शब्दांकन: श्रुती कदम
इक रात वो गया था जहाँ बात रोक के




अब तक रुका हुआ हूँ वहीं रात रोक के
– फ़रहत एहसास
रेड एफएमवर प्रसारित होणार ‘दिल अभी भरा नही’ या पॉडकास्टमध्ये आर. जे. लक्ष दत्ता स्वयंलिखित प्रेम आणि जीवनावरील कथा त्याच्या श्रोत्यांना सांगतो. या पॉडकास्टमध्ये आर. जे. लक्ष दत्ता आपल्या जीवनात घडणाऱ्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी आपल्यासाठी किती महत्त्वाच्या असतात हे या पॉडकास्टमधून सांगण्याचा प्रयत्न करतो. ‘दिल अभी भरा नही’ या पॉडकास्टमधील ‘तुम्हे जो मैने देखा’ या भागात सनी या मुलाची गोष्ट आर. जे. लक्ष सांगतो. शाळेच्या रियुनियनमध्ये उभा राहून तो त्याच्या शाळेचा शेवटचा दिवस आठवत असतो. शाळेच्या शेवटच्या दिवशी सनीला त्याची खास मैत्रीण टीनाची आठवण होते. सनीला लहानपणापासूनच टीना आवडत असते. पण तो कधी तिच्याशी बोलायची हिंमत करत नाही. अगदी शेवटच्या दिवशी तो तिला सांगण्यासाठी जातो तेव्हा टीना घाईत मी आलेच बोलून म्हणत निघून जाते. त्यानंतर त्या दिवसापासून आता शाळेच्या रियुनियनपर्यंत तो तिची वाट बघत राहतो. सनीच्या या परिस्थितीवर आर. जे. लक्षने ‘इक रात वो गया था जहाँ बात रोक के, अब तक रुका हुआ हूँ वहीं रात रोक के’ ही फ़रहत एहसास यांची शायरी सादर करून त्याची भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेकदा शाळेतच आपल्याला आपलं पहिलं प्रेम भेटतं, जाणवतं. पण अनेकदा त्यावेळी आपण प्रेम व्यक्त करण्याची हिंमत नाही करू शकत. मला ‘दिल अभी भरा नही’ या पॉडकास्टमधील सगळेच पॉडकास्ट खूप आवडले. खूप छान सादरीकरण आणि लिखाण आहे. तसेच आर. जे. लक्षचा आवाज हा पॉडकास्ट ऐकणाऱ्याला रमवून ठेवायचं काम करतो. आज-काल प्रेमाची परिभाषा बदलली आहे. पूर्वीसारखा नात्यातला गोडवा राहिला नाही. म्हणून मला या पॉडकास्टमधला ‘तुम्हे जो मैने देखा’ हा भाग आवडला, कारण शेवटी ती त्याच्यासोबत जेव्हा स्वत:हून बोलायला येते तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुंदर वळण येऊ शकतं याची जाणीव होते. – अविरा तांबे (गृहिणी )