scorecardresearch

नांदी लॅक्मे फॅशन वीकची!

फॅशन जगतात मानाचा समजला जाणारा एक महत्त्वाचा फॅशन शो म्हणजे लॅक्मे फॅशन वीक.

viva2 lakme fashion show

रसिका शिंदे

फॅशन जगतात मानाचा समजला जाणारा एक महत्त्वाचा फॅशन शो म्हणजे लॅक्मे फॅशन वीक. नेमेचि येतो तसा वर्षांतून दोनदा न चुकता होणाऱ्या लॅक्मे फॅशन वीकचा या वर्षीचा नवा अध्याय ९ मार्चपासून सुरू होणार आहे. प्रस्थापित आणि नवख्या अशा दोन्ही फॅशन डिझायनर्सना एकाच व्यासपीठावर आणणारा लॅक्मे फॅशन वीक १२ मार्चपर्यंत मुंबईत बीकेसी येथील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये रंगणार आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईत ‘लॅक्मे फॅशन वीक’ एफडीसीआयच्या सहकार्याने पार पडला होता. भारतीय फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांच्या ‘एके-ओके’ या वस्त्रांच्या अनोख्या श्रृंखलेने २०२२ च्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ची सुरुवात झाली होती. यात विविध धागे, विविध रंगांच्या संगतीचे फॅब्रिक असलेले ड्रेस परिधान केलेल्या मॉडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधले होते. यात फ्लोरल प्रिंट, थ्रीडी एम्ब्रॉयडरी असलेले सॅटिन, कॉटन, डेनिम अशा विविध फॅब्रिकचे कलेक्शन फॅशनची नवी परिभाषा तयार करणारे ठरले. दरवर्षी या फॅशन वीकमध्ये अनेक डिझायनर्स आपली कलाकृती समोर आणत असतात. हातमागावर विणलेले कपडे, हाताने केलेले शिवणकाम, नव्या नव्या पिंट्र्सचे कपडे आणि त्यांच्या डिझाईन्स उपस्थितांच्या मनात आणि फॅशनच्या जगात नवी जागा नक्कीच निर्माण करतात.

नव्या वर्षांची सुरुवात तशी दमदारच झाली आहे. विविध क्षेत्रांत नवनव्या गोष्टी लोकांना अनुभवायला मिळत आहेत. फॅशनचं क्षेत्रही या नवनिर्मितीला अपवाद नाही. याही वर्षी अनेक नवे-जुने डिझायनर्स फक्त कपडेच नव्हे तर मेकअप आणि हेअर स्टायलिंगच्या दृष्टीनेही नवनवे ट्रेण्डस सादर करणार आहेत. लॅक्मे फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी HIRO, KOAI, KOYTOY या भारतीय ब्रॅण्डचे कलेक्शन्स रनवे सादर होणार आहेत. याशिवाय भारतीय खादी उद्योगाचे प्रतिनिधित्व दिव्यम मेहता, ऋषी संचेती, सुकेत धिर हे भारतीय डिझायनर्स करणार असून नव्या खादी कपडय़ांचे कलेक्शन या फॅशन शोमध्ये पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी पुरुषांसाठीचे खास कलेक्शन दिपीत चुघ आणि समीर मधान सादर करणार असून यात टीसस्टूडिओ नवे फॅशन ट्रेण्ड्स सादर करणार आहेत. इतरही अनेक नामांकित कपडय़ांचे ब्रॅण्ड्स आपले नवीन कलेक्शन लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर करणार आहेत.

रसिका शिंदे

२००९ सालापासून डिझायनर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अर्पिताने लहान लहान आरशांचा वापर करत हाताने भरतकाम करून कपडे डिझाईन केले. अशा प्रकारे भरतकाम- विणकाम केलेले कपडे हे अर्पिताची खासियत आहे. हीच खासियत ३ मार्च रोजी पाहायला मिळणार आहे. तसेच सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अधूना डायसन्स या त्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानांचा वापर करत अर्पिता डिझाईनसाठी सूट होतील अशा नव्या हेअर स्टाइल्स दाखवणार आहे. कपडे, कॉस्मेटिक्स, हेअर स्टायलिंग आणि अ‍ॅक्सेसरीज अशा सगळय़ाच क्षेत्रांतील विविध ट्रेण्ड्सची दखल घेणारा, ते फॅशनप्रेमींपर्यंत पोहोचवणारा लॅक्मे फॅशन वीक म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 01:41 IST
ताज्या बातम्या