vv11नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

भारतीय गज़्‍ाल विश्वातील शिरोमणी जगजीत सिंह यांचा जन्मदिवस..
८  फेब्रुवारी (१९४१). गज़्‍ाल गायकीत बेगम अख्तर, मेहंदी हसन, गुलाम अली असे प्रस्थापित प्रवाह असताना स्वतचा वेगळा असा प्रवाह आणि प्रेक्षक वर्ग निर्माण करणाऱ्या जगजीत सिंह यांनी गज़्‍ाल आणि उर्दू भाषेला देश आणि धर्मापलीकडे नेऊन ठेवले. खर्जदार आवाज, गायकीतील सहजता आणि श्रोत्यांच्या कानामाग्रे थेट हृदयापर्यंत जाणाऱ्या चालींच्या जोरावर जगजीतसाहेबांनी गज़्‍ालला भारताच्या घराघरांत पोहोचवले; अनेक गज़्‍ाल प्रेमी घडवले. ज्या काळात गज़्‍ाल ही फक्त हार्मोनियम, तबला, सारंगीसह मफलीत गायली जायची, त्या काळात जगजीतसाहेबांनी गज़्‍ाल वर वगवेगळे प्रयोग केले, संगीत संयोजनावरही विशेष भर दिला आणि ग़ज़्‍ालला व्यावसायिकदृष्टय़ा अजून परिपक्व केले. ती मफलीपुरती मर्यादित ना राहता चित्रपट आणि कॅसेट विश्वातही विस्तारती झाली. गज़्‍ाल तरुणवर्गात प्रसिद्ध झाली त्यामागे जगजीतजींचा खूप मोठा हात आहे. ‘तुम इतना जो मुस्कुरा रहें हो’.., ‘प्यार मुझसे जो किया तूने.’,  ‘होठोसे छू लो तुम..’ आजही तरुणांकडून गिटार वर गायल्या-गुणगुणल्या जातात. ही गाणी मीसुद्धा वरचे वर ऐकत असतोच किंवा यू टय़ूबवर विविध मफलीत गायकीत ‘सरकती जाए है रुख से नक़ाब..’ किवा ललित रागातील आणि अनवट अशा (१० मात्रांच्या) ठेक्यातील ‘कोई पास आया सावेरे सावेरे..’ नेहमी पाहात असतो.
पण मला त्याहीपेक्षा आवडतात ती ‘सजदा’ मधील सगळी गाणी. जगजीत सिंह आणि लतादीदी यांचा सुरेल संगम असलेल्या ‘सजदा’-५’.1 आणि ५’.2 वर माझे नितांत प्रेम आहे! का कोण जाणे; ‘सजदा’ ऐकत असताना माझ्या डोळ्यासमोर नुकतीच दिवे लागणी झालेल्या शहराचा देखावा उभा राहतो! म्हणजे आपण कुठेतरी टेकडीवर किवा उंच गच्चीवर आहोत, मस्त वारा आहे, समोर शहरभर माणसाचे अस्तित्व सिद्ध करणारे सिटीलाइट्स आहेत, रस्त्यांवरून दिवे धावतायत.. लोक आपापल्या घरी परतत आहेत, आणि हे दोघे गातायत-
‘हर तरफ हर जगह बेशूमार आदमी
फिर भी तन्हाइयोंका शिकार आदमी’
एकूणच, एकटेपणाला केंद्रस्थानी ठेवून या अल्बममधील गज़्‍ालांची (काव्याची) निवड केली गेलेली दिसते. कदाचित दिवसभर काम करून थकलेल्या माणसाला संध्याकाळी जो एकटेपणा मिळतो, विशेष करून घरी परतत असताना.. कधी हवाहवासा वाटणारा तर कधी त्रास देणारा, त्या स्थितीसाठी किवा त्या स्थितीत ही गाणी बनली असावीत..
‘मौसम को इशारेसे बुला क्यूँ नहीं लेते’
‘कभी यूँ भी आ मेरी आँख मे, के मेरी नज़्‍ार को खबर ना हो..’
‘धुआ बनाके फ़िज़ा मे उडम दिया मुझको..’
‘ग़म का ख़ज़ाना तेरा भी है मेरा भी..’
‘दिल ही तो है, ना संग-ओ-खिश्त, दर्द से भर न आए क्यूँ?’
‘दर्द से मेरा दामन भर दे या अल्लाह..’
ऐकताना तुम्हालाही अशीच संध्याकाळ आठवल्याशिवाय राहणार नाही. सगळ्याच चाली एक से एक.. आणि १९९१ चा विचार करता संगीत संयोजनात कमालीचे नावीन्य! ‘सजदा’ ही खरोखरच अजरामर कलाकृती आहे!
    
हे  ऐकाच..
तेरा बयाँ ग़ालिब
vn28‘सजदा’ मधील ‘दिल ही तो है ना सांग-ओ-खिश्त’ ही गज़्‍ाल खरे तर जगजीत साहेबांनी ‘मिज़्‍रा ग़ालिब’ या गुलजार साहेबांच्या सीरियलच्या वेळी संगीतबद्ध केलेली आहे. १९८८ मध्ये आलेली ही सीरियल आजच्या आम्हा तरुणांनी पहिली असण्याची शक्यता तशी पुसटच आहे; मला पण माझ्या एका नसिरुद्दीन शहाला देव मानणाऱ्या आणि अख्खा गालिब पाठ असणाऱ्या नचिकेत देवस्थळी या मित्रामुळेच ती पाहण्याची बुद्धी झाली. खरंच, आज आपण ‘सीरियल’ च्या नावाखाली काय पाहात असतो टीव्हीवर.. असो. या सीरियलसाठी जगजीतसाहेबांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ग़ालिबच्या गज़्‍ाला अवर्णनीय आहेत. त्या काळातील मुशायऱ्यांमध्य गज़्‍ाल ज्या पद्धतीने म्हटली / सादर केली जात असेल, त्याचा आणि सुमधुर चाली रचणाऱ्या आपल्या प्रतिभेचा सुरेख समतोल जगजीतसाहेबांनी यात साधला आहे आणि जणू ग़ालिबचा काळच आपल्यासमोर उभा केलाय!
या सीरियलची डीव्हीडी तर बाजारात उपलब्ध आहेच,  पण मला नव्यानेच कळलेय की, मिर्जा ग़ालिब सीरियलमधील जगजीत आणि चित्रा सिंह यांनी गायलेल्या गज़्‍ाला आणि ग़ालिबने लिहिलेली पत्रे खुद्द गुलझार साहेबांच्या खास शैलीदार आवाजात रेकॉर्ड केलेला असा.. हे भन्नाट कॉम्बिनेशन असलेला ‘तेरा बयाँग़ालिब’ हा आल्बमही बाजारात उपलब्ध आहे..तुम्ही जर गज़्‍ाल प्रेमी असाल तर हे दोन अल्बम चुकवून चालणारच नाहीत..!
 जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास