वेदवती चिपळूणकर
‘कॉफी आणि बरंच काही’ मधल्या चॉकलेट हिरोपासून ते ‘पॉण्डिचेरी’मधल्या मिस्टेरियस मॅनपर्यंतच्या त्याच्या सर्व भूमिका मराठी प्रेक्षकांनी आवडीने पाहिल्या आहेत. ‘बाजीराव मस्तानी’मधून चिमाजी आप्पांच्या भूमिकेतही तो सर्वाना भावलेला आहे. शाळेत असतानाच ज्याने आपल्या करिअरची ही वाट निवडली आणि त्यासाठी संपूर्ण शक्तिनिशी प्रयत्न केले असा अभिनेता म्हणजे वैभव तत्त्ववादी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैभव शाळेत असताना स्पोर्ट्स आणि नाटक दोन्हीमध्ये अत्यंत आवडीने सहभागी व्हायचा. तो म्हणतो, ‘मी बॅडिमटन खेळायचो. स्टेट-लेव्हलला खेळायचो. मला त्यात करिअर करायचं होतं, पण मला त्यात कधी हरलेलं आवडायचं नाही. जेव्हा मी मॅच हरायला लागलो तेव्हा मला हे कळलं की मी जिंकत होतो तोपर्यंतच मला बॅडिमटन आवडत होतं. पण नाटकाच्या बाबतीत तसं नव्हतं. संपूर्ण थिएटरमध्ये कोणीही नसलं तरी मला कधीच काही वाटलं नाही, मी माझं काम तितक्याच इंटरेस्टने करतो. मी कायम आवडीने थिएटरमध्ये स्टेजवर असतो हे मला लक्षात आलं,’ आपला कल कुठे आहे हे लक्षात आल्यानंतर वैभवने करिअरचं क्षेत्र निश्चित केलं खरं.. पण तेव्हा त्याचं वय काय होतं हे कळल्यावर नवल वाटल्याशिवाय राहत नाही. ‘साधारण इयत्ता आठवीत असताना माझं हे ठरलं होतं की मला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे,’ असं वैभवने सांगितलं. लहान वयात स्पोर्ट्स आणि अभिनय दोन्ही आवडत असताना वैभवने अभिनयाची निवड करिअर म्हणून केली होती. ‘आपण एखाद्या रस्त्यावर चालतोय आणि मध्येच धडपडलो किंवा खाली पडलो. तर आपण उठून पुन्हा चालायला लागतो. मग असाच रस्ता निवडावा ज्यावर पडल्यावर रस्ता बदलण्याची इच्छा होणार नाही, तर त्याच रस्त्यावर कितीही वेळा पडलं तरी चालत राहायची तयारी आणि जिद्द कायम असेल,’ अशा शब्दांत त्याच्या निर्णयामागचा विचार वैभव उलगडून सांगतो.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Click point bhumika marathi audience pondicherry actor amy
First published on: 15-07-2022 at 00:04 IST