द्राक्ष हा निसर्गाचा सर्वात उत्तम मेवा आहे. नेहमीच्या रेसिपीज्मध्ये काही बदल करून वेगळे नावीन्यपूर्ण पदार्थ करण्याकडे माझा नेहमी कल असतो. द्राक्षापासून केलेले हे असेच जरा वेगळे पण सोपे पदार्थ, आजच्या मेन्यू कार्डमध्ये खास तुमच्यासाठी..
द्राक्ष हा निर्सगाने भेट दिलेला उत्तम प्रकारचा मेवा आहे. उत्तम प्रतीच्या फळांमध्ये द्राक्षाची गणना होते. द्राक्षांचा स्वाद मधुर असतो. द्राक्षाची वेल असते. वेलीचा रंग लाल असतो. मांडव करून त्यावर वेल चढवला जातो. द्राक्षाला झुबकेदार फुले लागतात. युरोप-अमेरिकेमध्ये द्राक्षाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. युरोपमध्ये फ्रान्स व इटली येथे आणि अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे उत्तम द्राक्षांची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. जगामध्ये सर्वात अधिक द्राक्षे फ्रान्सच्या दक्षिण भागात होतात. तेथे द्राक्षांचे विशाल आणि भरपूर बगीचे आहेत. कॉकेशस पर्वत व कॅस्पिअन समुद्राच्या दक्षिण विस्तारात, आशिया खंडाच्या पश्चिम भागात व युरोपच्या दक्षिणेकडील भागात, अल्जेरिया, मोरोक्को इत्यादी देशांत द्राक्षाची वेल नसर्गिकरित्याच उगवलेले दिसून येतात. काबूल, कंदाहार आणि काश्मीरपासून िहदुकुश पर्वताच्या उत्तर भागातही द्राक्षाचे उत्पन्न चांगले होते. द्राक्षाचे वेल दोन-तीन वर्षांचे झाल्यानंतर त्यावर फळे येतात. विशेषत: फेब्रुवारी-मार्च महिन्यांत बाजारात ताजी द्राक्षे पुष्कळ प्रमाणात पाहावयास मिळतात. भारतामध्ये द्राक्षांची लागवड पंजाब, हरियाणा व महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात केली जाते. पुणे, सातारा, नाशिक, खानदेश व गुजरातमध्ये खेडा जिल्हय़ात द्राक्षे मोठय़ा प्रमाणात होतात. त्यात नाशिकची द्राक्षे अधिक प्रसिद्ध आहेत. काळी आणि पांढरी/ पिवळी अशा दोन प्रकारची द्राक्षे तयार होतात. काळय़ा द्राक्षांचा वापर औषधांसाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. बेदाणे, मनुके व किसमिस या द्राक्षांच्या मुख्य जाती आहेत. बेदाणा, मनुका व किसमिस ही नावे सुक्या द्राक्षांसाठी वापरली जातात. बेदाणे काही अंशी पांढरे असतात व त्यांच्यात बी नसते. मनुका काळय़ा रगांच्या असतात. किसमिस साधारणत: बेदाण्यासारखेच असतात. परंतु लहान जात असते. उष्ण प्रदेशांतील लोकांची भूक व तहान भागवण्यासाठी द्राक्षे अत्यंत उपयुक्त असतात. ती रक्तवर्धक असतात. भारतामध्ये सुकी द्राक्षे अरबस्तान, इराण व काबूल या देशांतून मागवितात. तेथे सुक्या द्राक्षांचे मोठय़ा प्रमाणात पीक होते. इतर देशांपेक्षा येथीत द्राक्षे अधिक चांगली असतात.
शास्त्रीय मताप्रमाणे, द्राक्षात जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ तसेच लोह आणि शरीरात शक्ती निर्माण करणारे पौष्टिक घटक असतात. याशिवाय त्यात पोटॅशियम, सेल्युलोज, शुगर व कार्बनिक आम्ल असल्याने द्राक्ष खाण्याने मलावरोध दूर होतो. द्राक्षामध्ये फ्रूटशुगर व काबरेहायड्रेट्स मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे पौष्टिकतेच्या दृष्टीने इतर कोणत्याही फळांपेक्षा द्राक्षे अत्यंत उत्तम समजली जातात.
मेजवानीचे एपिसोड करताना मला सतत नवीन नवीन रेसिपीज् शोधाव्या लागायच्या. त्यामुळे एखाद्या पदार्थापासून प्रचलित खाद्यपदार्थाशिवाय दुसरे काय होईल याचा मी नेहमी विचार करतो. आणि यातूनच नवीन नवीन रेसिपीज् निर्माण झाल्या.

द्राक्षांचा जॅम
साहित्य : द्राक्षांचा गर ५०० ग्रॅम, जिलेटिन २ चमचे, साखर २०० ग्रॅम,
१ िलबाचा रस.
कृती : द्राक्ष चांगली धुवून त्याचा गर काढून घेणे. नंतर मिक्सरवर साखर, द्राक्षांचा गर एकत्र करून हे मिश्रण नॉनस्टिक पॅनवर चांगले शिजवावे, थोडा िलबाचा रस पण घाला. मिश्रण आटेस्तोवर जिलेटिन पाण्यात मिसळून गरम करून त्यात मिसळवावा. सर्व मिश्रण चांगले आटल्यावर थंड करून बाटलीत भरून ठेवावा.

Benefits of Millets
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
Tandlyachya pithache sandge recipe
झटपट दुप्पट फुलणारे तांदळाचे सांडगे; ‘या’ पद्धतीन बनवा कुरकुरीत सांडगे

किसमिस चटणी
साहित्य : किसमिस २ वाटय़ा, तिखट अर्धा चमचा, एक वाटी िलबाचा रस, आलं अर्धा चमचा, मीठ चवीनुसार.
कृती : किसमिस छान पाण्यात धुवून घ्यावेत. थोडा वेळ पाण्यात भिजवून त्यातील पाणी काढून टाकणे. नंतर यात तिखट, मीठ, आलं मिसळून मिक्सरवर बारीक करून घ्या. जरुरीपुरते पाणी मिसळून पातळ करू शकता.

द्राक्षरतन कोरमा
साहित्य : द्राक्षे २ वाटय़ा, बेसिक व्हाइट ग्रेव्ही ३ वाटय़ा (कृती खालील भागात दिलेली आहे.), खवा अर्धा वाटी, विलायची पावडर पाव चमचा, लोणी २ चमचे, मीठ, साखर, दही चवीनुसार, दूध १ वाटी, पायनॅपलचे काप गरजेप्रमाणे, फ्रेश क्रीम ४ चमचे.
कृती : फ्राय पॅनमध्ये लोणी घेऊन त्यात बेसिक व्हाइट, दही, विलायची पावडर, खवा व थोडे दूध घालून उकळू दय़ावे, मिश्रणाला तूप सुटल्यावर त्यात स्वच्छ केलेले बिनबियांचे द्राक्ष घाालून नंतर चवीनुसार मीठ, साखर व काजू घालून वर पायनॅपलचे काप, फ्रेश क्रीम, बटर घालून बटर नानबरोबर सव्‍‌र्ह करावे.

बेसिक व्हाइट
या बेसिक व्हाइट ग्रेव्हीचा उपयोग आपल्याला ग्रेव्हीला घट्टपणा व चकचकीतपणा आणण्यासाठी होतो. त्यामुळे पर्यायाने आपल्याला जवळपास सगळ्या ग्रेव्हीजमध्ये या रेसिपीचा उपयोग होईल.
साहित्य : काजू एक वाटी, मगज दोन वाटय़ा, तेल अर्धा वाटी (रिफाइंड व्हेजिटेबल ऑइल), तेजपान ४-५. (तेजपान यासाठी टाकावे की, कधी मगज किंवा काजू जून असेल तर त्याचा एक विशिष्ट वास येतो. तो मारण्याकरता तेज पान उपयोगी पडते.)
कृती : काजू व मगज स्वच्छ पाण्यात घेऊन १५-२० मिनिटं उकळावेत. त्यानंतर स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करावेत. मिश्रण जर बारीक झाले नसेल तर मोठय़ा चाळणीने गाळून घ्यावे. असे हे मिश्रण भांडय़ात घेऊन यात एक ग्लास पाणी, तेल व तेजपान घालून हे मिश्रण उकळावे. (पाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त झाले तरी चालेल) पहिली उकळी येईस्तोवर याला सतत ढवळत राहावे. त्यामुळे ते जळणार नाही. त्यानंतर तेल सुटेपर्यंत उकळू द्यावे. तेल सुटल्यानंतर हे मिश्रण तयार झाले असे समजावे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण डीपफ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस राहू शकते.

द्राक्षांची जेली
साहित्य : द्राक्षांचा ज्यूस
२ वाटय़ा, साखर अर्धी वाटी किंवा चवीनुसार, जिलेटिन १ चमचा.
कृती : द्राक्षांच्या गरात साखर मिसळून गरम करावे. जिलेटिन पाण्यात मिसळून गरम करावे. जिलेटिनचे मिश्रण द्राक्षांच्या रसात मिसळून चांगले ढवळावे. मिश्रण जेली मोल्डमध्ये घालून सेट करावे.