हाय,
vv17मी २५ वर्षांची असून माझी उंची ५ फूट २ इंच आहे व वजन ४६ किलो आहे. माझे केस सिल्की आहेत. केसांची लांबी कमी न करता माझ्या लुकला कोणती हेअर आणि ड्रेसिंग स्टाइल योग्य दिसेल, याबद्दल काही टिप्स मिळतील का?
रुंजी
हॅलो रुंजी,
तू म्हणतेस तुझे केस सिल्की आहेत. वॉव, ही तुला मिळालेली दैवी देणगीच म्हणायला हवी. थोडक्यात, तू बिनधास्तपणे वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स करू शकतेस. जर तुझ्या केसांची लांबी मध्यम असेल तर तू ‘फिशटेल ब्रिड’ (केसांची छोटी वेणी, जिच्या शेवटी उरणारा केसांचा गोंडा, माशाच्या शेपटीसारखा दिसतो.) ही हेअरस्टाइल करू शकतेस. दिवसभराच्या धावपळीनंतर जेव्हा रात्री एखाद्या पार्टी किंवा समारंभाला जायचे असेल तेव्हा ही केशरचना फारच फनी आणि स्टायलिश लुक देऊन जाते. खरं तर सिल्की केस नेहमी बांधायची गरज नाही, ते मोकळे सोडूनही छान दिसतील. सरळ केसांना ‘लाँग लेअर्स’ हा हेअरकट उत्तम, कारण या प्रकारात केस फारसे कमी होत नसल्याने केसांचा दाटपणा (व्हॉल्यूम) कायम राहतो. त्याचप्रमाणे ‘स्क्वेअर लेअर विथ फ्रीन्जेस’ हा हेअरकटही चालू शकेल. ‘स्क्वेअर लेअर’ ही तांत्रिक संज्ञा आहे. या केशरचनेत पुढपासून मागपर्यंतचे सर्व केस सारख्याच लांबीत कापले जातात. तर ‘फ्रीन्जेस’ मध्ये काही केस चेहऱ्यावर घेऊन कपाळावर एकसमान रेषेत कापले जातात. सामान्यत ‘फ्रीन्जेस’ सरळ (स्ट्रेट) असतात. या हेअरकटच्या एकत्रित परिणामाने चेहऱ्याला एक प्रकारची चौकट प्राप्त होते. सिल्की आणि सरळ केसांचा एक फायदा म्हणजे त्यांची निगा, देखभाल करणे सोपे असते, तेव्हा निसर्गतच तुला मिळालेल्या सिल्की केसांचा तू स्टायिलगसाठी नक्की उपयोग कर.
vn11
आता आपण ड्रेसिंगचा विचार करू, स्मार्ट लुकिंग टॉप/ ब्लाउज आणि हायवेस्टेड ट्राउझर हे आउटफिट तुला शोभून दिसेल. असे कपडे तू तुझ्या ऑफिसमध्ये किंवा मीटिंग्जसाठी वापरू शकतेस. तू ‘स्केटर ड्रेसेस’ही वापरून पाहा. ‘स्केटर ड्रेसेस’ कमरेला घट्ट आणि खाली घेरदार असतात. या पेहेरावावर हिवाळ्यासाठी ‘बूट’ वापरणं उत्तम. अन्यवेळी ‘वेजेस’ वापरून बघ. वेजेलनं लुक आणखी स्टायलिश करता येतो. या ड्रेसिंगमध्ये कमरेचा शेप उठून दिसतो. कमरेखालील भागांवर असलेली अतिरिक्त चरबी मात्र घेरदार आकारामुळे झाकली जाते. शिवाय तुला ‘बॉडी कॉन’ (अंगासरशी बसणारे, बॉडीहिगग) ड्रेस प्रकाराचाही विचार करता येईल, हा प्रकार पार्टीजसाठी उत्तम. या घट्ट कपडय़ांत  शरीराचा बांधेसूदपणा दिसून येतो. अशा कपडय़ांवर उंच टाचांची पादत्राणे (हाय हिल्स) घातली की कम्प्लिट पार्टी लुक आलाच म्हणून समज. वरून थंडीसाठी एखादं छानसं लेदर जॅकेट किंवा चमकदार कार्डिगन (कपडय़ावरून घालायचे पातळ जाकीट) तुमच्या स्मार्ट लुकला वेगळीच रंगत देईल. योग्य वेळी योग्य अ‍ॅक्सेसरीजचा वापर करून स्टायिलगमध्ये चांगला बदल दिसू शकतो.           
सोन्याचे किंवा सोनेरी, छोटेसे कानालगत लोंबते इअरिंग्स (हूप्स) आणि  चमकदार रंगातील खडे, धातू यांपासून बनलेली अंगठी (कॉकटेल िरग्ज) गुड फॉर पार्टी लुक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण केलेली स्टाइल आपल्याला सुसह्य़ वाटली पाहिजे. थोडक्यात ड्रेस कम्फर्टेबली स्टिल स्टायलिशली.
मलाइका अरोरा खान
अनुवाद : गीता सोनी   
(सौजन्य : द लेबल कॉर्प)
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com

प्रश्न पाठवा..
आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.