पहाटे पहाटे हवेत जाणवू लागलेला गारवा, मार्केटमधली पणत्या-आकाशकंदिलांची हजेरी नि फराळासाठी देऊ घातलेली वाणसामानाची यादी.. अशा अनेक गोष्टींतून दिवाळीची वर्दी कधीच मिळालीय. कुणाच्या परीक्षा संपल्यात तर कुणाच्या संपत आल्यात. काहींची बारावी तर कुणाच्या इतर कसल्या ना कसल्या परीक्षा. अभ्यास नि परीक्षा सांभाळून कॉलेजगोअर्सचं दिवाळीच्या सुट्टीतलं प्लॅिनग आहे तरी काय, ते जाणून घेऊ या, प्रातिनिधिक कॉलेजगोअर्सच्या माध्यमातून !
हा छंद जिवाला..
दोस्तहो, दिवाळीची सुट्टी सुरू होतेय. या लाडक्या सणासाठी ढेरसारी शॉिपगची तयारी तुम्ही करतच असाल. स्मार्टफोनसाठी लाडीगोडीची डिमांड, ड्रेसेस व्हरायटी, मेवा-मिठाई नि फराळाची चव वगरे वगरे. यातला मेन प्लस पॉइंट म्हणजे कॉलेजला असणारी दिवाळीची सुट्टी ! या सुटीत मनसोक्त झोप, निरुद्देश भटकंती, पार्कातल्या कट्ट्यावरच्या गप्पा आणि खादाडी हे सगळं आपण करतोच. पण तेच तेच करायचा कंटाळा येणारच. वेगळेपणा नसेल तर ती सुट्टी कसली ?
सुट्टीच्या प्लॅिनग्जमध्ये मूव्हीज किंवा नाटक बघणं, चौपाटीवर भटकणं, कुटुंबासोबत बाहेरगावी फिरायला जाणं या झाल्या कॉमन गोष्टी ! प्रत्येकाची आवड आणि सवड वेगळी असते. त्यानुसार काहीजण ट्रेकिंग, रॅपिलग, रात्री आकाशदर्शन, कॅम्प्सना जाणं असे बेत आखतात. कुणी एक अनुभव म्हणून व्हेकेशन जॉब करतात. काहींना मात्र सुट्टीत आपले छंद जोपासायचे असतात. मग कुणी अनिमेशन-व्हिडीयो गेम्स डिझाइिनग, वेब डिझाइिनगसारखे कोस्रेस करतात. कुणी आपापल्या आवडीच्या वाचन प्रकारांचा आणि दिवाळी अंकांचा आनंद घेतात. कुणी अक्षराला वळणदार करण्यासाठी कॅलिग्राफी शिकतात.
‘क्रिएटिव्हिटी’ ही गोष्ट अशी आहे, की जी थोडीशी शोधा, ती सापडतेच. कल्पना भरारी मारते पुढय़ात येतेच. मग कुणाला ती पॉटरी मेकिंग, ग्लास पेंटिंग, वारली आर्ट, ड्रॉइंग, पेंटिंग, आर्ट अँण्ड क्राफ्ट, वॉलपीस मेकिंग, कॅन्हास पेंटिंग, फ्लॉव्हर मेकिंग, टाइल्स डिझाईिनग, रांगोली मेकिंग, हँण्डमेड ज्वेलरी, फोटोग्राफी अशा कलेत गवसेल. तर कुणाला चक्क डान्सच्या वर्कशॉप्समध्ये गवसेल. वेस्टर्न, बॉलीवूड, अमेरिकन, लॅटिन, हिपहॉप अशा फॉर्ममधला तुमचा आवडता डान्स शिकता येईल. म्युझिक हा तरुणाईचा वीक पॉइंट. तेच शिकून घेतलं तर ? येस्स ! गिटार, कॅसिओ, किबोर्ड, पियानो, व्हायोलिन, अक्टोपॅड, ड्म्र्स, तबला अशी इन्स्ट्रमेंण्टस शिकता येतील. इतरांच्या अभिनयाला आपण नेहमीच दाद देतो. आपल्यालाही अशी दाद हवी असेल तर अँिक्टग वर्कशॉप्स अटेंड करता येईल. सॉफ्ट टॉइज विकत घेण्यापेक्षा ती कशी करायची ते शिकून घेऊन सगळ्यांना छान गिफ्ट देता येईल. कुकिंग, चॉकलेट मेकिंग, केक मेकिंगमध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांसाठी खूप क्सासेस आहेत. स्पोट्रस फॅन्ससाठी स्वििमग, बॅडिमटन, टेबल टेनिस, चेस, बास्केटबॉल आदी खेळांचे कॅम्प्स आयोजित केले जातात. या सगळ्या क्लासेस आणि वर्कशॉप्सची माहिती इंटरनेट आणि पेपर्समधून मिळते, फक्त त्याकडं लक्ष द्यायला हवं. कारण हे छंद आपण आपल्या आवडीप्रमाणं जोपासणार असतो. ती आपली निवड असल्यानं त्यात अडकण्याची भावना नसते. सो, दिवाळीचा सण, त्यानिमित्तानं केलेलं शॉिपग आणि सुट्टीतल्या फेव्हरेट हॉबीज हे भारी कॉम्बिनेशन मनसोक्त एन्जॉय करा. जस्ट एन्जॉय !

सई पटवर्धन
एस. वाय. जे. सी. आर्टस्,
एस. आय. ई. एस. कॉलेज
बारावीत असले तरी त्याचं प्रेशर नाहीये. अभ्यास सांभाळून मी बरंच काही करायचं ठरवलंय.. रोज योगाची प्रॅक्टिस. जपानी भाषेच्या क्लासला जाणं. ट्रेकिंगला जाणं. सोशल कॉन्टॅक्टस् आणि नेटवìकग वाढवण्यासाठी ओपन फेस्टिव्हल्सला जाणं. काही कॉलेजेसमध्ये असणाऱ्या हॉलोविन पार्टीजना आणि वॉटर पार्कला मत्रिणींसोबत जाणं. एकमेकींकडं राहायला जाऊ तेव्हा अभ्यास करायचाय नि १५-२० मूव्हीजची लिस्ट काढून ठेवल्येय, त्या डिव्हिडीजवर पाहायच्या आहेत. मनाशी ठरवल्याप्रमाणं काही पुस्तकंही वाचायचीत.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

वीणा देसाई
एस. वाय. बीएस्सी,
डी. जी. रुपारेल कॉलेज
कॉलेजच्या एनएसएस युनिटच्या मीटिंग्ज आणि इव्हेंटस् आहेत, त्या अटेंड करणारेय. आमचा कॅम्पही होणार होता, पण तो पुढे ढकलला गेलाय. पण इतर बेत आहेतच. कॉलेजच्या ‘विहंग फेस्टिव्हल‘मध्ये क्रिएटिव्ह आयडियाजमध्ये भाग घेणारेय. कॉलेजमधल्या मत्रिणी एकमेकींकडं जाऊन गप्पाटप्पा मारणार आहोत. एसआरकेचा ‘जब तक हैं जान’ पाहायचाय.

निनाद भागवत
एस. वाय. बी. ए., जोशी-बेडेकर कॉलेज
सध्या मी व्हिडीओ गेम डिझािनग शिकतोय. ड्रॉइंग काढायची आवड असल्यानं तीही रेखाटतोय. साफसफाई करणं, वाणसामान आणून देणं अशा कामांत आईला मदत करतोय.

दीपश्री वैद्य,
एस.वाय.जे.सी. कॉमर्स, मॉडेल कॉलेज
बारावीचं वर्ष असल्यानं सध्या कॉलेज-क्लास-अभ्यास-परीक्षा यावर लक्ष केंद्रित केलंय. अभ्यास करायचा असला तरीही दरवर्षीप्रमाणं सगळ्यांना द्यायला छानशी ग्रिटिंग्ज तयार करणारेय. आईला फराळ तयार करायला मदत करणारेय. दिवाळी पहाटेला फडके रोडवर जमून धमाल करायचा आम्हा मत्रिणींचा बेत कधीच पक्का झालाय.

स्वाती वास्ते
एस. वाय. बीकॉम,
किर्ती कॉलेज
सध्या कुकिंग करायला शिकत्येय. दिवाळीसाठी काय काय शॉिपग करायचं याचं प्लॅिनग चालू आहे. या सुट्टीत शाळेतले मित्र-मत्रिणी एकत्र भेटण्याचा बेत ठरतोय. आवडत्या स्टारकास्टच्या मूव्हीज बघणं चालू आहे.

शाल्मली डांगे
एस. वाय. बीकॉम, पोदार कॉलेज
सध्या आर्टकिलशिप करत्येय. आर्टकिलशिप करून मिळणाऱ्या वेळात पुस्तक वाचनाची आवड जोपासत्येय. नॉव्हेल्स, फिक्शन आणि नॉनफिक्शन पुस्तकं नेटवरून डाऊनलोड करून, मत्रिणींशी देवघेव करून वाचत्येय. दरवर्षी फराळ करायला मदत करतेच, आता कुकिंग करायलाही शिकायचंय. सोसायटीतल्या मत्रिणी मिळून वन डे आऊटिंगला जायचा प्लॅन आखतोय.

संस्कृती सुर्वे
एफ. वाय. जे. सी. आर्टस्,
डी. जी. रुपारेल कॉलेज
परीक्षा संपल्यावर थोडी रिलॅक्स होणारेय. कॉलेजमधल्या मत्रिणींसोबत एस्सेल वर्ल्डला फिरायला जाणारेय. मॉलमध्ये जाऊन ढेरसारी शॉिपग करणारेय. शिवाय टीव्हीवर आवडत्या मालिका बघणार. कॉप्युटर गेम्स खेळायचेत. आईनं केलेल्या चविष्ट रेसिपीजचा मनसोक्त आस्वाद घ्यायचाय.

तुषार आंबेरकर
एस. वाय. बीकॉम,
डी. जी. रुपारेल कॉलेज
डिसेंबरमध्ये सीएसची परीक्षा असल्यानं सध्या सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलंय. क्लासेसही सुरू आहेत. पण दिवाळीच्या दिवसांत मात्र अभ्यास थोडासा बाजूला ठेवून दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करणारेय. दिवाळीत आमच्याकडं पाहुणे-नातलग येतात. आम्ही फॅमिली फ्रेण्डसकडं जातो. दिवाळीच्या निमित्तानं सगळ्यांच्या भेटीगाठी नि फर्मास फराळाच्या देवघेवीची मजा काही औरच असते.

निशांत पाटील
एस.वाय.जे.सी. सायन्स, गुरुनानक खालसा कॉलेज
अभ्यास एके अभ्यास नि अभ्यास दुणे अभ्यास.. बस्स, सध्या हे नि एवढंच प्लॅिनग आहे. कारण मी बारावीत आहे. क्लासला मोजून दिवाळीचे चार दिवसच सुट्टी आहे. त्यामुळं अभ्यास सांभाळून घरातली साफसफाई, फराळ तयार करणं आणि दिवाळीत रांगोळी काढणं अशा कामांत आईला जमेल तेवढी मदत करणारेय.