अगदी आपल्या वाटणाऱ्या पदार्थाचं मूळ परदेशी असतं तर परक्या देशातून आलेल्या एखाद्या पदार्थाचं कूळ आपल्याच प्रांतात सापडतं. आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा हा प्रयत्न.

पदार्थाचापण स्वभाव असतो का हो? मानवी स्वभावाप्रमाणे पदार्थाचा स्वभाव शोधायचा प्रयत्न केला तर अशी गमतीशीर साधम्र्य आढळतात ना! उदाहरणच द्यायचं झालं तर सदैव मिट्ट गोड बोलणारी मंडळी म्हणजे गुलाबजामसारखी. हजार व्याप सांभाळत सगळ्यांना सामावून घेणारी मंडळी म्हणजे सँडविच आणि उत्फुल्लपणे सदैव उत्साहात संचार करणारा, टणाटण उडय़ा मारत कामं उरकणारा कुणी म्हणजे पॉपकॉर्न.

origin of vangyache bharit history of brinjal bharta information you need to know
‘वांग्याचं भरीत’ हा पदार्थ नेमका आला कुठून? कसा तयार झाला हा शब्द? जाणून घ्या रंजक गोष्ट
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Jugaad Video: एक्सपायर औषध गोळ्यांचा स्वयंपाकघरातील ‘या’ कामासाठी वापर करुन पाहा; २ मिनिटांतच चकीत करणारा परिणाम
What happens to your body if you use expired makeup repeatedly is it harmful to use expired cosmetics products
एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्स वारंवार वापरल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात? डॉक्टर सांगतात…

या मक्याच्या लाह्य़ा म्हणजे आपले लाडके पॉपकॉर्न. यांचा इतिहासही मोठा गमतीशीर आहे. आपल्या घरी रोज ये-जा करणारा एखादा मित्र असावा आणि त्याला एखादी लॉटरी लागून तो बडा असामी बनावा तसं पॉपकॉर्नकडे पाहताना जुन्या पिढीला वाटू शकतं. म्हणजे आजही मुंबईच्या रस्त्यावर घमेलेवजा कढईत वाळू गरम करून त्यात लाह्य़ा फुलवणारा लाह्य़ावाला दिसतोच. पण पूर्वी त्या लाह्य़ा होत्या. आज त्याचे पॉपकॉर्न झालेत आणि याच लाह्य़ांचं परिवर्तन होताच त्या चित्रपटगृहाच्या दिमाखदार वातावरणात आपला खिसा हलका करू लागल्या आहेत.

या पॉपकॉर्नची चित्तरकथा खूप साऱ्या दंतकथांनी समृद्ध आहे. मका हा मूळचा अमेरिकेतला. त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. पण या मक्याच्या सोनेरी दाण्याचा पॉपकॉर्न होऊ शकतो, हा साक्षात्कार माणसांना कसा झाला? याविषयी कथा अशी सांगतात की, फार फार वर्षांपूर्वी कोण्या एका गावात कडक उन्हाळा पडला. इतका कडक उन्हाळा की मक्याच्या उभ्या पिकातल्या दाण्याच्या लाह्य़ा होऊन उडू लागल्या. हा प्रसंग इतका अद्भुत होता की गाई, डुकरं या प्रसंगाने गोंधळून गेली आणि बर्फाचा वर्षांव – हिमवृष्टी समजून कावरीबावरी झाली. या प्रसंगामुळे अमेरिकन मंडळींना साक्षात्कार जाहला आणि मक्याच्या दाण्याच्या लाह्य़ा बनवण्यास सुरुवात झाली. ही कथा खरी-खोटी त्या गाई-डुकरांनाच ठाऊक. पण आपण सहज चाळा म्हणून एखादी गोष्ट करता करता कधी कधी शोध लागून जातो तसाच प्रकार लाह्य़ा, मक्याच्या लाह्य़ांबद्दल म्हणता यावा. तरीही हा शोध लागल्या लागल्या पॉपकॉर्न पॉप्युलर वगैरे झाले नाहीत.घरच्या शेतातल्या शेंगा जशा आपल्याकडे आपण उकडून खातो तशी अमेरिकन मंडळी या लाह्य़ा फुलवून घरच्या घरी खायची.

मग या पॉपकॉर्नला असे उच्च वगैरे स्थान कसे मिळाले? त्याचीही कथा आहे. अमेरिकन मंडळी कृतज्ञता दिन – Thanx Giving Day साजरा करतात. असं म्हणतात की, फार फार वर्षांपूर्वी पहिल्यावहिल्या Thanx Giving Day ला रेड इंडियन शेफ मॅसेसोएट याचा भाऊ क्वादिक्विना याने मृगाच्या कातडीच्या बटव्यातून या मक्याच्या लाह्य़ा भरून आणल्या होत्या. विशेषप्रसंगी पॉपकॉर्नचा वापर हा इथून सुरू झाला. आता यात तथ्य किती हा भाग वेगळा पण ही कथा इंटरेस्टिंग आहे खरी. तर अशा पद्धतीने १८४० पर्यंत पॉपकॉर्न ही गोष्ट सर्वसामान्य होती. पण चार्ल्स क्रेटर्सने पॉपकॉर्न घाऊकरीत्या बनवणारं मशीन तयार केलं आणि या पॉपकॉर्नची गाडी सुसाट धावू लागली. त्याला जागतिक मंदी व दुसऱ्या महायुद्धाची साथ मिळाली. जागतिक मंदीच्या काळात अगदी ५ किंवा १० सेंट्सला मिळणाऱ्या मुबलक पॉपकॉर्नस्नी युरोपियन मंडळींची स्वस्तात मस्त भूक भागवली. दुसऱ्या महायुद्धात साखरेचे रेशनिंग झाल्याने आइस कॅण्डी महागली आणि त्याचा फायदा पॉपकॉर्नच्या लोकप्रियतेला झाला.

आज पॉपकॉर्नचं नातं चित्रपटांशी जोडलं गेलंय. पण त्याही पलीकडे घरच्या घरी पॉपकॉर्न बनवून खाणारी मंडळी जगभरात संख्येने प्रचंड आहेत. ही लोकप्रियता इतकी मोठी आहे की १९ जानेवारीला अमेरिकेत चक्क पॉपकॉर्न डे साजरा होतो.
कढई असो वा मशीन पण तापवल्यावर पॉप पॉप आवाज करत फुलणाऱ्या या लाहय़ांचे नाव त्यांच्या त्या टणाटण उडय़ांमध्येच आहे. या नावाचा कर्ता-करविता अज्ञात असला तरी पुढच्या असंख्य काळासाठी त्याने एका साध्या, पण तरीही मस्त पदार्थाला आपल्या आयुष्याशी जोडलं आहे एवढं मात्र नक्की!
तुम्हाला अशा आणखी कुठल्या पदार्थाची शोधकथा ऐकायला आवडले सांगा viva@ expressindia.com  या पत्त्यावर.