scorecardresearch

Premium

फॅशन पॅशन : फॅशन गोइंग रेट्रो

फॅशन म्हणजे नक्की काय? लेटेस्ट फॅशन कशी ओळखायची? आपल्याला कुठली फॅशन सूट होईल, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हे नवं सदर फॅशन- टेक्सटाईल एक्सपर्ट यातून संवाद साधतील.

फॅशन पॅशन : फॅशन गोइंग रेट्रो

फॅशन म्हणजे नक्की काय? लेटेस्ट फॅशन कशी ओळखायची?  आपल्याला कुठली फॅशन सूट होईल, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हे नवं सदर फॅशन- टेक्सटाईल एक्सपर्ट यातून संवाद साधतील.
फॅशन करणं, अप टू डेट राहणं हे आता नवीन राहिलं नाही. पूर्वी सर्वसामान्य लोकं फॅशनपासून तशी अलिप्त असायची. रँपवर दिसते तीच किंवा सिनेमांमधून करतात तीच फॅशन असं काहीसं वातावरण होतं. त्यातूनही जरा मॉडर्न स्टाईलचे कपडे वापरणारी, किंवा वेस्टर्न आऊटफिट्स वापरणारी मुलगी असेल तर ती फॅशनेबल समजली जायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता फॅशनची आपल्या आयुष्याशी घट्ट सांगड घातली गेलीयं. आता फक्त कपडय़ांमधून किंवा दागिन्यांवरून आपली फॅशन बघितली जात नाही. तर रोजच्या व्यवहारातून – आपण काय खातो, कसं खातो, काय करतो, कुठे फिरायला जातो आणि आपले छंद काय आहेत याचीही फॅशन होऊ शकते. ज्या डिशची चलती आहे, फॅशन आहे तेच पदार्थ आपण खातो. म्हणजे अगदी कट्टर नॉनव्हेजिटेरियन मुलगी फक्त ‘गोइंग व्हेगन’ ही स्टाईल आहे, म्हणून शाकाहारी होईल. आपण कुठल्या प्रकारचे व्यायाम करतो, हेसुद्धा त्या क्षेत्रातल्या फॅशनवर अवलंबून असतं. म्हणजे योगाला जायचं की एरोबिक्सला हे सध्या ट्रेंड कुठला आहे, त्यावरून ठरवलं जातं.
तर सध्या कशाचा ट्रेंड आहे, कुठली फॅशन आहे, हे सर्वसामान्य लोकांनाही माहिती असतं. भारतीय फॅशन नेहमीच बॉलिवूडच्या तारे- तारकांच्या प्रभावाखाली राहिली आहे. सिनेमातूनच फॅशन ट्रेंड रुळले जातात. मधुबाला ते माधुरी, ऋषी ते रणबीर आणि हेलन ते मलाईका प्रत्येकानं कोणती ना कोणती फॅशन रुढ केलेली आहे. त्यांनी घातलेले कपडे, त्यांच्या हेअर स्टाईल सगळीच फॅशन होते. जुन्या काळातल्या फॅशन पुन्हा चलतीत येणं, हीसुद्धा काही नवीन बाब राहिलेली नाही. आता सर्वसामान्य जनता अधिक फॅशन कॉन्शस झाल्यानं त्यांना गेल्या जमान्यातली फॅशन काय होती, ते चटकन समजतं. ते आपल्याला आवडलेली फॅशन उचलतात. त्यात बदल करतात नाही तर तीच ‘रेट्रो स्टाईल’ म्हणून पुन्हा रूढ करतात.
तुम्हाला तो साधना कट आठवतोय का? आई किंवा मावशीच्या जुन्या अल्बममधले फोटो बघा. तेव्हाची तरुणाई तो हेअर कट मिरवताना नक्की दिसेल. आतासुद्धा तशा फ्लिक्स किंवा लेअर चेहऱ्यावर हव्या, असं म्हणणाऱ्या मुलींची संख्या वाढतेय. एखादी फॅशन चलतीत आली की, सगळे त्याच स्टाईलचे कपडे घेण्याच्या मागे लागतात किंवा तशीच स्टाईल करतात. मग त्याचं सॅच्युरेशन होतं आणि हळूहळू ती फॅशन लयाला जाते. सध्या दिसणाऱ्या ‘लेग ओ मटन स्लीव्हज’ ही जुन्या जमान्यातलीच फॅशन होती. आता पुन्हा एकदा मुलींना असे ड्रेस हवेहवेसे वाटताहेत. तशीच गोष्ट ‘पफ स्लीव्हज’ची.
आज ३० वर्षांपूर्वीच्या त्या रेट्रो स्टाईलची पुन्हा चलती आहे. कपडय़ांमध्ये बोलायचं तर तसेच बोल्ड, डिजीटल प्रिंट, पोल्का डॉट्स हे आज चलतीत आहेत. अनार्कली पॅटर्नमुळे पुन्हा अगदी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातला काळ अवतरल्यासारखं वाटतंय. पण इंडो- वेस्टर्न आउटफिट्समध्येही ती जुन्या जमान्यातली फॅशन डोकावतेय.

सध्याची इन स्टाईल काय?
मान्सूनमुळे बाहेरच्या वातावरणात ग्रे शेड्सच जास्त दिसतायत. त्यामुळेच मग नियॉन कलर ही आजची लेटेस्ट फॅशन आहे. सध्या वॉर्डरोबमध्ये नियॉन कलर हवेतच. निळा, हिरवा आणि गुलाबी हे हॉट कलर्स आहेत. नियॉन कलरच्या अ‍ॅक्सेसरीज हव्यातच. बॅग, फूटवेअर आणि या ऋतूत अगदी हवेतच असे रेनकोट्स आणि जॅकेट्स यामधून नियॉन कलर आणता येतील.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

अमिताभ बच्चनच्या एक्जॅजरेटेड बूट कट पँट आणि वरती स्लिम फिट शर्ट आणि मोठय़ा कॉलर किंवा पफ आठवा. ७० च्या दशकातली ही फॅशन पुन्हा २००० च्या दशकात येऊन गेली. आता ती फॅशन पुन्हा जातेय. खूप सॅच्युरेशन झालं, म्हणजे जिथे – तिथे तेच तेच दिसायला लागलं की फॅशन लुप्त होते. सगळ्यांना आपला वॉर्डरोब बदलावासा वाटतो आणि मग पुन्हा नवी फॅशन जन्म घेते.
असं हे सायकल चालतच राहतं. कोणतीही नवी फॅशन अल्पकाळ टिकली तर ते फॅड होतं. एखाद्याच सिझनपुरती किंवा काही थोडय़ाच काळापुरती ती स्टाईल असेल तर ते फॅड असतं. पण काही फॅशन मात्र चिरकाल टिकणाऱ्या असतात. कितीही वर्ष लोटली, पिढय़ा बदलल्या तरी त्या फॅशन तशाच राहतात. भारताचा विचार केला तर साडी, एक एव्हरग्रीन फॅशन आहे. त्याच्या पॅटर्नमध्ये बदल झाले, स्टाईल बदलली तरी फॅशन तीच आहे. ती कधीच जुनी होणार नाही. डिझाईन आणि ड्रेपिंग बदलेल पण आजही साडी ही भारदस्त आणि ग्रेसफूल फॅशन आहे. प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबरमध्ये एक तरी साडी असलीच पाहिजे, अशी ही फॅशन आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-07-2013 at 01:02 IST
Next Story
क्लिक

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×