scorecardresearch

Premium

खावे त्यांच्या देशा – मिश्र खाद्यसंस्कृतीचा देश -ऑस्ट्रेलिया – १

शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होतेय. आपण आजपासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहोत.

खावे त्यांच्या देशा – मिश्र खाद्यसंस्कृतीचा देश -ऑस्ट्रेलिया – १

 शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होतेय. आपण आजपासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहोत. ऑस्ट्रेलिया हा तसा आधुनिक काळात डेव्हलप झालेला देश. त्यामुळे इथली खास अशी खाद्यसंस्कृती निर्माण झालेली नाही. पण इथले मूळ रहिवासी असणाऱ्या आदिवासींच्या साध्या जेवणातील खासे पदार्थ इथल्या आधुनिक खाद्यसंस्कृतीत छान समरसून गेले आहेत.
क्वीन एलिझाबेथ-२ या क्रूझ लाइनवर काम करीत असताना, ऑस्ट्रेलियाच्या सिडनी हार्बरवर जेव्हा पहिल्यांदा उतरलो, तेव्हा माझी स्वप्नपूर्ती झाली! पोर्टवर जिथे शिप थांबली होती तिथे समोरच ऑपेरा हाऊस होतं. ती कमळासारखी भव्य आणि सुंदर इमारत आत्तापर्यंत फक्त चित्रातच पाहिली होती. ते चित्र प्रत्यक्षात समोर होतं. बोटीवरून सुट्टी होताच, मी ऑपेरा हाऊस आणि पूर्ण परिसराचा फेरफटका मारला आणि ‘जिवाची सिडनी केली’!
‘दिल चाहता है’ मधले काही सीन्स सिडनीमध्ये शूट झाले होते, हे मला सिडनी बघताना जाणवलं. काही गोष्टी नकळत आपल्या स्मृतीत जाऊन घर करतात आणि अचानक एक दिवस आपल्यासमोर येतात. ‘दिल चाहता है’ बघताना सिडनीची ती आवडलेली दृश्ये मनात कुठे तरी बसली होती. प्रत्यक्षात सिडनी बघताना ती मनातली चित्रे अचानक समोर आली. सिडनीचा तो परिसर खरंच सुंदर आहे. ऑपेरा हाऊसचं आíकटेक्चर भव्य-दिव्य आणि आगळंवेगळं आहे, हे प्रत्यक्ष बघताना प्रकर्षांने जाणवलं. आज सिडनीसारखं शहर अत्याधुनिक सोयी आणि आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीने गजबजलेलं असलं तरी ऑस्ट्रेलियाच्या इतर भागांत ही परिस्थिती नाहीए बरं का! तिथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारताना बऱ्याच गोष्टी नव्यानं कळल्या.
ऑस्ट्रेलियाचे मूळचे रहिवासी ‘अ‍ॅबऑरिजिन्स’ म्हणजेच ‘ऑस्ट्रेलियन आदिवासी’ हे होते. मग ब्रिटिश तिथे आले आणि या खंडात त्यांच्या वसाहती वसवल्या. तुरुंगवासासाठी ब्रिटिश कैद्यांना ऑस्ट्रेलियामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाठवत. त्यामुळे अस्सल ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृतीवर इंग्लंडचा प्रभाव दिसतो. अ‍ॅनझ्ॉक बिस्किटं, फिश आणि चीप्स, मीट पाय, स्कोन्स, पावलोवा (डेझर्टचा प्रकार) हे काही स्थानिक ऑस्ट्रेलियन खाद्यपदार्थ खूप पॉप्युलर आहेत. खरं म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या मूळ आदिवासी लोकांचं जेवण अगदी साधंसुधं होतं. त्यात भाजलेलं, खारवलेलं मांस, बटाटे इत्यादी खाद्य असतं.
ऑस्ट्रेलिया तसा खूप उशिरा बनलेला देश आहे. त्यामुळे तिथली खाद्यसंस्कृती इटली, चीन, भारतासारखी पूर्ण विकसित झाली आहे, असं म्हणता येणार नाही. पण तिथलं क्यूझिन निश्चितच विकासाच्या वाटेवर आहे, असं मला वाटतं. आजच्या ऑस्ट्रेलियन्सना थाय आणि इटालियन फूडची विशेष आवड आहे. त्यामुळे दिवसेंदिवस स्थानिक पदार्थामध्ये इतर देशांच्या रेसिपीज मिसळवून हे ऑस्ट्रेलियन क्यूझीन वैविध्यपूर्ण होत चाललं आहे हे निश्चित.
viva.loksatta@gmail.com

अ‍ॅनझॅक कोकोनट बिस्किट्स
साहित्य : लोणी – १२५ ग्रॅम, शुगर सिरप – १ टेबल स्पून,  मदा – १ कप, खोबरं – १ कप, साखर – १ कप, ओट्स – १ कप, खाण्याचा सोडा – २ टी स्पून, उकळतं पाणी – दोन टेबल स्पून.
कृती : १८०अंश सेल्सिअसला ओव्हन प्रीहीट करा. एका मोठय़ा बाऊलमध्ये मदा, खोबरं, साखर आणि ओट्स घ्या. एका छोटय़ा पॅनमध्ये लोणी आणि शुगर सिरप वितळवा. नंतर त्यामध्ये सोडा आणि पाणी मिक्स करा. आता हे बटरचे तयार मिश्रण बाऊलमधल्या साहित्यात टाकून चांगलं मिक्स करा. आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. दोन गोळय़ांमध्ये साधारण ३ सेमीचे अंतर ठेवा. १० ते १५ मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर हलकेच काढून घ्या आणि जाळीवर थंड करण्यास ठेवा.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

पमकीन स्कोन्स
साहित्य : बटर /मार्गारीन – एक टेबल स्पून, साखर – अर्धा कप, दालचिनी पावडर – अर्धा टी स्पून, अंडं – एक,  लाल भोपळा – १ कप (किसलेला), मदा – दोन कप
कृती : २२५ अंश सेल्सिअसला ओव्हन प्रीहीट करा. एका बाऊलमध्ये बटर आणि साखर एकत्र करा. त्यात अंड, दालचिनी पावडर आणि भोपळा एकत्र करा आणि चांगले मिक्स करा. चमच्याच्या साहाय्याने अलगद ढवळून घ्या. आणि मिश्रण ट्रेमध्ये ओता. दोन्ही हातांनी हे पीठ साधारण १ इंच (२.५४  सेमी) जाडी होईपर्यंत सारखं करून घ्या. कुकीज कटरच्या साहाय्याने राऊंड शेप दय़ा. दुसऱ्या ट्रेला आतून बटर लावून घ्या. आता हे तयार स्कोन ट्रेमध्ये लावून घ्या. दोन स्कोनमध्ये एक सेमी अंतर ठेवा. दहा ते वीस मिनिटे बेक करा. बटरसोबत गरमागरम सव्‍‌र्ह करा.

आजची  सजावट
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
कलिंगडाचा केक
बर्थ डे म्हटला किंवा कुठल्याही गोष्टींचं सेलिब्रेशन करायचं ठरवलं तर हल्ली केक आणला जातोच. कमी कॅलरीजचा पर्याय हवाय पण सेलिब्रेशनसाठी केक कटिंग तर हवं असं वाटत असेल तर हा वॉटरमेलन केक सुवर्णमध्य साधणारा आहे. हा खराखुरा केक नाही, तर सेलिब्रेशन मूड कायम ठेवणारा पर्याय आहे. कलिंगडाला केकच्या शेपमध्ये कापून घ्या आणि वर हव्या त्या फळांची सजावट करा. कलरफूल आणि देखणा वॉटरमेलन केक तयार.. शिवाय कॅलरीजची चिंता अजिबात नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian foods

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×