माझं नाव मानसी. मी २० वर्षांची आहे. माझी उंची ५. ३ आहे आणि वजन ६०किलो आहे. मी स्लिम आहे; परंतु माझ्या लव्ह हँडल्समुळे मला एम्बरॅस फील होतं. मला काही तरी असं सुचवा ज्यामुळे लव्ह हॅण्डल्स झाकले जातील आणि मला कॉन्फिडंट फील होईल.

हाय मानसी,

लव्ह हँडल्स – ही खरं तर वय वाढत जातं, बैठं काम वाढत जातं, तसं वाढणारी समस्या आहे. कमरेभोवती वाढणाऱ्या चरबीला लव्ह हॅण्डल्स म्हणायची पद्धत आहे. पोटाच्या बाजूला, कमरेवर वळ्या पडून ते अगदी वाईट दिसतं. खरं तर त्याला लव्ह हँडल्स नव्हे.. हेट हँडल्स असंच म्हणायला हवं. जोक्स अपार्ट. लव्ह हँडल्स घालवण्यासाठी तू कार्डीओ एक्सरसाईज कर. साईड क्रंचेस करूनसुद्धा ते घालवू शकतेस. त्याचबरोबर मी तुला काही फॅशन ट्रिक्ससुद्धा सांगतो.
ब्रॉड बेल्ट तुझा बेस्ट फ्रेंड बनव. पण बेल्टला इलास्टिक नको. लेदर किंवा कॅनव्हास बेल्ट्स वापर. तू जीन्सबरोबर टीज् किंवा शर्ट्स बाहेर ठेवून त्यावर एक मस्त ब्रॉड बेल्ट लाऊ शकतेस. त्यानं तुझे लव्ह हँडल्स पूर्णपणे झाकले जाऊ शकतील. ड्रेसेसबरोबरसुद्धा ब्रॉड बेल्ट आणि वेजेस हिल्स वापर मस्त लुक मिळेल.
तुझा कामरेकडचा भाग हायलाइट होणार नाही याची काळजी घे. कारण तो तुझा प्रॉब्लेम एरिया आहे. त्या ऐवज नेक लाइन शोल्डर्स याकडे जास्त लक्ष दे. मस्त चंकी नेकपीसेस वापर. स्काफ्र्स वापर किंवा गळ्याला एम्ब्रॉयडरी वगैरे असलेले कपडे घाल.

जर तुझे खांदे अरुंद असतील तर लव्ह हँडल्स प्रकर्षांने जाणवतात. अशा वेळी शोल्डर ब्रॉड दिसतील याकडे लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे जर असं असेल तर बोट नेक्स, मेगा स्लीव्ह् स, पफ्स फ्रिल्स असलेले स्लीव्ह््स किंवा शोल्डर असलेले कपडे वापर. शरीराचा टॉप आणि बॉटम हाफ प्रपोर्शनमध्ये दिसणं महत्त्वाचं असतं.

लव्ह हँडल्स झाकण्यासाठी अजून एक ट्रिक म्हणजे बेसिक शिथ ड्रेस वापर. त्याला अजिबात शेप नसतो त्यामुळे शोल्डरपासून गुडघ्यापर्यंत त्याचा मस्त फॉल पडतो आणि त्यामुळे तुझे लव्ह हँडल्स अगदी झाकले जातील. लिनन किंवा कॉटन ही फॅब्रिक्स वापर. लेअरिंग हासुद्धा छान पर्याय होऊ शकतो. तू जे घालशील त्यावर श्रग्स किंवा कार्डिगन्स वापर त्यामुळे तुझ्या दोन्ही साइड्स झाकल्या जातील.

इतर गोष्टींकडे लक्ष दे. छान हेअर कट कर, पेडीक्युअर, मॅनिक्युअर करत राहा. कलर्स वापर, मेक-अप, नेल कलर्स याकडे लक्ष दे. बॉडी शेपर्स वापर. ते अगदीच उपयोगी पडतील. मग त्यावर तू तुला हवे तसे कपडे घालू शकतेस. तू फक्त २० वर्षांची आहेस. वेगवेगळे एक्सपेरीमेन्ट्स करत राहा.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.
(अनुवाद – प्राची परांजपे)