scorecardresearch

Premium

‘डिजिटली’ फॅशन विकणे आहे..

‘लॅक्मे फॅशन वीक’ हे खरं म्हणजे फॅशनचं केंद्र असं म्हणायला हवं.

‘डिजिटली’ फॅशन विकणे आहे..

 

मोठय़ांपासून ते छोटय़ा फॅशन डिझायनपर्यंत सगळ्यांचीच बुटिक किंवा फॅशन हाऊस किंवा डिझायनर हाऊस हमखास असतात. तरीसुद्धा आघाडीच्या फॅशन डिझायनर्सच्या मते सध्या फॅशन डिजिटली जास्त विकली जाते.

sai tamhankar answer
“मराठी बोलायला लाज वाटते का?” सई ताम्हणकरचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली “आम्ही कोणत्या भाषेत…”
union minister nitin gadkari inaugurates development
गडकरी म्हणतात, मागासलेपणाचा डाग पुसायचा असेल तर…
ganeshostav 2023
अग्रलेख : भंगती शहरे, दुभंगता विकास!
formation of cyclone
UPSC-MPSC : चक्रीवादळ म्हणजे काय? ते कसे तयार होते?

आपल्याकडे वर्षांतून दोनदा होणाऱ्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये फॅशनची उलाढाल सगळ्यात जास्त आहे. नवीन फॅशन इथे निर्माण होते आणि तिथून ती बाजारपेठेत पोहोचते. मात्र तरीही या भव्य आणि प्रस्थापित ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या आयोजकांनाही फॅशन डिझायनर आणि ग्राहक यांच्यात डिजिटली दुवा बनण्याचे कसब साध्य करावे लागते आहे. ‘वी वर्क’ इथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘फॅशन टॉक’मध्ये फॅशन डिझायनर्स आणि ‘लॅक्मे फॅशन वीक’चे आयोजक यांनी एकत्र येत पहिल्यांदाच डिजिटली फॅशन विकणं ही आजची गरज कशी झाली आहे?, या विषयावर जाहीर चर्चा केली.

‘लॅक्मे फॅशन वीक’ हे खरं म्हणजे फॅशनचं केंद्र असं म्हणायला हवं. नवनवीन फॅशन डिझायनर्स त्यांच्या अगदी अभिनव कल्पनांसह इथे येतात. त्यांनी त्यांच्या कलेक्शनमधून प्रत्यक्षात आणलेल्या त्यांच्या कल्पना या शोच्या माध्यमातून जगभरात पोहोचतात. हीच फॅशन मग मोठमोठय़ा स्टोअर्समधून आणि आता ऑनलाइनही विकली जाते हे खरं असलं, तरी आता या सगळ्याच प्रक्रियेला दर सीजन वाट पाहाणं आणि केवळ फॅशन वीकच्या माध्यमातूनच जोडलेलं राहाणं यापलीकडे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असं मत ‘लॅक्मे फॅशन वीक’चे आणि ‘आयएमजी रिलायन्स’चे प्रमुख जसप्रीत चांडोक यांनी व्यक्त केले. सध्या शोला उपस्थित राहणारे अनेक खरेदीदार हे डिझायनर्सबरोबर डिजिटली संपर्कात राहण्याची मागणी करतात. एकतर एका क्लिकवर हे काम होतं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार डिझायनर्सकडून कपडे डिझाइन करून ते थेट घेता येतात. त्यामुळे फॅशन डिझायनर्सना डिजिटली फॅशन कशी विकता येईल, यावर दररोज नव्याने विचार करावा लागतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फॅशन वीक वगळता फॅशन डिझायनर्स एरव्ही आपलं कलेक्शनकसं विकतात हेही पाहणं रंजक ठरेल. याविषयी फॅशन डिझायनर निखिल थाम्पी सांगतो, ‘फॅशन वीकमधून डिझायनर्सना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते पण ही बाजारपेठ टिकवून ठेवणं हे आमच्या हातात असतं. त्यासाठी सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म कामाला येतायेत. वेबसाइट, सगळ्या प्रकारचे सोशल मीडिया उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि सोबतच अ‍ॅप्स असा वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल मीडियाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. आजकाल दुकानात जाऊन कपडे, अ‍ॅक्सेसरीज विकत घेणं कोणाला जमत नाही. तेवढा वेळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळेच डिजिटली फॅशन विकणं हे जास्त सोप्पं झालं आहे.’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही लोकांना शॉर्टकटची सवय झाली आहे. आणि म्हणूनच आजकाल वेबसाइटपेक्षा सोशल मीडिया जास्त कामी येतं. कोणालाही ६६६.ल्ल्र‘ँ्र’३ँंेस्र््र.ूे टाइप करत बसायला आवडत नाही किंवा तेवढा वेळ नाही. म्हणूनच ते इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा आधार घेतात जिथे एक-दोन अक्षरं टाइप केली तरी तुम्हाला हवे ते पर्याय झरझर तुमच्या समोर येतात. याशिवाय, एरव्हीही मोबाइलवर टीव्ही सीरिअल, सिनेमे, वेब सीरिज पाहताना सहज तुमची फॅशन विकता येते, असं तो म्हणतो.

टीव्ही-मालिका आणि सोशल मीडिया एकमेकांना कसे जोडले गेलेत याबद्दलचा अनुभवही त्याने यावेळी सांगितला. एखाद्या अभिनेत्रीने घातलेला ड्रेस काही काळातच प्रसिद्ध होतो. आणि तो ड्रेस कोणत्या फॅशन डिझायनरचा आहे ते सोशल मीडियामुळे लगेच समजतं. आणि इथेच फॅशन डिजिटली विकली जाते. ज्या कोणी सेलिब्रिटीने तो ड्रेस घातला आहे तो सेलेब्रिटी त्याचे फोटोज डिझायनरला टॅग करून टाकतो. एकदा डिझायनर समजला की त्याच्याकडे पटापट ऑर्डर येतात. ‘एकदा मी एका सिने अभिनेत्रीसाठी ड्रेस डिझाईन केला होता. तो खूप प्रसिद्ध झाला. त्यावेळी त्या ड्रेससाठी मला २४ तासांच्या आत इतक्या ऑर्डर्स आल्या की माझ्या टीमला ती ऑर्डर कशी हॅन्डल करावी हे समजेना. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की डिजिटली फॅशन किती जास्त प्रमाणात विकली जाते’, असं निखिल सांगतो. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे फॅशन डिझायनर आणि ग्राहक खूप जवळ आले आहेत आणि याचा फायदा नक्कीच दोघांनाही होतो आहे, हा आपलाही अनुभव असल्याचे फॅशन डिझायनर निशिका लुल्लाने सांगितले. ‘माझी आई  फॅशन डिझायनर असल्यामुळे  मी लहानपणापासून फॅशन इंडस्ट्री फार जवळून पाहिली. त्यामुळे मला जुन्या आणि नवीन फॅशन इंडस्ट्रीमधला फरक चांगलाच समजतो. माझा डिजिटल मार्केटिंगचा अनुभव खूप छान आहे. मला जेवढय़ा ऑर्डर्स डिजिटल माध्यमातून येतात त्याच्या अगदी पाव टक्का ऑर्डर बुटिकमधून येतात’, असं निशिका म्हणते.

फक्त फॅशन डिझायनर्स आणि  फॅशन शोचे कर्तेकरवितेच या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करतात असं अजिबात नाही. सेलिब्रिटींनीसुद्धा याचा वापर स्वत:चा व्यवसाय थाटण्यासाठी केला आहे. सोनम आणि रिया कपूर या बहिणींनी आपला ‘रीझन’ हा ब्रँड ज्या पद्धतीने सोशल मीडियाच्या मदतीने उभा केला ते या डिजिटल उलाढालीचे आताचे ठळक उदाहरण आहे. सोनमचं ग्लॅमर, तिची स्टायलिंग सोशल मीडियामुळेच प्रसिद्धीच्या झोतात आली. हाच कित्ता गिरवत आता अलिया भट्टनेही ‘स्टाइलक्रॅकर’ या अ‍ॅपशी हातमिळवणी करत आपलाही कपडय़ांचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. सेलिब्रिटींच्या मोठय़ा सहभागामुळे तर फॅशन डिझायनर्सना येत्या काळात अधिक वेगाने डिजिटल फॅशन उद्योगाची सूत्रे हातात घ्यावी लागणार आहेत.

viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Digital fashion fashion design designer house

First published on: 08-12-2017 at 00:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×