गायत्री हसबनीस

पावसाळय़ाच्या दिवसांत खास करून तरुणांसाठी सध्या कपडय़ांच्या बाबतीत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. याची काही महत्त्वाची कारणे म्हणजे डिजिटलायझेशन अमाप वाढल्याने त्यानुसार आपली फॅशनही बदलली आहे. याचा परिणाम हा स्त्रीयांपेक्षा पुरुषांवर झालेला आढळतो. तेव्हा ऑनलाइन शॉपिंगवरही असंख्य फॅशनेबल कपडे तरुणांकरिता उपलब्ध होत आहेत. दुसरं म्हणजे आजकाल कॉर्पोरेट, जिम, ट्रॅव्हल किंवा अगदी घरगुती कपडय़ांच्या फॅशनमध्येही एकसारखेपणा आला आहे. जीन्स किंवा ट्राऊझर्सवर अवलंबून राहणारी तरुणाई आता पायजम्यापर्यंत आली आहे, त्यामुळे पाश्चात्त्य फॅशनप्रमाणे लूज फिटिंग कपडय़ांना मागणी वाढते आहे. तिसरं म्हणजे युनिसेक्स फॅशन आता पूर्णत: रुजली असल्याने मेन्स फॅशनमध्येही आता हॅरम, लेहेंगा पॅन्टचा शिरकाव झाला आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

कारणं अनेक असली तरी पुरुषांना आता टिपिकल ड्रेसिंग आवडत नसून आऊट ऑफ द बॉक्स आणि हटके लुक ठेवण्याची क्रेझ त्यांच्यातही मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळते आहे. यंदाच्या समर कलेक्शनमध्ये मेन्सवेअर फॅशन हे टॉपवर होते. जून महिना सुरू झाल्यापासून आता ऑफलाइन आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी बऱ्याच स्टाईल्स बाजारात इन झाल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळे पर्याय निवडून मिसमॅच स्टाईल पुरुषांना आपलीशी करता येणं शक्य आहे.

मॅचिंग आणि ऑड-मॅन-आऊटचा फंडा

सध्या अधूनमधून उन्हाच्या झळा आणि त्यात पावसाच्या सरींची बरसात अशा दोन्ही अनुभवांतून लोकांना जावं लागतं आहे. त्यामुळे थोडेसे थंड आणि मधूनच उबदार वाटतील अशाही कपडय़ांची निवड करावी लागते. हूडी, झीपरसारखे पर्याय आणि त्याबरोबर स्पोर्टी लुक ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे एकीकडे अशा पद्धतीचे फ्यूजनही उत्तम ठरेल आणि वेगवेगळय़ा मौसमात ते कपडे आलटून पालटून वापरता येतील. यात मनासारखी फॅशन करायची असेल तर मॅचिंग आणि ऑड-मॅन-आऊटचा फंडा म्हणजेच मिसमॅचचा ट्रेण्ड वापरू शकता. यामध्ये कलरफुल कपडय़ांचा ट्रेण्ड वाढला आहे ज्यात ट्राऊझर आणि टी-शर्ट्सचे लुक्स जास्त वाढले आहेत. ऑड-मॅन-आऊट हाही एक पर्याय होऊ शकतो. उदाहरणार्थ, कलर्ड पॅन्ट असेल तर त्यावर पॅटर्न असलेला शर्ट अथवा जॅकेटच्या बाबतीतही प्लेन शर्ट असेल तर त्यावर प्रिंटेड जॅकेट किंवा डिझाईनच्या पॅन्ट्स घालू शकता. याउलट मॅचिंगचा ट्रेण्ड आहे. संपूर्ण प्रिटेंड, कलर्ड, स्ट्राईप्सचा सूट मुलांमध्येही सध्या जोर धरतो आहे. यामध्ये सिल्क फॅब्रिकचे कपडेही उपलब्ध आहे.

स्ट्राईप्सचा वाढता ट्रेण्ड

स्ट्राईप्सचा ट्रेण्डही सध्या आहे. यात सिंगल लेअर, मल्टिलेअर स्ट्राईप्स तसेच गोलाकार स्ट्राईप्सची फॅशन आहे. ब्लॉक प्रिंटेड, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, कॉटन प्रिंटेड, अ‍ॅनिमल पिंट्र्स तसेच फ्लोरल पिंट्र्सना आता जोरदार मागणी आहे. पावसाळय़ात जर कोणाला पारंपरिक कपडे घालायचे असतील तर पॉलिस्टर फॅब्रिकचे प्रिंटेड कुर्तेही उपलब्ध आहेत. बॉम्बर जॅकेटचा सध्या फंडा वापरला जातोय, यातही स्ट्राईप्स, प्रिंटेड जॅकेट्सचा फंडा सर्वाधिक आहे. परका जॅकेट किंवा सूट या मौसमात वापरण्याजोगा आहे. हा ट्रेण्ड बॉलीवूड सेलिब्रिटींकडून आलेला असल्यामुळे यातले रंगही अति फंकी आणि निऑन असे आहेत. ऑनलाइन साइट्सवर बॉम्बर आणि परका सूट्स चांगल्या किमतीत आणि स्टाईल्समध्ये उपलब्ध आहेत. सध्या स्ट्राईप्सच्या फॅशनसह ट्रॉपिकल पिंट्र्सही तितक्याच प्रभावी आहेत. यात मिसमॅच करण्याची गंमत आहेत. म्हणजे कॅज्युअल सिंपल रंगाच्या पॅन्टवर जर तुम्ही ट्रॉपिकल पिंट्रचा टॉप घालत असलात तर त्याचसोबत त्यावर स्ट्राईप्सचे जॅकेट तुम्ही परिधान करू शकता. यामुळे यात तुम्हाला मॅचिंग, कॉन्ट्रास्ट आणि मिसमॅचचा फायदा मिळतो. यात चेक्सच्या फॅशनलाही चांगला वाव मिळतो आहे.

चपला, बूट की स्लिपर?

पावसाळय़ात पुरुषांना फूटवेअरमध्ये काहीच बंधन नसते. त्यांना चपला, शूज, बूट, स्लिपर असे नानाविध प्रकार उपलब्ध असतात. त्यातून वॉटरप्रूफ चपलांवर सगळय़ाचाच भर असतो. यंदाही पुरुषांमध्ये शूज, स्निकर आणि कॅनव्हासचा ट्रेण्ड असला तरी सर्वात जास्त मागणी ही स्लिपर्सना आहे. यातही अनेक कलरफुल स्लिपर्स आहेत. स्निकर्समध्ये वॉटरप्रूफ शूज तर आहेतच, पण त्याचसोबत त्यात वुव्हन स्टाईल, ग्रे कलरमधील लेदर शूज आहेत. स्निकर्सप्रमाणे हिरवा, निळा, ग्रे, जांभळा या रंगातले लॉफर्स आणि मल्टिकलर असे स्लिपर्स या मौसमात वापरू शकता.

अशा काही टिप्स.. ल्ल हल्ली मुलांमध्ये वर्केशेन, स्टेकेशनचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तर कॉर्पोरेट लुक ठेवण्याची गरज नसते. सिंपल पण थोडे ग्रे शेड्सजवळ जाणारे कपडे तुम्ही घालू शकता.

  • तुम्हाला पावसाळय़ातही डेनिम किंवा जीन्स घालायची असेल तर त्यावर शक्यतो भडक रंग टाळा. लाइट प्रिंटेड अथवा स्ट्राईप्सचा शर्ट, टी-शर्ट तुम्ही घालू शकता.
  • वर म्हटल्याप्रमाणे, मल्टिकलर फॅशनचा ट्रेण्ड आहे, तेव्हा डाय केलेल्या टी-शर्टची फॅशन नवीन मार्केटमध्ये आली आहे. यात या वर्षीच्या रंगाप्रमाणे निळय़ा, जांभळय़ा रंगाचे कपडे परिधान करू शकता.
  • मल्टिकलर फॅशनचा सध्या ट्रेण्ड आहे. त्यामुळे तसे प्रिंटेड शूज, कॅप्स, लॉन्ग कुर्ती, बॅगपॅकही वापरू शकता.

viva@expressindia.com