scorecardresearch

Premium

डिजिटल स्वातंत्र्य दिन!

गेले काही दिवस म्हटलं तर सगळीच समाजमाध्यमं तिरंगा आणि त्याविषयीच्या गप्पांनी भारावलेली नि भरलेली दिसतात.

indian-flag
( संग्रहित छायचित्र )

राधिका कुंटे
गेले काही दिवस म्हटलं तर सगळीच समाजमाध्यमं तिरंगा आणि त्याविषयीच्या गप्पांनी भारावलेली नि भरलेली दिसतात. त्यात कोणत्याच वयोगटातील व्यक्ती मागं नाही. अगदी स्वत:चा डीपी बदलल्यावर दुसऱ्यांनीही तसं करण्याचा विनंतीवजा आग्रह केला जातो आहे. त्यामुळे व्हॉटस्ॲप फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, स्नॅपचॅट आदी समाजमाध्यमांवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (७५ र्वष) हा ट्रेण्ड झाला आहे.
‘अरे त्या अमुकला सर्टिफिकेट मिळालं, for successfully pinning a flag ‘काय सांगतोस?’
‘हो.’
‘अरे यार, मलाही पाठव ना ती लिंक.’
‘htpps:// harghartiranga. com’
‘थँक्यू.’
गेले काही दिवस अशा धर्तीचे संवाद होत आहेत किंवा व्हॉटस्ॲप मेसेजेस सर्रास केले जात आहेत. अनेकांच्या डीपीवर तिरंगा विराजमान झालेला आहे. कुठे फक्त तिरंगा आहे. कुठे आकाशात लहरणारा स्तंभासह ध्वज दिसतो आहे. कुठे झेंडा हातात घेतलेली स्वत:ची छबी डीपी म्हणून ठेवलेली दिसते आहे. तर कुठे डीपीवरचा तिरंगा प्रतीकात्मक आहे. तर काहींच्या डीपी आणि कव्हर फोटोवर तिरंगा पुरा छा गया हैं.
काहींनी तो पोस्टातून मागवला तर चक्क त्याची डिलिव्हरी घेतानाचा फोटो आवर्जून टाकला आहे आणि पोस्ट, पोस्टमनसह तिरंग्याविषयीचा अभिमान व्यक्त करणारी पोस्टही लिहिली आहे..

गेले काही दिवस म्हटलं तर सगळीच समाजमाध्यमं तिरंगा आणि त्याविषयीच्या गप्पांनी भारावलेली नि भरलेली दिसतात. त्यात कोणत्याच वयोगटातली व्यक्ती मागे नाही. अगदी स्वत:चा डीपी बदलल्यावर दुसऱ्यांनीही तसं करण्याचा विनंतीवजा आग्रह केला जातो आहे. त्यामुळे व्हॉटस्ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, स्नॅपचॅट आदी समाजमाध्यमांवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (७५ वर्ष) हा ट्रेण्ड झाला आहे.

vinoba bhave
गांधीजींच्या सहवासाचा अनुभव
actor r madhavan takes charge ftii president
पुणे: एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आर. माधवन यांनी स्वीकारली
Gulabrao Patil on Sanjay Raut Khalistan issue
VIDEO: संजय राऊतांनी खलिस्तान आणि पुलवामाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले…

आजच्या डिजिटल युगात आपल्या जवळपास सगळय़ा ॲक्टिव्हिटीजचे अपडेट समाजमाध्यमांवर टाकणारी तरुणाई या इतक्या मोठय़ा ॲक्टिव्हिटीमध्ये मागे कशी राहील? मुळात आजकाल अनेकदा अनेकांचं कोणतेही सणवार असोत किंवा रोजचं जगणं असो, ते डिजिटल ठशांशिवाय पुढे सरकत नाही. त्यामुळे जरा विचार केला तर तरुणाईचा डिजिटल माध्यमाकडे असणारा कल लक्षात घेऊनच स्वातंत्र्य दिनासाठी ही डिजिटल आखणी केली गेली आणि तिला भरभरून प्रतिसादही मिळतो आहे.

या डिजिटल सेलिब्रेशनची माहिती जाहीर झाल्यानंतर सध्याच्या शास्त्राप्रमाणे रीतसर डिजिटल चर्चा नि वाद घडलेच. भारतीय ध्वजाच्या पार इतिहास, भूगोलासह थेट वर्तमानापर्यंत अनेक मुद्दय़ांची सविस्तर चर्चा, छायाचित्रांसह करण्यात आली. त्यानंतर काहींनी आपापली मतं प्रतिबिंबित व्हावी, अशी छायाचित्रं डीपी म्हणून किंवा कव्हर फोटो म्हणून ठेवली. हरतऱ्हेच्या शैलीत आणि ढंगात तिरंगा प्रत्येकाच्या डिजिटल खिडकीत डौलात झळकताना दिसतो आहे. अर्थात, काहींनी अजूनही आपले डीपी किंवा कव्हर फोटो बदललेले नाहीत. म्हणजे ते काही देशप्रेमी नाहीत असं नाही, पण त्यांना कदाचित डीपी म्हणून तिरंगा ठेवण्याची कल्पना पटली नसावी. त्यांचा अन्य काहीएक विचार असावा किंवा डिजिटल ॲक्टिव्हिटीपेक्षा त्यांचा प्रत्यक्ष कृती करण्यावर अधिक विश्वास असावा. अजूनही अनेक युवा असे आहेत जे थेट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांत हिरिरीने सहभाग घेतात. अनेक जण असेही आहेत जे समाजमाध्यमांवर डीपी वा इन्स्टा फोटोच्या माध्यमातून आपण जे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उपक्रम करतो त्याची वाच्यता करत नाहीत. पण ते आपल्या पद्धतीने प्रत्यक्ष कार्यातून आपली देशप्रेमाची भावना जपताना दिसतात.

खरंतर दरवर्षी प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्य दिन, मनापासून ध्वजवंदनात सहभागी होणारी किंवा स्वतंत्र काही उपक्रम राबवणारी अशी मंडळी काहीशेच्याच घरात मोडतील. या मोजक्यांतील क्वचित काही जण आपले फोटो पोस्ट करतात. पण उरलेल्यांपैकी बहुतांशी जणांचा स्वातंत्र्य दिन किंवा देश, देशप्रेम या मूळ विषयांपेक्षा सुट्टी मोड ऑन असतो. सुट्टी म्हटली की सेलिब्रेशन, मज्जा-मस्ती तो होनी चाहिए, हा विचारही पाठोपाठ आलाच. आताही जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे फिरस्तीची ठिकाणं हाऊसफुल्ल झालेली आहेत. अशा माहौलमध्ये स्वातंत्र्य, इतिहास, लढा, देशप्रेम आदी मुद्दय़ांचा विचार किंवा त्याविषयीची माहिती अनेकदा अनेकांच्या विशेषत: तरुणाईच्या खिजगणतीत नसते. कदाचित हेच जाणवल्याने काही जण त्या दृष्टीने काहीएक प्रयत्न करत असावेत. उदाहरणार्थ- भाडिपा storis of india या शीर्षकांतर्गत काही गोष्टी सादर करणार आहे.

पहिली गोष्ट आहे – स्वातंत्र्याचे साक्षीदार. पण असे तरुणाईच्या माहितीच्या खजिन्यात खऱ्या अर्थाने भर घालणारे डिजिटल क्षण आणि त्यांचं डॉक्युमेंटेशन तुलनेनं कमीच येतं वाटय़ाला..खरंतर समाजमाध्यमांवरून केला जाणारा दिखाऊपणाचा सोस वा आकर्षणाचा टक्का आत्ताच्या काळात अंमळ अधिक आहे आणि तरुणाईवर त्याचा प्रभाव अधिक दिसून येतो. त्यामुळे एखादी गोष्ट आकर्षक वाटली म्हणून मागचा पुढचा विचार न करता ती पुढे ढकलली जाते – अग्रेषित अर्थात फॉरवर्ड केला जातो तो भपका किंवा दिखाऊपणा. उदाहरणार्थ ‘अमुक अमुक इमारती किंवा तमुक ठिकाणी केलेल्या तिरंगी सजावटीचा फोटो वा व्हिडीओ किंवा मग त्या पार्श्वभूमीवर काढलेली सेल्फी’ खुद्द स्वातंत्र्य दिनाच्या दिवसापर्यंत अशा धर्तीच्या पोस्टचा महापूर लोटेल असा जाणकारांचा अंदाज आहे. तसं झालं तर चटदिशी म्हटलं जाईल की, शास्त्र असतं ते. हेही खरं असलं तरी देशप्रेम केवळ एका दिवसापुरतंच नसावं. ते कायम मनात असावं. त्यामुळे तिरंग्याच्या रंगप्रतीकांचा यथार्थ समजून घेतला तर खूपच फरक पडेल आपल्या रोजच्या आयुष्यात, वर्तमानात आणि भविष्यातदेखील.. कारण झेंडा उंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंदू.
viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Digital freedom day whatsapp facebook instagram amrit mahotsav of freedom the trend amy

First published on: 12-08-2022 at 00:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×