ये दोस्ती हम नहीं छोडेंगे..

करोनामुळे घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे. त्यामुळे फ्रेंड्सना भेटणं तर जवळपास अशक्यच झालं आहे.

गायत्री हसबनीस viva@expressindia.comp
गेलं संपूर्ण वर्ष लॉकडाऊन असल्याने मैत्रीत नि:संशय दुरावा निर्माण झाला होता. अनलॉक झाले तेव्हा मित्रमैत्रिणी फिरण्याच्या निमित्ताने एकत्र आले, परंतु मैत्रीतला तो ‘इसेन्स’ हरवला होता असं बऱ्याच जणांना वाटलं. आता प्रत्येकाच्या आयुष्यात करिअर किंवा शिक्षण अशा वेगवेगळ्या कारणाने दुरावा निर्माण होतोय हे तरुणाईशी बोलल्यावर लक्षात आलं. मात्र ये दोस्ती हम नहीं छोडेंगे.. म्हणत हा दुरावा येनकेनप्रकारेण पळवून लावण्याचा, मैत्रीतील ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न ही पिढी करते आहे.

लॉकडाऊन ते अनलॉकपर्यंत आलो खरं.. पण, मित्रमंडळ जवळ येण्यापेक्षा दुरावत तर चाललं नाही आहे ना असं वाटतं आहे. सध्या सगळे आपापल्या वाटा शोधण्यात व्यग्र आहेत. अशा परिस्थितीत दुरावा येणारच, मग ऑनलाइन गप्पांवर का होईना आपली मैत्री टिकवण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. मुंबईची तन्वी भट्ट सांगते, ‘करोना आल्यापासून मैत्री टिकवून ठेवणं हा एक टास्क झाला आहे. पूर्वी फ्रेंड्ससोबत सतत भेटगाठी होत. बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन तर व्हायचाच, परंतु करोनामुळे घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे. त्यामुळे फ्रेंड्सना भेटणं तर जवळपास अशक्यच झालं आहे. म्हणूनच फ्रेंडशिप टिकवून ठेवण्यासाठी मी अधूनमधून फ्रेंड्सना व्हिडीओ कॉल करते. कधीतरी चेंज म्हणून आम्ही व्हिडीओ कॉन कॉलही करतो ज्यामुळे सगळ्यांना एकमेकांशी बोलण्याची संधी मिळते आणि आपण एकमेकांपासून दूर नाही आहोत, ही भावनाही समाधान देऊन जाते’. एरव्ही तिला कॉलपेक्षा टेक्स्ट करणं अधिक आवडतं. त्यामुळे टेक्स्टच्या माध्यमातून फ्रेंड्सबरोबर संपर्कात राहत असल्याचं ती सांगते. ऑफिस, इतर वैयक्तिक कामे आणि मग ‘मी टाइम’ हवा असतो. त्यामुळे दररोज तर हे सगळं शक्य होत नाही, परंतु ज्या मैत्रीमध्ये हे सगळं कम्पल्शन असेल ती मैत्रीच कसली? मैत्री तर ती असते जिथे तुम्ही कदाचित एकमेकांबरोबर विविध कारणांमुळे कित्येक दिवस बोलला नसाल, पण ज्या क्षणी तुम्ही एकमेकांशी बोलता तेव्हा तुम्हाला आपली मैत्री तशीच पूर्वीसारखी घट्ट आहे. काहीच बदललेलं नाही हा विश्वास वाटतो, असं ती म्हणते.

करोनाच्या या कठीण काळात मैत्री जपण्यासाठी काय काय गमतीजमती के ल्या जातात, याविषयी गिरीश पालेकर हा तरुण सविस्तर सांगतो. जगभर पसरलेल्या या महामारीच्या वातावरणात एकमेकांना घट्ट बांधून ठेवणारं मैत्री हेच एक मेव नातं आहे. आपण नेहमी ऑनलाइन चॅट करतो तसं रोजच्या गाठीभेटी ऑनलाइन होऊ शकतात की.. मग व्हिडीओ कॉलवर आम्ही साऱ्यांचे वाढदिवस साजरे केले. एकमेकांविषयी काळजी असली  की मग आम्ही व्हिडीओ कॉलवर तासन्तास बोलून मन मोकळं करतो. दिवसभरात एकदा का होईना ऑनलाइन माध्यमातून आम्ही आमच्या मैत्रीसाठी वेळ देतोच, असं तो सांगतो. सध्या ‘वी फास्ट’ नावाच्या अ‍ॅपद्वारे आपण अनेक वस्तू एकमेकांना पार्सल करू शकतो. त्याचाही फायदा झाल्याचं गिरीश सांगतो. ‘माझ्या घरी काही खास जेवणाचा बेत असला तर ‘वी फास्ट’द्वारे माझा डबा त्याच्या घरी  सहज पोहोचतो तसंच माझ्या आवडीचं काही त्याच्या घरी बनवलं असेल तर ते त्याचा डबा बनवून माझ्या घरी पाठवतात. काहीही पाठवायचं झालं तर ‘वी फास्ट’ खरोखर फास्ट पार्सल पोहोचवते. करोना नसताना माझ्या घरी आमच्या गावाहून आंब्याची पेटी आली की मग मी हे आंबे घेऊन दोस्तांच्या घरी जायचो. या वर्षी मी ‘वी फास्ट’ने हे आंबे पाठवले. अशा छोटय़ा-मोठय़ा गोष्टींमधून आम्ही आमची मैत्री जपतो आहोत. त्यामुळे एकमेकांपासून दूर असलो तरी जवळच आहोत असं नेहमी वाटतं. गेल्या महिन्यात झूम कॉलवर वाढदिवसाचा व्हिडीओ एडिट करून तो आम्ही कॉलवरच पाहात होतो. गमतीजमतीही शेअर झाल्या, असं त्याने सांगितलं.

एका ग्रुपमधले दोन मित्र. त्यांच्यापैकी एक हैदराबादला नोकरी करतो आहे आणि एक पुण्याला शिकतो आहे. घरबसल्या ऑनलाइनच गप्पाटप्पा होत असल्या तरी कु ठेतरी एकटेपणा जाणवू लागला म्हणून त्यांनी दुसऱ्या राज्यात असलेल्या आपल्या या मित्राची थेट भेट घ्यायचे बेत आखले आहेत. सुरुवातीला हैदराबादमध्ये असलेल्या या मित्राला सरप्राइज द्यायचा त्यांचा विचार होता, पण नंतर त्यांनी त्यालाही या प्लॅनिंगमध्ये सामील करू न  घेतलं. हीच खरी मैत्री! मानसशास्त्रज्ञांच्या मते ही एक फेज आहे ज्यातून आताची तरुण पिढी जाते आहे. टीनेजर्सच्या दृष्टीने मैत्री खूप महत्त्वाची आणि भावनिक आधार देणारी असते. तरुणाईला सतत खऱ्या मैत्रीची आस असते, शेअरिंग करायला कोणीतरी हवं असतं. मग कोणत्याही माध्यमातून हे निखळ आनंद देणारं नातं जपण्याचा प्रयत्न ते करतात.

सेलिब्रेशन कसं कराल?

सध्या बाजारात फ्रेण्डशिप बँड्स कमी असल्याने कस्टमाइज्ड मास्कवर मैत्रीपूर्ण डिझाइन, स्लोगन लिहून ट्रेण्डिंग असं काहीतरी तुम्ही तयार करू शकता, डिझायनर टीशर्ट्स घालून करोनाचे नियम पाळत फोटोशूट करणं, एखादी चांगली आठवणीतली फोटोफ्रे म बनवणं, अशा कितीतरी गोष्टी तुम्ही करू शकता. या दिवशी तुमच्या बेस्ट फ्रेंडला खूश करण्यासाठी काही गमतीजमतीही करता येतील. उदाहरणार्थ, एखादी मीम किं वा तुमच्या बेस्ट फ्रेंडचे स्केच करा आणि त्याला शेअर करा. या दिवशी तुम्ही तुमच्या मैत्रीच्या आठवणी तयार करण्यावर नक्की भर द्या. मैत्रीत दुरावा आहे, पण तो काही कायमचा नाही. त्यामुळे हे अंतर दूर सारून ऑनलाइन का होईना दोस्ती तो निभानी है हा फंडा कायम ठेवा. मैत्रीचं हे नातं जपण्याचा तुमचा प्रयत्नच तुम्हाला आनंदीआनंद देऊन जाईल. हॅप्पी फ्रेण्डशिप डे!

काही खास गोष्टी

’ तुमच्या समविचारी मैत्रीण / मित्राशी जास्तीत जास्त गप्पा मारा. एकमेकांशी संपर्कात राहा.

’ तुमची मैत्रीण / मित्र शिक्षण वा कामानिमित्ताने तुमच्यापासून दूर जात असेल तर त्याच विषयावर त्याच्याशी गप्पा मारा. त्यांना शिक्षणासंदर्भात अजून काहीतरी सांगा, मार्गदर्शन करा म्हणजे तुमच्यातला संवाद सुरू राहील, तुमची मैत्री हरवली आहे असं वाटणार नाही.

’ सोशल मीडियावरून मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहा. त्यांच्या स्टोरीवर रिअ‍ॅक्ट व्हा. त्यांच्या फोटोवर कमेंट्स करा.

’ सध्याच्या ट्रेण्डिंग घडामोडींवर आपापल्या ग्रुपमध्ये चर्चा करत राहा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Friends during the covid 19 pandemic friendship in times of covid 19 pandemic zws

ताज्या बातम्या