‘चष्मे’बहाद्दर

हल्ली ऑनलाइन मार्के टमध्येसुद्धा घसघशीत डिस्काऊंट देत अनेक ब्रॅण्डेड सनग्लासेस विकले जात आहेत.

फॅशन ट्रेंड्स येतात आणि मग तितक्याच वेगाने नाहिसेही होतात. पण या सगळ्यात अनेक वर्षांपासून टिकून राहिलेला आणि नवनवीन बदल घेऊन बाजारात येणारा गॉगल्समात्र आजही फॅशनच्या दुनियेत आपलं स्थान टिकवून आहे. म्हणजे दिवसा तर दिवसा पण आता रात्रीसुद्धा नानाविध रंगांचे, स्टाइलचे गॉगल डोळ्यावर चढवून भटकणारी मंडळी सगळीकडे दिसू लागली आहेत, इतकं हे गॉगल्समाहात्म्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

फॅशन ट्रेंड आणि चित्रपट यांचा खूप जवळचा संबंध आहे. चित्रपटात एखादी नवीन फॅशन आली की त्यापुढचे निदान सहा महिने तरी ती फॅशन सर्रास रस्त्यावर फिरताना दिसते. हिंदी चित्रपटातील हिरो-हिरॉइन्सनी केलेल्या फॅशनचे प्रयोग स्वत:वर करणं सगळ्यांनाच आवडतं, पण हे फॅशन ट्रेंड्स येतात आणि मग तितक्याच वेगाने नाहीसेही होतात. पण या सगळ्यात अनेक वर्षांपासून टिकून राहिलेला आणि नवनवीन बदल घेऊन बाजारात येणारा ‘गॉगल्स’ मात्र आजही फॅशनच्या दुनियेत आपलं स्थान टिकवून आहे. म्हणजे दिवसा तर दिवसा पण आता रात्रीसुद्धा नानाविध रंगांचे, स्टाईलचे गॉगल्स डोळ्यावर चढवून भटकणारी मंडळी सगळीकडे दिसू लागली आहेत, इतकं हे गॉगलमाहात्म्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

गेल्या वर्षी ‘तेनु काला चष्मा जचदाएं’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि काळा चष्मा घालून सगळीकडे फिरणाऱ्यांचा जणू काही सुळसुळाटच झाला. खरं तर गॉगल्स म्हणजे हल्लीचे ‘सनग्लासेस’ ही तशी सगळ्यांची आवडती फॅशन अ‍ॅक्सेसरी आहे. म्हणजे ऋतू कोणताही असो सूर्यदेवांनी नुसतं डोकावणं जरी सुरू केलं तरी हे ‘सनग्लास’ नावाचं अस्त्र बाहेर निघतं. अर्थात त्याचा वापर त्याच कारणासाठी करण्यात येणं अपेक्षित आहे. सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळ्यांचं रक्षण करणं हे गॉगल्सचं महत्त्वाचं काम, पण मग त्याच्यातच आकार आणि रंग यात विविधता आणून त्याचे ‘एव्हीआटर्स’, ‘ओव्हल’, ‘कॅटआय’, ‘वेफेअरर’, ‘ओवरसाइज्ड’, ‘बटरफ्लाय’ अशा प्रकारचे अनेक भाऊ बंद अस्तित्वात आले आणि मग त्यातूनच त्याची फॅशन सर्वदूर पसरली. म्हणजेच वस्तू एक पण उपयोग दोन. या सगळ्यात आता प्रश्न उद्भवतो की आपण या सनग्लासेसचा वापर नेमका कसा करतो? हा प्रश्न तितकासा गहन वाटत नसेल तरी खरंच खूप गंभीर आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर कमीत कमी १०० ते १५० रुपयांत असे सनग्लासेस विकणाऱ्या फेरीवाल्यांनी याच्या वापराचं महत्त्व बदलून टाकलंय. पूर्वी चित्रपटसृष्टीतील कलाकार जेव्हा मोठय़ा ब्रॅण्ड्सचे चष्मे वापरायचे तेव्हा अप्रूप वाटायचं पण आता गल्लीबोळांतून ब्रॅण्डेड चष्म्यासारखे अगदी तंतोतंत दिसणारे आणि ‘ओरिजनल’ कुठला ‘डुप्लिकेट’ कुठला असा संभ्रम निर्माण व्हावा असे चष्मे विकले जात असतील तर अर्थात त्याचा खप होणारच. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर सध्या सगळ्यांना आवडत असलेला ब्रॅण्ड म्हणजे ‘रे बॅन’. रस्त्यावरही याच ब्रॅण्डच्या चष्म्याची कॉपी होण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे ‘रे बॅन’चं नाव ‘फी८. इंल्ल’ असं लिहिलं जातं मात्र या डुप्लिकेट चष्म्यावर लिहिलेल्या ‘फी८ इंल्ल’ किंवा ‘फी८ इंल्ल’लाच लोकांची प्रचंड पसंती आहे. हे चष्मे बघणाऱ्यांना कंपनीचे ओरिजिनल चष्मे वाटावेत यासाठी व्हाइटनर घेऊन त्यावर नाव बदलण्याची शक्कल लढवणारेही अनेक रसिक आहेत. बरं तंतोतंत दिसत असले तरी असे रस्त्यावरचे सनग्लासेस वापरणं योग्य की अयोग्य हा मुद्दा यात असतोच.

अतिनील किरणांपासून होणारं संरक्षण ही बाब लक्षात घेता रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या चष्मांच्या काचा आपल्या डोळ्यांचं रक्षण करण्याएवढय़ा क्षमतेच्या नसतात, मात्र प्रखर सूर्यप्रकाश, उन्हामुळे डोळ्यांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी करण्यासाठी हे सनग्लासेस नक्कीच उपयोगी ठरतात.

उन्हापासून आणि अतिनील किरणांपासून संरक्षण करणारे, डोळ्यांना भर उन्हातही थंडावा देणारे ब्रॅण्डेड सनग्लासेस खरं तर साधारण दोन हजार रुपयांपासून पुढे अशा किमतीत बाजारात उपलब्ध आहेत, पण इतके पैसे एका सनग्लाससाठी देणं काही जणांना खरंच शक्य नसतं. मग अशातही ‘इतका महाग चष्मा चुकून कुठे हरवला तर..!!’  ही भीतीपण असतेच. त्याहीपेक्षा कमी पैशात वेगवेगळ्या पद्धतीचे दोन तीन चष्मे विकत घेता येतात हे समीकरणही फॅशन करण्यापुरती सोयीस्कर ठरतं. त्यातही हल्ली पारदर्शक काचेपेक्षा चंदेरी, निळ्या, गुलाबी इत्यादी रंगाच्या चकाकणाऱ्या काचा पसंत केल्या जात आहेत. म्हणजे कोणत्याही कॉलेजबाहेर जाऊ न उभं राहिलं की हे चकाकणारं वलय पाहायला मिळतं. त्यात ब्रॅण्ड्सचे ओरिजिनल चष्मे किती आणि डुप्लिकेट किती हे शोधून काढणं अंमळ कठीण आहे.

हल्ली ऑनलाइन मार्के टमध्येसुद्धा घसघशीत डिस्काऊंट देत अनेक ब्रॅण्डेड सनग्लासेस विकले जात आहेत. ‘यू.व्ही. रेज प्रोटेक्शन’ वगैरे वगैरे गुण सांगत आपल्या ‘रेंज’मधले चष्मे इथे उपलब्ध आहेत मात्र त्यांच्या दाव्यांमध्ये किती खरेपणा आहे हे सांगणं कठीण. पण त्यातही आपल्याला ही ऑनलाइन खरेदी करताना मदत करायला ‘रिव्युज’ नावाचा कॉलम आहेच. बरं पूर्वी फक्त दुपारच्या उन्हापासून संरक्षण व्हावं एवढा एकच उद्देश या चष्म्यांमागे होता, आता मात्र हे पूर्णपणे फॅशन अ‍ॅक्सेसरीजमध्ये मोडत असल्याने त्याचं स्वरूप, त्याचा वापर सगळंच बदललं आहे. आता एखाद्या इनडोअर कार्यक्रमातही सेलिब्रिटी डोळ्यावर गॉगल चढवून वावरताना दिसतात. रात्री मोटरबाइकवरून फिरतानाचे चष्मे वेगळे, त्यांचे रंगरूप वेगळे.. साध्या चष्म्यांसारखे वाटणारे गॉगल्स वेगळे.. कार्यक्रमांमध्ये घालून मिरवण्यासाठीचे वेगळे.. इतके पर्याय आज बाजारात उपलब्ध झाले आहेत की ऋतू कोणताही असो.. दिवसभर माणूस वेगवेगळ्या रंगांचे गॉगल्स डोळ्यावर चढवून आपली हौस पूर्ण करू शकतो किंबहूना हल्ली सगळेच यापद्धतीने गॉगल्सचा वापर करताना दिसत आहेत. पूर्वी घरात किं वा रात्री कोणी गॉगल डोळ्यावर चढवला तर त्याचं हसं व्हायचं आता फॅ शनेबल म्हणून त्यांचं कवतिक होतं. इतकं हे गॉगल्सचं महत्त्व वाढलं आहे. गरज ते फॅशन स्टेटमेंट असा हा काला चष्म्याचा रंगीबेरंगी प्रवास झाला आहे.

मोठय़ांचं बघून लहान मुलंदेखील सनग्लासेससाठी हट्ट करताना दिसतात. मग पालकही त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी त्यांना प्लॅस्टिकचे लाल, हिरवे, गुलाबी, पिवळ्या रंगांचे चष्मे विकत घेऊ न देतात. खरं तर त्यामुळे कदाचित सूर्याच्या प्रखर किरणांमुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होत असेल पण त्याचे दुष्परिणामही अनेक आहेत. असे सनग्लासेस बनवण्यासाठी वापरण्यात येणारं प्लॅस्टिक अतिशय हलक्या गुणवत्तेचं असतं. जेव्हा सूर्यप्रकाश किंवा ऊ न त्यावर पडतं तेव्हा अर्थातच त्याचा प्लास्टिकवरही हळूहळू परिणाम होत असतो जो त्या प्लास्टिचं विघटन करत असतो. त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी हे गॉगल्स हानिकारक ठरू शकतात. आपले डोळे कदाचित हा त्रास निभावून नेऊ  शकतील पण लहान मुलांचे डोळे अतिशय नाजूक असल्याने त्याची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे असे चष्मे विकत घेण्यापेक्षा निदान लहान मुलंसाठी तरी चांगल्या प्रतीचे आणि त्यांच्या डोळ्यांचं पूर्णपणे संरक्षण करू शकतील असे सनग्लासेस घेणंच योग्य आहे.

फॅशनपलीकडे सनग्लासेसचे मूळ फायदे

अतिनील किरणांपासून संरक्षण : सनग्लासेसमुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळ्यांचं सरंक्षण होतं. तुम्ही टोपी किंवा राऊं ड हॅट्स चढवल्यामुळे केवळ ५० टक्के किरणं तुमच्या डोळ्यांपासून दूर राहू शकतात, मात्र चष्मा वापरल्याने तुमच्या डोळ्यांचं पूर्ण संरक्षण होतं.

‘ब्ल्यू लाइट’पासून होणारं संरक्षण : सूर्याच्या किरणांचे पृथक्करण केले असता त्याच्या वर्णपटावर दिसणाऱ्या निळ्या आणि जांभळ्या रंगांमुळे विशेष धोका असतो. सनग्लासेस त्यापासून डोळ्यांचं रक्षण करतात.

आरामदायी दृष्टी : सूर्याच्या प्रखर प्रकाशातही तुम्ही सनग्लाससेसमुळे अगदी सहजतेने डोळ्यांवर ताण न येता कुठेही पाहू शकता.

गडद लाइटमध्ये होणारा त्रास : दिवसभर उन्हात आणि प्रखर प्रकाशात गॉगल्स न वापरता जर एकदम घरात किंवा ऑफिसमध्ये तितकासा प्रखर प्रकाश नसणाऱ्या किंवा अंधाऱ्या खोलीत गेलो असता आपल्या डोळ्यांवर ताण पडतो. हा ताण गॉगल्समुळे पडत नाही.

त्वचेचा कॅन्सर : डोळ्यांभोवतीच्या त्वचेवर अतिनील किरणांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते त्यामुळे ते टाळण्यासाठी सनग्लासेस वापरणं नेहमीच उपयोगाचं ठरतं.

प्रसिद्ध ब्रॅण्ड्स

१. रे बॅन

२. फास्टट्रॅक

३. ओकले

४. आयडी

५. माऊ ई जिम

६. प्रॉडा आयवेअर

७. टॉम फोर्ड

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on goggles fashion trend goggles trend

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या