गायत्री हसबनीस
संवादात आपली अशी एक गंमत असते. सध्या मुलामुलींच्या हातातला ताईत बनलेल्या मोबाइलमधील चॅटिंगमध्येही दिवसेंदिवस निराळी गंमत अनुभवायला मिळते आहे.? फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम व इन्स्टाग्रामसारख्या मोठय़ा तसेच उपयुक्त मानल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर तासन्तास विरंगुळा म्हणून वावरणाऱ्या तरुण पिढीचे बदलत चाललेले ‘टेक्स्टिंग’ फंडे अधिकाधिक इमोटिक होऊ लागले आहेत.

आजच्या मित्रमैत्रिणींच्या चॅटिंग वॉलवरील संभाषण हे ‘कॅज्युअल’ असते, याची एक नाही असंख्य उदाहरणे आहेत. ही उदाहरणे विशेष नाहीत. बारा-तेरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि आता सर्वदूर हातपाय पसरलेल्या सोशल मीडिया कल्चरने ‘टाइपिंग’, ‘टेक्स्टिंग’, ‘चॅटिंग’, ‘ऑनलाइन’ यांसारखे अनेक शब्द फार कमी कालावधीत रूढ के ले. मनातले विचार अक्षरक्ष: काही संकेदांत इतरांपर्यंत पोहोचवण्याचे कसब या माध्यमाने साध्य केले. त्याबरोबर आलेल्या ‘इमोजीं’नी तर मनाचा ठाव घेतला. समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी इमोजींचा वापर करून आपण सगळ्यांची मनं जिंकू लागलो.

आता इमोजी आपल्या सर्वाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले आहेत.? हे क्यूट इमोजी शेअर करताना नवनवे इमोजी अजून येत राहतात आणि अनेक पर्याय उपलब्ध होत राहतात. त्यामुळे इमोजींची जागा कोणी घेऊ शकणार नाही असंच आत्तापर्यंत वाटत होतं. मात्र त्यातही बदल होऊ लागले आहेत. इमोजीमध्ये नानाविध प्रकारचे हावभाव तर आहेतच, पण त्याचबरोबर नातीगोती, प्राणी, निसर्ग, चिन्हं, वस्तू, खाद्यपदार्थ, प्रवास ठिकाणं, वेळ अशा असंख्य गोष्टी चित्ररूपाने यात समाविष्ट आहेत. त्यामुळे चॅटिंग करताना फक्त स्मायलीचा इमोजी टाकू न समोरच्याला इम्प्रेस करण्यापेक्षा आपल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी इतर इमोजींचा म्हणजेच पानं, फुलं, फळं यांचा सध्या सर्रास वापर के ला जाऊ लागला आहे. आता कोणी आपला सुंदर फोटो सोशल मीडियावर स्टोरी म्हणून टाकला तर त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देण्यासाठी स्मायलीचा नाही तर फुलांच्या इमोजी शेअर केल्या जातात. खासकरून मैत्रिणींमध्ये हे शेअरिंग के लं जातं. तर मित्रांकडून मात्र मैत्रिणीच्या सुंदर फोटोवर रिअ‍ॅक्ट होताना अजूनही स्मायलीचाच इमोजी पोस्ट होताना दिसतो आहे. फोटोच नाही तर कुणी वपुंचं सुंदर वाक्य जर स्टोरी म्हणून ठेवलं तर त्यालाही प्रतिसाद म्हणून फुलं नाही तर ते वाचून त्या क्षणी काय वाटलं हे स्मायली सोडून इतर इमोजींमधून व्यक्त केलं जातं. फु लांच्या इमोजींमधून मिळणारी प्रतिक्रिया खूप जवळची वाटते, असंही ही तरुण मित्रमंडळी म्हणू लागली आहेत. एकीकडे इमोजींचा जसा ट्रेण्ड आहे, तसाच प्रतिक्रियेदाखल नवनवे स्टिकर्स किं वा जीआयएफ शोधून पाठवण्याचा ट्रेण्डही वाढला आहे. शुभेच्छा देताना आपण पुष्पगुच्छांच्या इमोजीचा वापर अनेकदा करतो, सणासुदीच्या दिवसांतही शुभेच्छा देताना पुष्पगुच्छ पाठवतो, पण इथे चॅटिंगमध्येही या इमोजीचा शिरकाव झाला आहे. सध्या फु लं आणि स्मायली दोन्हींचा समावेश असलेले इमोजी स्टिकर्सही उपलब्ध झाले आहेत.

वन टू वन चॅट असो वा मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधला संवाद असो, तो संवाद कितीही अल्प किंवा दीर्घकाळ चालणारा असला तरी सर्वाना स्टिकर आणि जीआयएफ पाठवायला खूप आवडतात. एका मित्राने सांगितले की, सतत टेक्स्ट करून आपली इन्स्टन्ट प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाही. चॅट करताना त्या फ्लोमध्ये पटकन कुठला विनोद झाला तर त्यावर पुन्हा आपली विनोदी प्रतिक्रिया म्हणून टेक्स्टमध्ये अडकण्यापेक्षा समोरच्याला गंमत वाटेल असा जीआयएफ किं वा स्टिकर पाठवणं सोपं वाटतं. त्यातून हसण्या-हसवण्यातली गंमत सहज अनुभवता येते. कोणी ग्रुपवर मीम फॉरवर्ड केले तर त्यालाही जीआयएफ वा स्टिकरच्या माध्यमातूनच प्रतिक्रिया दिली जाते, असं त्याने सांगितलं. इमोजी, स्टिकर, जीआयएफमधील विनोदी चित्रं आपल्याला हसायला भाग पाडतात हे स्पष्ट झालं असलं तरी असेही अनेक जण आहेत ज्यांना शब्दांतून व्यक्त व्हायला आवडतं. ती मंडळी आपले विचार किं वा विनोदी फं डे टेक्स्ट करूनही तोच आनंद मिळवतात. मात्र चॅटिंगच्या ट्रेण्डमध्ये गेल्या काही वर्षांत बदल होत राहिले आहेत. म्हणजे पत्र जाऊन जसे टेलिफोन आले, नंतर मोबाइल आले तसंच आपली प्रतिक्रिया, भूमिका शेअर करण्यासाठी शब्दांवर किं वा टेक्स्टिंगवर असलेला भर कमी होत गेला आहे. आणि आता तो स्थिरावला आहे व्हॉइस नोट, स्टिकर, जीआयएफ आणि भन्नाट इमोजींवर!

टेक्नॉलॉजीत होत गेलेल्या बदलांमुळे नवनवे ट्रेण्ड्स सेट होत गेले आहेत. स्टिकर आणि जीआयएफ चॅटिंगमध्ये आले नव्हते तेव्हा लोक इमोजीच वापरत होते.? टेक्स्टिंगशिवाय चॅटिंग शक्य नसलं तरी यातही अनेक बदल झाले आहेत. टेक्स्ट करताना शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिण्याची आता कित्येकांना सवय झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील शॉर्ट फॉर्म शब्द वापरण्याचा फंडा आहे. ॅट आणि ॅठ पाठवून आपण गुड मॉर्निग आणि गुड नाइट पाठवतो. तसंच शाब्दिक रचनेत शॉर्ट फॉर्म करत टायपिंगची मज्जा शेअर केली जाते. उदाहरणार्थ, हिंदी ही भाषा घेतली तर इंग्रजी लिपी असते, त्याचे उच्चार हिंदी होतात.? म्हणजे ‘है’ बोलायचं असेल तर फक्त ‘एच’ टाईप करतात आणि ‘क्या’ बोलायचं असेल? तर? ‘के’ टाईप करतात. चॅटिंगने आपल्याला संवादाचे नवे दालन उपलब्ध करून दिले आहे, यात आता काहीच नवल नाही.

चॅटिंगमधील नवनवे बदल हे प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार तयार होतात, असं जाणकार सांगतात. कारण एक व्यक्ती आपली आवड इतरांबरोबर ‘शेअर’ करते त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला आपल्यातलं काही तरी त्यात आहे असं वाटतं. जर ती व्यक्ती आपली आवड सतत त्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करत राहिली तर समोरच्या व्यक्तीलाही ती गोष्ट आवडायला लागते. मग ते आवडलेलं इतरांबरोबरही शेअर के लं जातं. असं करत करत मग बऱ्याच जणांना ती गोष्ट आवडते आणि तेही शेअर करतात. अर्थात, इथे ती आवड म्हणजे ‘इमोजी’ आणि ‘स्मायली’. लोक चॅटिंग करताना ज्या इमोजी किंवा स्मायलीसोबत त्यांना शेअरिंग करायला आवडतं तेच निवडतात. त्यांना चिक्कार पर्यायही उपलब्ध आहेत. चॅटिंगचं जग हे आनंद शेअर करण्यासाठीचं आहे. कोणी अगदी इमोजी किं वा स्टिकरच्या माध्यमातून राग, दु:ख, कंटाळा व्यक्त के ला तरी त्याला ताजंतवानं करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी काही वेगळे स्टिकर आणि जीआयएफ शोधले जातात. बोलण्यापेक्षा के वळ नजरेतून भाव व्यक्त करण्याची सोय या इमोजी आणि स्टिकरसारख्या नव्या, ट्रेण्डी फीचर्सनी साधली आहे. त्यामुळे हे स्मायली जग तरुणाईने जास्त जवळ के लं आहे. इमोजींचा हा संवादवेलू तुमच्या मोबाइल वॉलवरही नक्कीच चढला असणार. त्याला आपलंसं केलंत तर हॅशटॅग ट्रेण्डिंगच्या आधुनिक युगातला हा आनंद तुम्हालाही कायम ‘स्मायलिंग’ ठेवेल.

viva@expressindia.com