व्हायरल म्हटल्यावर केवळ इन्फेक्शनच डोळ्यासमोर येते. पण नेटविश्वात सैरावैरा होणे म्हणजेच व्हायरल अशी मायाजालाची परिभाषा. मायाजालाला व्यापून टाकणाऱ्या इन्फेक्शनची गोष्ट – ‘व्हायरलची साथ’मध्ये.

काळ्या पडद्यावर पांढरी अक्षरं उमटतात- सत्य घटनेने प्रेरित. काळा पडदा दूर होतो आणि लंडनचं निळंशार आकाश समोर येतं. पर्यटकांनी गजबजलेल्या मात्र तरीही स्वच्छ रस्त्यावरून निळ्या गणवेशातली मुलगी चालू लागते. पडद्यावर तिचं नाव येतं- हेलेना फ्लान, वय २३, वर्ल्डवाइल्ड क्रू. तिचं स्वगत बॅकग्राऊंडला कानात गुंजतं. ‘पुढची ट्रीप भारताची असणार आहे हे मला सांगण्यात आलंय. कसा असेल हा देश, इतक्या भाषा, वेगवेगळी संस्कृती.. किती बहुविध देश असेल तो.’ चालला चालता ती एका जोडप्याला त्यांचा फोटोही काढून देते.
पुढच्या फ्रेममध्ये तिच्यासकट दहाजणांना शेवटचं ब्रीफिंग सुरू असतं. भारत ही संकल्पना टय़ूटर उलगडून सांगत असते. पुन्हा तिचा आवाज कानी येतो- मी उत्साहात आहे, पण एक अनामिक हुरहूर दाटली आहे. कदाचित उत्साही हुरहुर म्हणा. व्हील असलेली ड्रॅग करून न्यायची बॅग घेऊन आपल्या सहकाऱ्यांसह ती विमानात प्रवेश करते. बहुतांशी ‘यो’ काइंड ऑफ क्राऊडमध्ये एक आजी दिसतात. ‘खुर्सी की पेटी’ बांधण्याचा संकेत. आनंदी नावाच्या आजींची सीटबेल्ट लावण्यासाठीची धडपड ती पाहते. चटकन जाऊन त्यांना मदत करते. आजी त्वरित थँक्यू म्हणतात. पिकलेले केस, राखाडी रंगाची आणि पिवळ्या जरीकाठाची बॉर्डर असलेली साडी, वर जॅकेट, ठाशीव अंबाडा, भलाथोरल्या फ्रेमचा चष्मा हा जामानिमा वागवणाऱ्या आजींना ती नीट न्याहाळते. विमान झेपावतं. दरम्यान, प्रकोपी एसीपासून वाचण्यासाठी आजी सॉक्स घालण्याचा प्रयत्न करतात. ती सहजतेने आजींच्या पायात सॉक्स घालून देते. खाली वाकलेली असताना तिच्या डोक्यातली विखुरलेली हेअरपिन आजी जागेवर लावतात. मंडळी विसावतात, आजी मात्र डोळे उघडे ठेवून टक्क जाग्या असतात. रुटिन फेरीदरम्यान ती आजींपाशी थबकते. तुम्हाला काही होतंय का, तुम्हाला काही हवंय का, मी काय करू शकते. तिचं भराभरा बोलणं थांबवत आजी म्हणतात- आय मिस माय सन. ती क्षणभर स्तब्ध होते, मग सावरत म्हणते- व्हेन यू मिस सम वन, यू मिस समवन. ती खोटा आधार देत नाही. पण हैदराबादमध्ये वाट पाहणाऱ्या कुटुंबाची आठवण आजींना करून देते. विमान लॅण्ड होतं. निघताना आजी थँक्यू म्हणतात आणि मुलाचं कार्ड तिच्या हातावर ठेवतात. आमच्या घरी ये सांगतात. ती आढेवेढे घेते.
तिचं स्वगत- मी त्यांच्या घरी जाईन असं वाटलंच नव्हतं. पण त्यांचा प्रेमळ चेहऱ्याच्या आठवणीने भाग पाडलं. ती आजींच्या घरी पोहोचते. आजींची नात तिच्या स्वागताला सज्ज असते. तिला बघून आजी सुखावतात. पुढचा तिचा अख्खा दिवस आजींच्या गोतावळ्यात धमाल करताना दिसतो. निरोपाच्या वेळी आजी तिला खाऊचा डब्बा देतात आणि एक गिफ्टही सोपवतात. तो असतो रुमाल. रुमालावर नावासकट गणवेशात बॅग घेऊन प्रवासाला जाणाऱ्या तिचं चित्र विणलेलं असतं. काही तासांच्या ओळखीत आपलंसं करणाऱ्या आजींना ती मिठी मारते. पाणावलेल्या डोळ्यांनी ती आजींचा निरोप घेते.
फ्रेम्स पुढे सरकलेल्या.. तिचं बोलणं- आता मी सातत्याने भारतात जाते. पण प्रत्येक वेळी जाताना जे वाटतं ते शब्दांत सांगू शकत नाही. मी काय वाटतं याचा शोध घेताना अधिकाधिक प्रेमात पडते. तिचं बोलणं थांबतं- पांढऱ्या पडद्यावर निळी अक्षरं उमटतात- ‘लव्हिंग इंडिया बॅक सिन्स १९२४, ‘ब्रिटिश एअरवेज’. साहेबांच्या देशातल्या विमानसेवेची ही जाहिरात, तत्त्वं आपल्या संस्कृतीची- आपलंसं करणाऱ्या निव्र्याज प्रेमाची. अॅडची कॅचलाइन आहे- ‘फ्युएल्ड बाय लव्ह’. तरलपणे प्रेम मांडताना खुबीने ब्रॅण्ड रुजवणारी ही व्हायरल अॅड तयार केलेय मराठमोळ्या नीरज घायवानने. तोच नीरज ‘मसान’ दिग्दर्शित करणारा.. आंग्लप्रेम दिन आलाच आहे, प्रेमाचं इंधन भरायला विसरू नका.

Marathi Actress Prajakta Mali glamorous photoshoot viral
“नुसता जाळ अन् धूर…”, प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले, “हाय गर्मी”
light pollution effect on human health
अंधेरा कायम रहे!!
Try this amazing Spicy and Tasty Chicken Kharda You Will Love Note The Recipe
नॉनव्हेज प्रेमींना नक्की आवडेल झणझणीत पारंपरिक ‘चिकन खर्डा’; लगेच नोट करा रेसिपी…
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक