scorecardresearch

Premium

ऐकू आनंदे

कूकु एफएमवर प्रसारित होणाऱ्या ‘कातील अड्डा’ या पॉडकास्टमध्ये गुन्हेगारी विषयावर आधारित अनेक कथा सांगितल्या जातात.

Broadcast on Kuku FM Podcast the story
ऐकू आनंदे

शब्दांकन: श्रुती कदम

वर्दी वालों के जीवन का भी अजब फ़साना है,

patanjali ayurved marathi news, patanjali ayurved supreme court notice marathi news, baba ramdev supreme court notice marathi news
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पतंजली आयुर्वेदला नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण…
Manasamajhavan a disturbing novel by sangram gaikwad
अस्वस्थ करणारी कादंबरी
case registered against the staff and officials of vetik hospital for beating dog
ठाणे: श्वानाला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
sharad mohol murder case marathi news, sharad mohol murder news in marathi, sharad mohol latest news in marathi
सराईत गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणातील धक्कादायक माहिती : मोहोळवर गोळीबार करून पळून चाललेल्या आरोपींना ‘याने’ पुरवले सीमकार्ड अन् पैसे

तीर भी चलाना है और परिन्दे को भी बचाना है

कूकु एफएमवर प्रसारित होणाऱ्या ‘कातील अड्डा’ या पॉडकास्टमध्ये गुन्हेगारी विषयावर आधारित अनेक कथा सांगितल्या जातात. यामधील ‘पोलीस इन्स्पेक्टर’ या भागात रमेश पारिक नावाचा पोलीस अधिकारी बलात्कार आणि हत्येची केस कशा प्रकारे सोडवतो हे या पॉडकास्टमध्ये सांगण्यात आले आहे. मनोरुग्ण गुन्हेगार कशा प्रकारे गुन्हे करतात याचं वर्णन या पॉडकास्टमध्ये करण्यात आलं आहे. या पॉडकास्टमध्ये आर. जे. संयम शर्मा पोलीस कशा पद्धतीने विचार आणि नियोजन करून गुन्हेगारांना पकडतात हे समजावून सांगतो. या भागातील गुन्हेगार एक पोलीस अधिकारीच असून मनोरुग्ण असल्याचे या कथेच्या शेवटी समजते. या कथेला सुरुवात करताना आर. जे. संयम शर्माने ‘वर्दी वालों के जीवन का भी अजब फ़साना है, तीर भी चलाना है और परिन्दे को भी बचाना है’ हा शेर ऐकवला आहे. याचा अर्थ मात्र त्याने कथेच्या शेवटी उलगडून सांगितला आहे. 

चित्रपट, वेब मालिकांमध्ये नेहमी गुन्हेगार गुन्हा कसा करतात हे दाखवले जाते, पण त्या गुन्हेगारांना पोलीस कशा प्रकारे पकडतात त्यासाठी काय मेहनत घेतात? कोणत्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो हे ठळकपणे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात नाही. या पॉडकास्टमधून या गोष्टी सविस्तर उलगडून सांगितल्या आहेत. मला गुन्हेगारी विश्वाबद्दल आणि पोलिसांच्या शोधकार्याबद्दल माहिती जमा करायला नेहमी आवडते. त्यामुळे  गुन्हेगारी विषयावर आधारित चित्रपट, वेब मालिका, लेख आणि ‘कातिल अड्डा’सारखे पॉडकास्ट आवर्जून ऐकत असतो. या भागात एक पोलीस अधिकारी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कसा पकडतो हे उत्तम प्रकारे मांडलं आहे. मला एकंदरीतच हा पॉडकास्ट आणि त्यातील ‘पोलीस इन्स्पेक्टर’ हा भाग अधिक आवडतो.

– अजिंक्य शिगवण, विद्यार्थी

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Broadcast on kuku fm podcast the story amy

First published on: 08-12-2023 at 01:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×