आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोणच्या ड्रेसिंगकडे कधी थोडं बारकाईने पाहिलं आहे? दीपिकाला छान उंची आहे. त्यामुळे स्टायिलगच्या वेळी तिचे लांबसडक पाय हा तिच्या बॉडीस्ट्रक्चरचा फोकस असतो. म्हणूनच बहुतेकदा स्लीव्हलेस, सिंपल राऊंड नेकचे ड्रेसेस घालणं ती निवडते. तेच आलियाला मात्र दीपिकाइतकी उंची नाही. त्यामुळे ती अपर बॉडी फोकसमध्ये आणण्याचा जास्त प्रयत्न करते. त्यामुळे वेगवेगळ्या नेकलाइन, ऑफ-शोल्डर, स्ट्रॅपलेस ड्रेसेस वापरण्याकडे तिचा कल अधिक असतो. दोघींचे बॉडीस्ट्रक्चर वेगवेगळे असले, तरी त्यांच्या ड्रेसिंगमध्ये खांद्यावरचा फोकस महत्त्वाची भूमिका बजावतो. दीपिकाच्या ड्रेसिंगमध्ये खांदे न्यूट्रल असतात, तर आलिया खांद्यांकडे फोकस वळविण्याकडे अधिक लक्ष देते.

ड्रेसचं फिटिंग गळा, बाह्य़ा, रंग, पॅटर्न अशा अनेक बाबींवर कसं अवलंबून असतं, याबद्दल मागे आपलं बोलून झालेलं आहेच. यांच्यातलाच एक महत्त्वाचा घटक आहे – खांदे. रॅकवरून काढलेला ड्रेस आपण पहिल्यांदा खांद्यांना लावून बघतो. ड्रेसचं फिटिंग घट्ट आहे की ढगळ हे खांद्यांकडे बघून ठरवलं जातं. एखाद्या ड्रेसमध्ये खांदे रुंद दिसले की, लगेच वजन वाढलंय का? असं विचारलं जातं. पण तेच खांदे अति-आखूड दिसले की, बॉडीस्टाइल बिनसते. फॅशनची बंदूक सतत खांद्यावरच असते. मग अशा वेळी या खांद्यांकडे एकदा लक्ष द्यायला हवंच.
कुर्ता असो किंवा वन पीस ड्रेस, गाऊन असो किंवा साडीचा ब्लाऊज तो जर खांद्यांवर व्यवस्थित बसला नाही, तर अख्खं गणित चुकतं. त्यामुळे कोणत्याही ड्रेसचं फिटिंग तपासताना तो खांद्यांवर कसा बसतोय, याकडे पहिल्यांदा लक्ष द्या. फिटेड ड्रेस निवडण्याच्या नादात तुम्ही खांद्यांवर घट्ट बसणारा ड्रेस निवडलात, तर खांदे दाबले गेल्याच स्पष्ट दिसतं आणि त्यामुळे बॉडीस्ट्रक्चर बिघडतं. सध्या लूझ फिटिंग ड्रेसेसचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात एखादा साइज लूझ ड्रेस घेऊन चालत नाही. जर त्या ड्रेसची शोल्डर लाइन तुमच्या खांद्यांपेक्षा मोठी असेल, तर शरीराला बाक आल्यासारखं वाटू लागतं. लूझ फिटेड ड्रेसेससुद्धा खांद्यांना व्यवस्थित बसविलेले असतात, बस्टलाइनपासून त्यांना लुिझग दिलेलं असतं.
ड्रेस कोणताही असो, त्यात तुमचे खांदे ताठ आणि रुंद दिसल्यास तुमच्या शरीराला उठाव मिळतो. त्यामुळे कॉर्पोरेट विश्वात ब्रॉड शोल्डर ड्रेसिंगला खूप महत्त्व आहे. फॉर्मल जॅकेट्समध्ये त्यासाठी शोल्डर पॅड टाकलेले असतात. त्यांच्यामुळे खांदे सरळ दिसायला मदत होते. बऱ्याचदा फॉर्मल शर्ट्समध्येसुद्धा शोल्डर पॅड असतात. एखाद्या मोठय़ा समारंभासाठी तुम्ही न्यूड किंवा फिकट रंगाची नेट, लेस किंवा जॉर्जेटसारख्या सुळसुळीत कापडाची साडी नेसणार असाल, तर ब्लाऊज शिवताना टेलरकडून शोल्डर पॅड टाकून घ्या. सुळसुळीत कापडांच्या साडय़ांना बल्कीनेस नसतो. त्यामुळे बऱ्याचदा खांदे पडल्यासारखे दिसतात. या पॅडमुळे ब्लाऊजला उठाव मिळतो आणि पदर फोकसमध्ये येतो. अनेकदा गाऊन्समध्येही याच कारणासाठी शोल्डर पॅड वापरले जातात. रॅगलन, किमोनो अशा फुल स्लीव्ह प्रकारांमध्ये पातळ शोल्डर पॅड वापरले जातात, त्यामुळे खांदे उठून दिसतात आणि स्लीव्ह्सना छान फॉल मिळतो. बाजारात अनेक वेगवेगळ्या साइज आणि जाडीचे शोल्डर पॅड मिळतात. तुमच्या गरजेनुसार योग्य शोल्डर पॅड निवडून तो टेलरला देणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. शोल्डर पॅडची लांबी मानेच्या टोकापासून ते दंडापर्यंत हवी. तो खांद्यांवर व्यवस्थितपणे बसायला हवा. जर ब्लाऊजमध्ये ब्रेस्ट कप्स वापरणार असाल, तर मात्र शोल्डर पॅड वापरू नका. टेलिरगचे साहित्य मिळणाऱ्या दुकानांमध्ये तुम्हाला शोल्डर पॅड मिळू शकतात.
व्यवस्थित ड्रेसिंग करताना तुमचे खांदे ब्रॉड आहेत की आखूड यापेक्षा तुम्ही त्यांना योग्य आकार कसा देता, याला अधिक महत्त्व असतं. रोजच्या कपडय़ांमध्ये काही छोटय़ा ट्रिक्स वापरून तुम्ही शोल्डर इन फोकस आणू शकता.
’ खांदे आणि पाय यांचा थेट संबंध असतो. तुमचे खांदे बारीक असतील तर ड्रेसिंगमध्ये तुमच्या पायांकडे फोकस अधिक असू द्या. तेच जर तुमची बॉडी पेअर शेप असेल, तर खांद्यांवर अधिक फोकस असू द्या. त्यामुळे पायांचा जाडेपणा लपला जातो.
’ तुमचे खांदे आखूड किंवा खूप ब्रॉड असतील तर शक्यतो शोल्डरवर अति डिटेिलग किंवा हेवी एम्ब्रॉयडरी घेणं टाळा.
’ स्ट्रॅपलेस, स्पगेटी स्ट्रॅप ड्रेसमध्ये खांदे फोकसमध्ये येतात. तुमचे खांदे शॉर्ट असतील, तर हे ड्रेस नक्कीच ट्राय करा.
’ लेअिरगमध्ये खांद्यांवरचा फोकस जाऊ शकतो. तसेच ते अजूनच शॉर्ट दिसतात. त्यामुळे तुमची उंची कमी असेल किंवा शोल्डर छोटे असतील तर लेअिरग करण्यापेक्षा एकच छान, ब्रॉड शोल्डरच जॅकेट घाला.
’ अति ब्रॉड खांदे किंवा अ‍ॅपल शेप बॉडीटाइप असल्यास ड्रेसचा फोकस कंबर आणि पायांकडे प्रामुख्याने असू द्या. त्यासाठी वेस्टलाइनपासून फ्लेअर असलेले ड्रेस, लांब स्कर्ट्स, स्ट्रेट फिट डेनिमच्या मदतीने तुम्ही शोल्डरवरचा फोकस बदलू शकता.
’ तुमचे खांदे ब्रॉड असतील, तर शक्यतो जादाचा शोल्डर पॅड वापरणं टाळा. अनेक फॉर्मल जॅकेट्समध्ये केवळ स्लीव्ह आणि शोल्डरला आकार देण्यापुरता पातळ शोल्डर पॅडचा वापर केलेला असतो. त्या स्टाइलचे जॅकेट्स वापरू शकता.
’ ब्रॉड शोल्डर असल्यास ऑफ शोल्डर गाऊन किंवा वन पीस ड्रेसऐवजी बॅकलेस ड्रेस निवडा. ड्रेसचा फोकस सहज वळतो. स्ट्रॅपलेस ड्रेस, ऑफ शोल्डर, कटआऊट शोल्डर हे शोल्डर स्टायिलगचे प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहेत. पार्टीजमध्ये हा लुक भाव खाऊन जातो. पण त्यांना योग्य रीतीने कॅरी करणंसुद्धा तितकच गरजेचं आहे. सगळ्यात प्रथम तुमच्या सोयीने नेकचा डीपनेस निवडा. केवळ ट्रेंड आहे, म्हणून अति डीप नेक ड्रेस घातल्यास वावरताना अवघडलेपणा येऊ शकतो. तसेच कॉलेजला जाताना ऑफ शोल्डर टॉप घालणार असाल, तर खांद्यावरची बॅग, ट्रेन, बसचा प्रवास हे सगळं लक्षात घेऊन टॉप निवडा. अशा प्रकारच्या कपडय़ांमध्ये झिप, हुक व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या. ल्ल
१, २, ३: शॉर्ट ड्रेसेस आणि खांद्यावर असलेले प्रिंट डिटेल्स यांच्या मदतीने आलिया नेहमी शोल्डर फोकसमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. तर आपल्या उंच पायांना फोकस करण्यासाठी दीपिका ड्रेसचे शोल्डर सिंपल ठेवणं पसंत करते.
४, ५: स्ट्रपलेस ड्रेस ट्रेंडमध्ये आहेत. तुमचे खांदे ब्रॉड असतील, तर एकदा स्टेटमेंट नेकपीस वापरून खांद्यांचा ब्रॉडनेस कमी करू शकता. ऑफ शोल्डर ड्रेस योग्यरीत्या कॅरी न केल्यास खांदे दाबल्यासारखे किंवा अति रुंद दिसतात. त्यामुळे असे ड्रेस निवडताना, खांद्यांचा आकार लक्षात घेणे गरजेचे आहे.
६: लांब जॅकेटमुळे फोकस पायावर जातो. त्यामुळे ब्रॉड शोल्डर असल्यास लांब जॅकेट्स नक्कीच वापरा.

-मृणाल भगत