vv26प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका अरोरा खान देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.

मी नीलिमा,

मी ३० वर्षांची असून, माझी उंची ५ फूट आणि वजन ६० किलो आहे. माझा चेहरा गोलाकार असून, मी रंगानं उजळ आहे. माझे केस लांब, काळेभोर असून, त्यांची ‘लेअर कट’ ही हेअरस्टाइल आहे. मी एका कंपनीत, कायदा सल्लागार म्हणून नोकरी करते. माझं नुकतंच एका जर्मन तरुणाशी लग्न झालं असून, त्याची उंची ५ फूट ८ इंच आहे आणि अंगकाठी सडपातळ आहे. तो नेहमी जीन्स -टीमध्ये असतो, पण त्याच्याबरोबर असताना मी साडी किंवा सलवार खमीस घातला तर माझा लुक त्याच्या जर्मन लुकसमोर अगदीच विचित्र दिसतो. आम्ही दोघं एकत्र असताना, मला कोणती ड्रेसिंग स्टाइल शोभून दिसेल? शिवाय आमच्या लग्नानिमित्त, त्याने मे महिन्यात जर्मनीला पार्टी ठेवली आहे, त्या पार्टीसाठी मला कोणतं ड्रेसिंग शोभून दिसेल?

vv22हाय, नीलिमा,
वॉव, नीलिमा, प्रथम तुझं लग्नाबद्दल हार्दिक अभिनंदन! आता आपण तुला शोभून दिसतील अशा ड्रेसिंग्जबद्दल बोलूया. तू केलेल्या तुझ्या वर्णनावरून तुझी चण लहानशी, असावी असं वाटतं. उंची कमी आहे, पण तुझी अंगकाठी आटोपशीर असेल तर तू ‘स्केटर ड्रेस’(हा वनपीस ड्रेस, कमरेजवळ घट्ट आणि कमरेच्या खाली घेरदार असतो. या ड्रेसची लांबी, गुडघ्याच्या थोडी वर असते.) हा प्रकार ट्राय करू शकतेस. ही स्टाइल, तुझ्या नवऱ्याच्या, जीन्स आणि टी या कॅज्युअल ड्रेसिंगलाही सूट होईल. शिवाय तुम्ही एकमेकांना शोभूनही दिसाल. तू कायदा सल्लागार म्हणून नोकरी करतेस, तेव्हा शिफ्ट ड्रेस ( हाही वनपीस ड्रेसचा प्रकार असून, यात ड्रेसला फारसा घेर नसतो.) हा प्रकारही तू ट्राय करू शकतेस. शिवाय यावर ब्लेझर आणि एखादा ठळक नेकपीस हेही खूप शोभून दिसेल. लंच, डिनर किंवा ऑफिसनंतरची िड्रक पार्टी, सगळ्यासाठी ही ग्रेट स्टाइल आहे.
आता आपण तुझ्या जर्मनीतल्या लग्नाच्या पार्टीसाठीच्या ड्रेसिंगबद्दल बोलूया. त्या पार्टीसाठी तू मंद रंगसंगतीतला किंवा पूर्ण काळा गाऊन घालू शकतेस. जर ही पार्टी दिवसा असेल तर तू मंद गुलाबी रंग ड्रेसिंगमध्ये वापरू शकतेस, जर पार्टी रात्रीची असेल तर गडद रंगसंगतीतला ‘मार्सला’( सोप्या भाषेत सांगायचं तर डाळिंबी लाल रंग) किंवा रॉयल ब्लू या रंगातल्या कपडय़ात तुझा रंग खुलून दिसेल. तुझ्या कपडय़ांना शोभतील अशा हिल्स नक्की ट्राय कर. तुझा आत्ताचा हेअरकट स्टायलिश आहेच, शिवाय, तू आणखीही वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स करू शकतेस. नीलिमा, हे स्टाइल फंडाज् वापरून तू छानही दिसशील आणि स्मार्टही. तुम्हा दोघांनाही, तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
मलाइका अरोरा खान
(अनुवाद : गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प

आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न ५्र५ं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.