मैत्र जीवाचे

रक्ताच्या नात्याहूनही खास नात्याचा दिवस म्हणजे ‘मैत्री दिन’.

मैत्र जीवाचे

अमृता अरुण
रक्ताच्या नात्याहूनही खास नात्याचा दिवस म्हणजे ‘मैत्री दिन’. आपल्याकडे ऑगस्ट महिना आला की पहिल्या रविवारची आतुरतेने वाट पाहिली जाते ती याच मैत्री दिनाची.. खरंतर युनायटेड नेशनने ३० जुलैला ‘इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे’ घोषित केला होता, परंतु आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे यंदा ७ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा होणार आहे..

महाविद्यलयीन विद्यर्थ्यांच्या आयुष्यात या फ्रेंडशिप डेचं महत्व अधिक. आपण स्वत: निर्माण केलेलं, एका जीवाला दुसरम्य़ा जीवाशी सहज जोडून घेणारं हे मैत्रीचं नातं. इथे कुठेही कोणाला विचारून मैत्री करावी लागत नाही वा आईवडिलांची परवानगी घ्यावी लागत नाही. मनापासून जोडलेलं मैत्र साजरा करण्याची संधी देणारा ‘फ्रेंडशिप डे’ म्हणूनच त्यांना महत्वाचा वाटतो.

आपल्या आयुष्यातील एखादी महत्वाची गोष्ट आपल्या घरच्यांव्यतिरिक्त एखाद्यकडे व्यक्त करावीशी वाटणं ही फार सहजभावना आहे. आपले राग-रुसवे, दु:खाचे -आनंदाचे क्षण त्याला किंवा तिला सांगून मन हलकं करावं किंवा एखाद्य गोष्टीबाबत मनात संभ्रम असल्यास आपल्याला समजून घेईल अशा मित्रमैत्रिणीकडून सल्ला घ्यावा, असं प्रत्येकालाच वाटतं. सुखात आणि दु:खातही आपल्याला जीव लावणारम्य़ा मित्र-मैत्रिणींबरोबरचं हे गोड नातं साजरं करण्यासाठी म्हणून फ्रेंडशिप डेची सुरूवात झाली. अर्थात आपल्याकडे हे वेड चित्रपट वा टीव्हीच्या माध्यमातूनच शिरलं आहे. आधी फक्त शाळा-कॉलेजमध्ये जाणारम्य़ा मुला-मुलींपुरता हा फ्रेंडशिप डे मर्यादित होता. आता तर मोठी माणसंही आपल्या इतर सणांप्रमाणेच फ्रेंडशिप डेही साजरा करू लागली आहेत. फ्रेंडशिप डेला एकमेकांच्या मनगटावर फ्रेंडशिप बॅण्ड (सॅटिन रिबन) बांधला जातो. हा बॅण्ड म्हणजे आपण एकमेकांचे ‘बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर’ (क्षा) असणं मानलं जातं. पण हल्ली फक्त बॅण्ड देऊन भागत नाही. आपल्या खास मित्रमैत्रिणींसाठी खास वस्तू, ग्रिटिंग कार्ड, पुष्पगुच्छ देऊन आपलं मैत्रीचं नातं अजून फुलवण्याचा प्रय केला जातो.

मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाण्यासाठी या दिवसासारखं उत्तम निमित्त असूच शकत नाही. प्रत्येकाची फ्रेंडशिप डे साजरी करण्याची आपापली पद्धत असते. एखादा मित्रमैत्रिणींचा मोठा ग्रुप एकत्र येऊन चौपाटीवर-बागेत फिरायला जातो, कोणी सिनेमा पाहायला जातात तर कोणी लंच किंवा डिनरचा प्लॅन करतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनात रविवारच काय तो सुट्टीचा मिळतो आणि फ्रेंडशिप डे रविवारीच येत असल्यामुळे काहीजण दोन दिवस मस्त वीकएन्ड प्लॅनही करतात.

कॉलेजमधला फ्रेंडशिप डे म्हणजे एक प्रकारचा सोहळाच असतो. यादिवशी मुलं-मुली बहुधा पांढरम्य़ा रंगाचे कपडे घालतात आणि त्यावर मित्र मैत्रिणी मार्करने आपली नावं लिहितात किंवा चित्र काढतात किंवा एकमेकांना चिडवण्यासाठी काही चारोळ्या-कविताही लिहिल्या जातात. काहीजण टॉप-टीशर्ट ऐवजी हातावरच ही कलाकुसर करून घेतात. कॉलेजच्या गेटपासून ते कॅन्टीनपर्यंत फ्रेंडशिप डेची सजावट, शुभेच्छा फलक पाहायला मिळतात. याशिवाय, काही कॉलेजेसमध्ये यानिमित्ताने स्पेशल स्पर्धा, गेम्स, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.

आजकाल फ्रेंडशिप डेसाठी विविध प्रकारचे गिफ्ट्स बाजारात किंवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. फक्त बॅण्ड जरी बांधायचा झाल्यास त्यातही आपल्या मित्राचं नाव असलेला बॅण्ड डिझाईन करून मिळतो. हॅन्डमेड गिफ्ट्समध्येही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. फोटोफ्रेम, कीचेन, पर्स, शोपीस, घडय़ाळ इत्यादी गोष्टींमध्ये आपण आपल्या मित्राचे नाव किंवा फोटो टाकून त्याला गिफ्ट करू शकतो. शेवटी आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हाच यामागचा उद्देश असतो. मग ते साधं फुल असो किंवा एखादं महागडं गिफ्ट. मैत्री ही मैत्री असते आणि आपल्या मनातील मैत्रीची भावना व्यक्त करण्यासाठीचा हा खास दिवस पुढच्या काही दिवसांसाठी, महिन्यांसाठी भरभरून उत्साह देऊन जातो. त्यामुळे बाकी काही साजरं करता येवो न येवो.. फ्रेंडशिप डे मस्ट आहे.
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘जग’नोंदी : ‘क’ करिअरचा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी