रेश्मा राईकवार

दिवाळी संपली आणि वातावरणात हलकीशी थंडी जाणवू लागली की आपोआपच फॅशनचा ट्रेण्ड बदलतो. एथनिक फॅशन कलेक्शनमध्ये अडकलेला जीव हलकेफुलके, काहीसे हटके प्रिंट आणि डिझाइन्स असलेले ट्रेण्डी मॉडर्न ड्रेसेस कुठे मिळतील, याचा शोध घ्यायला लागतो. हल्ली ई कॉमर्स साईट्सच्या कृपेने सीझन बदलला की बदलत्या फॅशनचे पडघम वाजायला सुरुवात होतात. त्यामुळे ट्रेण्डी फॅशनचा शोध घेण्यापेक्षा समोर दिसणाऱ्या मोठमोठय़ा फॅशन ब्रॅण्ड्सची नामावळी आणि त्यांची कलेक्शन्स चाळायला सुरुवात होते. मॉडर्न फॅशन कलेक्शन्स धुंडाळणाऱ्या स्त्रियांना हमखास पहिलं नाव सापडतं ते म्हणजे ‘वेरो मोदा’..

How to make raw mango juice premix
उन्हात न वाळवता बनवा कैरी सरबत प्रीमिक्स, फ्रिजशिवाय टिकणारी कैरी सरबत पावडर कशी बनवावी? ही घ्या रेसिपी
they were cheating people by mixing water in petrol people of jaipur exposed watch viral video
तुम्ही गाडीत पेट्रोलबरोबर पाणी तर भरत नाही ना! पाहा पेट्रोलपंपावरील घोटाळ्याचा धक्कादायक VIDEO
Watch this video before eating strawberries
स्ट्रॉबेरी खाण्याआधी हा व्हिडीओ एकदा बघाच! पुन्हा आयुष्यात कधीही खाणार नाही
Viral Video Shows Reckless Driving Of BEST Bus Driver dangerous driving skills on road of Mumbai
मुंबईतील बेस्ट बस चालकाचा बेजवाबदारपणा; सिग्नल तोडला अन्… VIDEO पाहून बसेल धक्का

डेली आऊटफिट, पार्टी वेअर ते अगदी थंडीच्या या दिवसात भटकंती करायचे निमित्त शोधणाऱ्या स्त्रियांना या प्रत्येक प्रकारासाठी लागणारे ट्रेण्डी कलेक्शन उपलब्ध करून देणारा ‘वेरो मोदा’ हा ब्रॅण्ड गेली कित्येक वर्ष लोकप्रियतेच्या यादीत टॉपवर आहे. कधी काळी परदेशात जन्माला आलेल्या अनेक ब्रॅण्ड्सनी पुढे जगभरात विविध प्रांतात आपला विस्तार केला. रिटेल फॅशन उद्योग स्वरूपात त्या त्या प्रांतात शिरल्यानंतर तिथल्या गरजा लक्षात घेत आपली बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न या ब्रॅण्ड्सनी केला. ‘वेरो मोदा’ हाही ‘बेस्टसेलर’ या युरोपियन ब्रॅण्डसमूहाचा भाग आहे. ‘बेस्टसेलर इंडिया’ या नावाने हा ब्रॅण्डसमूह सध्या कार्यरत असून त्यांच्या अनेक लोकप्रिय ब्रॅण्ड्सपैकी वुमेन ट्रेण्डी फॅशनवेअर ब्रॅण्ड म्हणून ‘वेरो मोदा’ची ओळख आहे.

नावातली गंमत

‘वेरो मोदा’ हा इटालियन शब्द. इटालियन शब्दांचा उच्चार आपल्याला अनेकदा विचित्र वा गमतीचा वाटतो. ‘वेरो मोदा’ हे नावही त्याला अपवाद नाही. ‘बेस्टसेलर’ समूहाचे मूळ कर्तेधर्ते ट्रोएल हॉल्स पॉवेल्सन यांनीच या ब्रॅण्डला नाव दिले, मात्र त्यांना हे नाव कसं सुचलं याचीही गंमत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाच्या टी-शर्टवर त्यांनी ‘वेरो मोदा’ हा शब्द वाचला. आणि स्त्रियांसाठी आपण जो आधुनिक कपडय़ांचा ब्रॅण्ड सुरू करतो आहोत त्याला हे योग्य नाव आहे अशी त्यांची धारणा झाली. या इटालियन शब्दाचा अर्थही ‘ट्रु फॅशन’ असाच होतो आणि वास्तवातही ‘वेरो मोदा’ने जगभरात आपली ट्रेण्डी वुमेन फास्ट फॅशन ब्रॅण्ड म्हणून ओळख कायम केली.

मुळात बेस्टसेलर समूहाची सुरुवात एका खासगी वैयक्तिक कंपनीतून झाली होती. वैयक्तिक कंपनी ते समूह उद्योग हा पल्ला वेगात गाठणाऱ्या बेस्टसेलर कंपनीच्या पहिल्या काही ब्रॅण्डमध्ये ‘वेरो मोदा’चा समावेश होतो. १९८७ साली जन्माला आलेला हा ब्रॅण्ड गेली ३५ वर्ष जगभरातील फॅशनप्रेमी स्त्रियांच्या मनात घर करून आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने येणारे नवनवीन फॅशन कलेक्शन्स ठिकठिकाणी लवकरात लवकर आणि सहज उपलब्ध करून देण्याचा ब्रॅण्डचा फंडा यशस्वी ठरला. त्यामुळे हरएक ओकेजन्सनसाठी नवं काही धुंडाळणाऱ्या स्त्रियांना पार्टीवेअरपासून ते ऑफिस वेअपर्यंत वेगवेगळे ट्रेण्डी पर्याय या ब्रॅण्डकडे सहज उपलब्ध होऊ लागले. आपल्याकडेही भारतीय ड्रेसेसच्या पलीकडे जात पूर्णपणे पाश्चिमात्य वा अत्याधुनिक स्टाइलचे कपडे हवे असणाऱ्यांना ‘वेरो मोदा’ या ब्रॅण्डखाली अनेक ट्रेण्डी पर्याय उपलब्ध झाले. ऑफिसमध्ये जाणाऱ्या स्त्रियांसाठी टिपिकल कॉर्पोरेट ब्लेझर आणि सूट्स किंवा बाहेर फिरायला जाण्यासाठी डेनिम जीन्स याशिवाय निवडीला वाव नव्हता. आता ड्रेसेस, जॅकेट्स, ब्लेझर्सचे ट्रेण्डी अवतार, जम्पसूट्स, प्लेसूट्स असे अनेक फॅशनेबल ट्रेण्डी कलेक्शन सहज उपलब्ध होत आहेत. आणि या सगळय़ा प्रकारातील नवं काही ‘वेरो मोदा’कडे उपलब्ध आहे. ते ऑफलाईन स्टोअर्समध्येही उपलब्ध आहे. त्यांच्या स्वत:च्या साईट्सवरही उपलब्ध आहे आणि मिंत्रापासून अनेक ई – कॉमर्स प्लॅटफॉर्म्सलवरही ते सहजी उपलब्ध आहे. याशिवाय, या कपडय़ांवरच्या सवलती हे या ब्रॅण्डचं आणखी एक वैशिष्टय़. आंतरराष्ट्रीय फॅशन कलेक्शन हे थोडंसं खर्चिक प्रकरण.. त्यामुळे त्याची आवड असली तरी इतकं महागडं ब्रॅण्डेड घेण्यापेक्षा त्याची लोकल मार्केटमधील आवृत्ती बरी.. अशी सर्वसाधारण वृत्ती असते. मात्र फास्ट फॅशन बाजारपेठेत पाय रोवण्याच्या उद्देशाने उभ्या राहिलेल्या या ब्रॅण्डने तुलनेने कमी किमतीत ही कलेक्शन्स भारतातही उपलब्ध करून दिली. आज भारतात ‘वेरो मोदा’चे वैयक्तिक असे ६० च्या वर स्टोअर्स आहेत. तर दोनशेहून अधिक शॉप इन शॉप्समध्येही त्यांचे कलेक्शन्स उपलब्ध आहेत.

साईज ही कायमच ब्रॅण्डेड कपडे घेणाऱ्यांसाठी मोठी समस्या असते. त्यातून ब्रॅण्ड परदेशी असेल तर साईजचार्ट कुठल्या पद्धतीचा आहे हे पहिल्यांदा पहावं लागतं. हाही मुद्दा ब्रॅण्डने सोडवला असून एक्सएल साईजवरही त्यांनी काम केलं आहे. कोणत्याही साईजसाठी कम्फर्टेबल, व्हायब्रंट, स्टायलिश कपडय़ांचं कलेक्शन उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे ड्रेसेसमध्येही शिफ्ट ड्रेसेस, मिनी ड्रेसेस, मॅक्सी ड्रेस, फिट अ‍ॅण्ड फ्लेअर ड्रेस असे अनेक पर्याय त्यांच्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतात. जम्पसूट्सचेही अनेक फॅशनेबल डिझाइन्स, पॉवर ब्लेझर्स असे सध्या ट्रेण्डमध्ये असलेले कलेक्शन मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे ‘वेरो मोदा’ असा विश्वास त्यांनी आपल्या ग्राहकांच्या मनात निर्माण केला आहे. करोना काळातील बिघडलेल्या गणिताचा फटका इतर ब्रॅण्ड्सप्रमाणे याही ब्रॅण्डला बसला. त्यातून काही ठिकाणची स्टोअर्सही बंद करावी लागली होती. मात्र करोनापश्चात फॅशन व्यवसायाची गाडी रुळावर आली आणि ‘वेरो मोदा’ने पुन्हा नव्याने आपले स्टोअर्स सुरू केले. पूर्णत: पाश्चिमात्य आधुनिक फॅशनचा आग्रह धरणारा आणि इतकी वर्ष भारतीय फॅशन बाजारपेठेत आपली ओळख टिकवून ठेवणारा हा ब्रॅण्ड म्हणूनच गर्दीतही वेगळा ठरतो.