास्ट रंगसंगती आहे. टास्सेल कव्हर-अप्ससुद्धा वेगळ्या स्टाइल्सचे आहेत आणि त्यात टाय शोल्डर, इनर्स्ट बॅकलेस टास्सेल, पॉन्चो आणि स्ट्राइप टास्सेल कव्हर-अप्ससुद्धा यात आहेत हे विशेष. यामध्येदेखील मंडला, मिकोनो आणि नियॉन प्रिंट्स लक्ष वेधून घेतात. लेस पॅनल, मोनोग्रॅम्ड, रेनबो, हकोबा स्टाईल, टायर्ड, नॉटिकल, हेमबर्ड, रॉम्पर, प्रेपी आणि पॉमपॉम असे नानाविध स्टाइल्स टास्सेल कव्हर-अप्समध्ये सहज उपलब्ध आहेत.

वन शोल्डर स्विमसूट्स : बॉडी फिटेड आणि आरामदायी असे हे स्विमसूट्स ब्लॅक रंगात यंदा जोरात ट्रेण्डमध्ये दिसतील. यात कलरफुल पॅटर्न असून बॉटनिकल आणि अ‍ॅनिमल प्रिंट्समध्ये हे खास करून दिसतील. यामध्ये ‘टायगर स्किन प्रिंट’ टॉप लिस्टवर आहे. पॅराडाईज बर्ड, रोमियो रोझ, डेझर्ट फ्लॉवर, टेम्पल डिझाईन, ओशन रोझ, कबाना रोझ, आणि मिडसमर प्रिंट असे हटके प्रिंट असलेले वन शोल्डर स्विमवेअर अगदी आकर्षक दिसतात. बनाना, रेड पॉपी फ्लोरल, पाम प्रिंट, मल्टिमोझॉक स्टाइल्सच्या प्रिंटचे स्विमसूटही विचारात घेण्यासारखे आहेत. फुल लाइन पॅटर्न, वन-शोल्डर रफल, वन शोल्डर बो, कट-आऊट असेही प्रकार यात आहेत. मेश कट-आऊ ट, टेर्ड आणि लेयर्ड वन शोल्डर स्विमवेअरसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. मोनोक्रोम, मस्टर्ड पोलका डोट्स आणि मेटॅलिक टाइपचे वन शोल्डर स्विमवेअरही पाहायला मिळतील. या वन शोल्डर स्विमवेअरची रचना जास्त करून विचारात घ्यायला हवी, ज्यात तुम्ही फोल्ड-ओव्हर आणि रिव्हर्झेबल स्विमवेअर घेऊ  शकता. यात काळ्या रंगासोबत आयलंड ब्लू आणि नेव्ही व्हाइट रंगही ट्रेण्डमध्ये आहे.

स्विम-टय़ूनिक्स, सरॉन्ग्स आणि कफ्तान : यात विशेषत: पांढऱ्या रंगाचे टय़ूनिक अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे चिकनकारी, पॅचवर्क, एम्ब्रॉयडरी, कॉटन प्रिंट, लेसिंग असे विविध प्रकार यामध्ये आहेत. यात पॉलिस्टर, अक्रायलिक आणि नायलॉन असे फॅ ब्रिक्सआहेत. कफ्तानमध्ये किमोनो कफ्तान, लूझ मॅक्सी कफ्तान आहेत. कफ्तानमध्ये एम्ब्रॉयडरी, चीक नेव्ही डिझाईन, कोस्टल आणि मेलेडी प्रिंटचे कूल पर्यायही उपलब्ध आहेत. व्ही-नेक, स्लीव्हलेस, सेल्फ टाय, थ्री फोर्थ स्लीव्हज असे नानाविध प्रकारही यामध्ये मिळतील. ट्रॉपिकल गार्डन, कन्व्हर्टेबल डिझाईन, ट्रायबल डिझाईन, टाय अ‍ॅन्ड डाय असे विविध कफ्तान स्विमवेअरमध्ये आहेत. जोमेट्रिकल प्रिंट, अल्टिमेट लेयर्समधील कफ्तानही नव्याने आले आहेत. झेब्रा प्रिंट आणि शर्ट टाइप कफ्तानही नवीन आहेत. बोहेमियन कफ्तान आणि कलरब्लॉक प्रिंटचे कफ्तान यंदा वेगळे ठरले आहेत. सरॉन्ग्स हे जास्त करून इटॅलियन प्रिंटमध्ये दिसतील. बीच प्रिंट, समर प्रिंट, अ‍ॅनिमल प्रिंट, कस्टम प्रिंट, ब्लॉक प्रिंट असे विविध प्रकारचे प्रिंटेड सरॉन्ग्स उपलब्ध आहेत. शिबोरी फ्लोरल सरॉन्ग्स आणि कॉकटेल सरॉन्ग्स हे प्रकार यंदा नवीन आहेत. सरॉन्ग्समध्ये व्हाइट कॉटन, सोलंब्रा आणि टक्र्वाईझ अशा नवीन स्टाइल्स प्रामुख्याने आढळतात ज्या ट्रेण्डी ठरल्या आहेत. सरॉन्ग्सवरती सनग्लासेस, हॅट्स (सोलंब्रा फॅब्रिकचे) आणि सी-साइड अ‍ॅक्सेसरिजमध्ये नेकलेसची फॅ शनपरफेक्ट वाटते.

वनपीस आणि बिकिनी : बिकिनीमध्ये ट्रायकिनी, मोनोकिनी असेही वेगळ्या धाटणीचे प्रकार आहेत. यंदा पुश-अप मोनोकिनी, नेकलाइन मोनोकिनी आणि ब्राझिलियन स्टाइल मोनोकिनी ट्रेण्डमध्ये आहे. हॉल्टर बिकिनी यंदा क्रॉस व्रॅप, हाय वेस्ट यामध्ये दिसेल. तसेच हाय नेक, साइड टाय, फ्रन्ट टाय बिकिनी यंदा बाजारात दाखल झाल्या आहेत. अन्डरवायर आणि फुल कव्हरेज स्टाइल्सही यात मोडतात. वनपीसमध्ये टू – टोन, बॅन्डेज, लो बॅक स्ट्राइप, लेटर पॅटर्न, क्रिसक्रॉस, रॅन्डम लीफ प्रिंट, कलरफुल स्ट्राइप्ड अशा नानाविध स्टाइल्स आहेत. यामध्ये या वेळी नानाविध डार्क चॉकलेट, डार्क ब्लू, हेवी शेड्स, येल्लो, क्रीम, डोटेड, रोझ रेड, वाइन बरंगडी, पर्पल आणि ग्रे असे रंग आहेत.

फ्लोरल स्विमसूट : फ्लोरल स्विमसूट्स हे जास्त प्रमाणात यंदा ट्रेण्डमध्ये असून ग्राहकांसाठी ते स्वस्त दरात उपलब्ध झाले आहेत. स्काफ्र्सही यंदा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फ्लोरल स्विमसूटमध्ये विटेंज फ्लोरल हा प्रकार जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे. हे स्विमसूटही काळ्या रंगाच्या शेड्समध्ये जास्त दिसतील ज्यावर एस्थर, ब्लॉसम, कॅमिला अशा फुलांच्या प्रिंट्सचे स्विमसूट आहेत. यात स्पेगेटी स्ट्रॅप, व्ही-नेक, बॅक क्रॉस स्ट्रॅप, लेस ट्रीम, स्लिम फीट फ्लोरल प्रिंटेड स्विमसूट्स आहेत. बेझी फ्लोरल, बाली फ्लोरल, डेझर्ट फ्लोरल इत्यादी प्रकारही यात आहेत. एक्झॉटिक, रेड, व्हाइट, ब्लू आणि कोल्ड शोल्डर, ऑफ शोल्डर स्विमवेअरही फ्लोरलमध्ये उपलब्ध आहेत.